Search This Blog

Wednesday 24 January 2024

29 जानेवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


 

29 जानेवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर,दि.24: जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमॉडेल करीअर सेंटरचंद्रपूर आणि श्री.साई आय.टी.आय.,भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 29 जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते पार पडणार आहे.

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. सदर मेळावा सोमवारदि.29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता गुंडावार लॉनभाजी मार्केटविजासन रोडभद्रावती येथे पार पडणार आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 850 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहे.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता https://Rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करुन ऑनलाइन अप्लाय करावे.

नामांकित कंपन्यांचा सहभाग:

सदर रोजगार मेळाव्यात सन्सूर इंडिया प्रा.लिमि.चंद्रपूरजय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्व्हिसेसभारत पे प्रा. लिमि.,एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्सटॅलेंनसेतू प्रा. लिमि.,पुणे आदी कंपन्या या मेळाव्यात सहभागी होत आहे.

आवश्यक कागदपत्रे:

मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी आधारकार्डशैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती (कमीत कमी तीन प्रती) सोबत ठेवाव्यात.

जिल्ह्यातील जास्तीत-जास्त बेरोजगार उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा.तसेच मेळाव्याच्या अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment