Search This Blog

Friday 12 January 2024

रमाई घरकुल योजनेतील 532 लाभार्थ्यांना मिळणार हक्काची घरे


रमाई घरकुल योजनेतील 532 लाभार्थ्यांना मिळणार हक्काची घरे

Ø 149 त्रुटी असलेल्या घरकुलांच्या प्रस्तावाला मंजूरी

चंद्रपूर,दि. 12 : जिल्ह्यातील रमाई आवास घरकुल योजनेचे (ग्रामीण) 532 लाभार्थ्यांना मंजूरी मिळाली आहे. यामध्ये 149 त्रुटी असलेल्या घरकुलांच्या प्रस्तावाला रद्द ऐवजी मंजूरी देण्यात आली असून या सर्व लाभार्थ्यांना हक्काची घरे  मिळणार आहे.

रमाई घरकुल योजना (ग्रामीण) या योजनेअंतर्गत रमाई घरकुल निर्माण समितीची बैठक राज्याचे वने,  सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी  घरकुल योजना सुरू केली आहे. या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या  ठिकाणी पक्के घर बांधून देण्यात येते. रमाई आवास योजनेचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना मिळण्यासाठी सर्व तालुक्यातील पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्याकडून पात्र लाभार्थ्यांची यादी मंजुरीकरीता मागविण्यात आली होती.

अशी आहे नव्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय संख्या :

गोंडपिपरी तालुक्यामध्ये रद्द ऐवजी पात्र लाभार्थी संख्या 01, सावली तालुक्यात 41, भद्रावती तालुक्यात  10, चंद्रपूर तालुक्यात 02 लाभार्थी तर राजुरा तालुक्यात 95 लाभार्थी असे एकूण 149 रद्द ऐवजी पात्र घरकुल लाभार्थ्यांची संख्या आहे.

०००००० 

No comments:

Post a Comment