Search This Blog

Sunday, 28 January 2024

मुल मध्ये उभे राहणार 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय

 मुल मध्ये उभे राहणार 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे 107 कोटी 29 लक्ष मंजूर

प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी

चंद्रपूरदि. 28 : जिल्ह्यात आरोग्याच्या उत्तमोत्तम सुविधा असाव्यातयेथील रुग्णांना उपचारासाठी नागपूरमुंबईच्या चकरा माराव्या लागू नये तसेच स्थानिक स्तरावरच रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. याच अनुषंगाने मुल येथीाल 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे  100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून मुल येथे आता 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभे राहणार आहे. यासाठी शासनाने 107 कोटी 29 लक्ष रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय जारी केला आहे.

सद्यस्थितीत मूल येथील उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचे आहे. या रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आता मुल येथे 100 खाटांचे नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापित होणार आहे. सदर रुग्णालय हे तळमजला आणि त्यावर तीन माळे असे एकूण 15 हजार चौ. मीटरवर तर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी 4 मजली निवासस्थान राहणार आहे. तसेच 100 खाटा करिता लागणारी नवीन पदनिर्मिती या रुग्णालयासाठी करण्यात येईल. यामध्ये नेत्रतज्‍ज्ञबालरोगतज्‍ज्ञस्त्रीरोगतज्‍ज्ञअस्थिरोगतज्‍ज्ञसर्जनभूलतज्‍ज्ञ आणि इतर वैद्यकीय अधिकारी अशी एकूण  14 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे निर्माण होतील. सोबतच चतुर्थ श्रेणी कर्मचारीपरिचारिकातांत्रीक पदेसुद्धा पदे निर्माण होतील.

रुग्णालयामध्ये राहणार अत्याधुनिक सोयीसुविधा : रुग्णालयामध्ये नवीन विशेषउपचार कक्षसर्व प्रकारच्या विशेषज्‍ज्ञ सेवा पुरविता येणे शक्य होईल. या ठिकाणी डोळ्यांच्या व अस्थिरोग शस्त्रक्रियासाठी नवीन शस्त्रक्रियागृह निर्माण करण्यात येणार आहे. नव्याने कार्यान्वित होणाऱ्या विशेष उपचार कक्षाकरिता आधुनिक  वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामुग्री उपलब्ध होतील. या ठिकाणी डिजिटल सोनोग्राफी तसेच  एक्स-रे आणि सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या होतील. सुसज्ज माता-बाळ उपचार यंत्रणाअपघात विभागात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व साधनसामुग्रीबाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांचा ऑनलाईन डाटा गोळा करणे.  गंभीर शस्त्रक्रियेसाठी आय.सी.यूमॉड्यूलर ऑपरेशन कक्षमहिलापुरुष व बालकांसाठी तसेच गरोदर माता व बाळंतपण झालेल्या मातांसाठी स्वतंत्र कक्षमॉड्यूलर औषधी वितरण कक्षब्लड बँकआयुर्वेदयुनानी व होमीओपॅथी रुग्णांच्या उपचारासाठी बाह्य व आंतररुग्ण सेवापिण्याचे शुध्द पाणी व स्वच्छतेच्या उपाययोजना राहणार आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांसाठीसुध्दा सुविधा : रुग्णालयात रुग्णांसोबत येणा-या नातेवाईकांसाठी जेवणाचीबसण्याची व आराम करण्यासाठी सर्व सुविधायुक्त प्रतिक्षा कक्षनातेवाईकांसाठी स्वतंत्र शौचालयआंघोळीकरीता बाथरुमरुग्णांचे नातेवाईक तसेच रुग्णालयामधील अधिकारी व कर्मचा-यांसाठी स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था राहणार आहे.

0000000

No comments:

Post a Comment