एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कूल मध्ये प्रवेशासाठी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन
Ø 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
चंद्रपूर,दि. 18: आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यान्वित असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याकरीता प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा रविवार, दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 2 या कालावधीत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, जांभुळघाट (ता.चिमूर) या ठिकाणी घेण्यात येणार आहे. प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षेचे आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम दि. 10 फेब्रुवारी 2024 आहे.
इयत्ता 6 वीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरून काढण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी, 6 वी ते 8 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी आहे, अशा प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे पालक,शिक्षक व मुख्याध्यापकांनी सविस्तर माहिती व परीक्षा आवेदन पत्रासाठी नजीकच्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, चिमूर येथे संपर्क करावा.
जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमधील अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा, असे चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एम.व्हि. डुले यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment