Search This Blog

Monday, 8 January 2024

चंद्रपूर प्रकल्पातील खेळाडूंची राज्यस्तरावर उंच भरारी

 

चंद्रपूर प्रकल्पातील खेळाडूंची राज्यस्तरावर उंच भरारी

चंद्रपूरदि. 8 : आदिवासी विकास विभागनाशिक अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा 7 ते 9 जानेवारी 2024 ला गरुडझेप अकॅडमीनाशिक येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी नागपूर विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर येथील देवाडाबोर्डातोहोगावसुब्बईजानाळादेलनवाडीडोंगरगावसरडपारराजुराभारीदुर्गापूर या शाळेचे 9 मुली व 18 मुले असे एकूण 27  खेळाडूंनी कब्बड्डीखो- खो,व्हॅलीबालहॅन्डबालवैयक्तिक खेळ प्रकारात राज्यस्तरावर उंच भरारी घेतली असून सर्व खेळाडू नाशिकला रवाना झाले आहेत.

दरवर्षी शालेय व आदिवासी विभागाच्या क्रीडा स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील विद्यार्थी सहभाग घेतात. विभाग व राज्य स्तरावर आपल्या प्रकल्पाचे नाव उंच करतात. खेळसांस्कृतिकव शैक्षणिक क्षेत्रात चंद्रपूर प्रकल्प अग्रेसर आहेया स्पर्धेसाठी क्रीडा व्यवस्थापकक्रीडा नियोजनसाठी सुरेश श्रीरामेउमेश कडू,  किशोर चिंचोलकरसुनिता हतिमारेश्रीहरी आत्रामवर्षा मडावी  हे सर्व कर्मचारी नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाले आहे.

वरील स्पर्धेसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम.श्री. टिंगूसलेश्री. बोंगीरवारश्री. धोटकरसहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. पोडश्री. कुळसंगेश्री. चव्हाणश्रीमती कुतरमारे तसेच प्रकल्प कार्यालयाचे सर्व कर्मचारी व शासकीयतथा अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment