Search This Blog

Wednesday 23 October 2019

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या तत्परतेने दुर्गापूर येथील मतदान पथकांना मिळाला दिलासा

गैरसमजातून नादुरुस्त व राखीव ईव्हीएम मशीनवर उमेदवारांनी घेतला आक्षेप
पथकांना अडविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निवडणूक आयोगाला दिली माहिती
शांतता व सलोखा राखल्याबद्दल प्रशासनाने मानले आभार
चंद्रपूर दि २२ ऑक्टोबर : बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील दुर्गापुर येथील मतदान केंद्रावरून मूल येथील उपविभागीय केंद्राकडे घेऊन जाणाऱ्या नादुरुस्त  व राखीव ईव्हीएम मशीनवरून काल रात्री निर्माण झालेला तणाव जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या प्रसंगावधानाने निवळला. रात्री उशिरा निवडणूक आयोगाला यासंदर्भात माहिती कळविण्यात आली असून सर्व मतदान यंत्रे व निवडणूक कागदपत्रे सुरक्षित असल्याबाबतचा अहवाल देण्यात आला आहे.
         काल मतदानाच्या दिवशी दुर्गापूर येथील मतदान कक्षावरून बाहेर पडलेली क्षेत्रीय अधिकारी डी.जी. मेश्राम झोन क्रमांक १८ यांच्या जीप क्रमांक एम.एच. १८ एस १७०९ यांच्या वाहनासह सर्व निवडणूक ताफा रात्री उशिरा मूल येथे पोहोचल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत सादर करण्यात आला आहे.
            क्षेत्रीय अधिकारी श्री.डी.जी. मेश्राम यांच्या वाहनातील राखीव व नादुरुस्त झालेल्या मतदान यंत्राच्या संदर्भात काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वास झाडेवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्री. राजू झोडे व त्यांच्या समर्थकांना गैरसमज झाला होता. त्यामुळे या ठिकाणी जमा झालेल्या जमावाने मतदानानंतर मूल येथे जाणाऱ्या मतदान पथकांना अडविण्याचा प्रयत्न केला होता.
             घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली. वरील उमेदवारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी ज्या मतदान यंत्राबद्दल संशय व्यक्त केला त्या नादुरुस्त व राखीव यंत्रांचे क्रमांक नोंद करून देण्यात आले. तसेच या संदर्भात आक्षेप असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरिक्षकांसमक्ष खात्री करून घेण्याचे सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेतील राखीव व नादुरुस्त ईव्हीएम मशीन बाबतची माहिती दिली. तसेच मतदान झालेले यंत्र अन्य वाहनात सुरक्षित असल्याची खात्री करून दिली. त्यांनी घटनास्थळावर भेट देऊन उमेदवार व समर्थकांची समजूत काढल्यामुळे रात्री उशिरा वाहनातील सर्व मतदान यंत्रे सहाय्यक निवडणूक अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या मूल येथील मुख्यालयात रात्री रवाना करण्यात आले.
            यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल व दाखवलेल्या संयमाबद्दल आभार मानले आहे.
            तसेच काल निवडणूक प्रक्रिया झालेल्या यंत्रांना कोणताही धोका नसून ते सर्व सीलबंद आहेत. त्यामध्ये नोंदविलेली मते सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भातील कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच यासंदर्भात कोणतीही अफवा पसरविणाऱ्याना थारा देऊ नयेअसे आवाहन करण्यात आले आहे.
0000

दिव्यांग ठरले लोकशाहीचे खरे शिलेदार

चंद्रपूर जिल्ह्यातील 95.71 टक्के दिव्यांगानी केले मतदान
चंद्रपूर, 22 ऑक्टोबर: चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग अचंबित करणारा ठरला. जिल्ह्यातील हजार 639 दिव्यांग मतदारांपैकी हजार 311 दिव्यांग बांधवांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचे तेच खरे शिलेदार ठरले. जिल्ह्यातील तब्बल 95.71 टक्के दिव्यांगानी मतदान केले. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव यांनी जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध सुविधा पुरवण्याचे नियोजन आखले होते. या नियोजनाला चंद्रपुर महानगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभले. जिल्ह्यातील दिव्यांग मतदार, 80 वर्षावरील जेष्ठ नागरिकगर्भवती स्त्रियाप्रसूत स्त्रिया या मतदारांकरिता अनेक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये व्हीलचेअरअंध मतदाराकरिता ब्रेल बॅलेट पेपरअंशता अंध मतदाराकरिता मॅग्नेफाईन शीटपिण्याचे पाणीवाहन व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या मदतीकरता स्वयंसेवक नेमले होते. निवडणूक आयोगामार्फत  प्रशासनाने पुरलेल्या या सुविधांना दिव्यांग बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला व दिव्यांग मतदारांची टक्केवारी 95.71 पर्यंत पोहचवली. त्यामध्ये विधानसभा क्षेत्रातील अस्थिभंग असलेले हजार 149 मतदार, 803 अंध मतदार, 433 अंशता अंध मतदार, 1926 इतर दिव्यांग मतदार यांनी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला.
            तसेच 16 हजार 291 दिव्यांग मतदारगर्भवती स्त्रियाप्रसुत स्त्रिया व 80 वर्षापुढील जेष्ठ नागरिक नागरिकांनी वाहतूक सुविधांची मागणी केली होती. त्यातील 7311 दिव्यांग, 2527 गर्भवती व प्रसुत स्त्रीयांना तर 8787 ज्येष्ठ नागरिकांना असे एकूण 14626 मतदारांना वाहतुकीची सुविधा पुरवण्यात आल्या. दिव्यांग मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी काही मतदान केंद्रांना भेटी देऊन दिव्यांग मतदारांनाही प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचे मनोबल वाढवले.
000000

चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेकरिता 64.48 टक्के मतदान

चिमूरमध्ये सर्वाधिक 74.63 टक्के तर चंद्रपूरमध्ये सर्वात कमी 51.02 टक्के
ईव्हीएम मशीन उपविभागीय कार्यालयाच्या गोदामांमध्ये सीलबंद
24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी
चंद्रपूर, 22 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीसाठी काल 21 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात पावसाचे सावट असतानासुद्धा 64.48 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान चिमूर विधानसभा क्षेत्रात झाले. तर सर्वात कमी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात झाले. रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशीन संच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात त्याच्या उपविभागीय कार्यालयांच्या गोदामांमध्ये सीलबंद करण्यात आले.
निवडणूक विभागाच्या अंतिम आकडेवारीनुसार 64.48 टक्के मतदान झाले. यामध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघात 70.95 टक्के मतदान झाले. तर बल्लारपूर क्षेत्रात 62.26 टक्केसोबतच ब्रह्मपुरी क्षेत्रात 71.10 टक्के आणि वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये 62.38 मतदान नोंदवले गेले. विशेष चिमुर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 74.63 टक्के मतदान झाले असून चिमूर विधानसभा क्षेत्रातील मतदानात काहीअंशी वाढ दिसून आली आहे. तर सर्वात कमी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात 51.02 टक्के मतदान झाले.
स्ट्राँगरूम मध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन सीलबंद करण्यात आली असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. सर्व विधानसभा क्षेत्राच्या स्ट्रॉंग रूम परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राची मतमोजणी उपविभागीय कार्यालय चंद्रपूर येथे होणार आहे. तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची मतमोजणी प्रशासकीय भवनमुल येथे मतमोजणी पार पडणार आहे. वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती मोहबाळा रोड येथे होणार आहे. तर चिमूर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह तहसील कार्यालय परिसरात पार पडणार आहे. ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे होणार आहे. तर राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय परिसरात पार पाडण्यात येणार आहे.

Monday 21 October 2019

86.25 टक्के दिव्यांग मतदारांनी केले मतदान


ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना पुरवल्या विशेष सुविधा
चंद्रपूरदि. 21 ऑक्टोबर: चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्रासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जिल्ह्यातील  दिव्यांग बांधवांनी यात उस्फुर्त सहभाग घेतला असून 86.25 टक्के दिव्यांग बांधवांनी मतदान केले आहेअशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
जिल्ह्यातील दिव्यांग मतदार, 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकगर्भवती स्त्रियाप्रसूत स्त्रिया या मतदाराकरिता जिल्हा परिषदेमार्फत अनेक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये व्हीलचेअरअंध मतदाराकरिता ब्रेल बॅलेट पेपरअंशतः अंध मतदान करिता मॅग्नेफाईन शीटपिण्याचे पाणीवाहन व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या मदतीकरिता स्वयंसेवक नेमले होते. 7 हजार 639 दिव्यांग बांधवांनी याला उत्कृष्ट प्रतिसाद देत 86.25 टक्के मतदान केले. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी अनेक मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी दिल्यात. त्यावेळी मतदानासाठी आलेले दिव्यांग बांधव तसेच मतदारांशी त्यांनी संवाद साधला.

नवमतदारात उत्साह : वरिष्ठांना दिसली जबाबदारीची जाणीव चंद्रपूरमध्ये सर्व स्तरातील मतदारांनी बजावला मताधिकार




चंद्रपूरदि. 21 ऑक्टोबर: एकीकडे कमी मतदानाची आकडेवारी वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे वेगवेगळ्या वयोगटातील स्तरातील आणि आर्थिक परिस्थितीतील नागरिक सकारात्मक ऊर्जेने लोकशाहीच्या उत्सवाकडे बघताना दिसले. चंद्रपूर शहरातील मतदारांच्या उस्फूर्त प्रतिक्रिया लोकशाहीला बळकटी देणाऱ्या ठरल्यात.
·         युवांनी लोकशाही मजबूत करावी
भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. या देशाची लोकशाही मजबूत करण्याकरिता सर्वात जास्त संख्येने असलेला युवावर्गाने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मत कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. कारण युवावर्गाच्या विचारावरच देशाची भविष्यकालीन वाटचाल ठरणार आहे. त्यामुळे कुटुंबातील आम्ही सर्व युवावर्ग मतदानासाठी आलो आहोतअसे मत मातोश्री तुकुम या मतदान केंद्रावर मताधिकार बजावण्यासाठी आलेला समीप बगडे व्यक्त करतो.
·         प्रकृती बिघडली तरी मताधिकार बजावला
 जेव्हापासून मतदार यादीत नाव आहे तेव्हापासून एकदाही मतदान मतदानापासून वंचित राहिले नाही. तब्येत बरी नव्हती म्हणून मतदानापासून वंचित राहणार नाही ना याची भीती वाटत होती. परंतु माझ्या पतीने माझे मनोबल वाढवले व मतदान केंद्रापर्यंत घेऊन आले. त्यामुळे मला मतदानाचा हक्क बजावणे शक्य झाले अशी भावना जैनुद्दीन जव्हेरी विद्यालयतुकूम या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या वनिता वासेकर यांनी व्यक्त केली.
·         लोकशाही बळकटीकरणासाठी दिव्यांगही पुढे
दिव्यांग असणारे विवेक डबले यांनीही मतदानाचा हक्क बजावला. 1995 ला झालेल्या मोठ्या अपघातात त्यांचे हात पायांना दिव्यांगत्व आले. परंतु या परिस्थितीवर मात करत प्रत्येक मतदानाच्या वेळेस त्यांचा मोठा भाऊ मतदानासाठी मतदान केंद्रावर घेऊन येतो.
·         पायी चालत मतदान केंद्र गाठले
तुकुम मध्ये  राहणाऱ्या विठाबाई सोयाम व सखुबाई नैताम यांनी सत्तरी गाठलेली आहे. तरीपण ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या मदतती विषयी माहिती नसल्याने दोघीही पायी चालत भवानजीभाई विद्यालय येथील मतदान केंद्रावर पोहोचल्या व मतदान करून लोकशाही बळकटीकरणासाठी मोलाचे योगदान दिले. यांचे लोकशाही प्रती असलेले समर्पण भावी पिढीने आत्मसात करण्याजोगे आहे.
·         मतदान करून वीर बाबुराव शेडमाके यांना नमन
चंद्रपूर शहरातील आदिवासींनी वेगळाच पायंडा घालून दिलेला आहे. आज शहीद वीर बाबुराव शेडमाके यांची पुण्यतिथी आहे. या दिवशी चंद्रपुरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे आदिवासी बांधव मतदान प्रक्रियेत सहभागी होईल किंवा नाही याबद्दल प्रशासनात धास्ती होती. परंतु आदिवासी बांधवांनी ज्या  देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वीर बाबुराव शेडमाके शहीद झाले. त्या देशाची लोकशाही मजबूत करणे परम कर्तव्य मानले. रीतसर मतदान केल्यानंतर आदिवासी बांधवांनी विर बाबुराव शेडमाके यांच्या पुण्यतिथीनिमित्त रॅलीचे आयोजन केले.  आदिवासी बांधवांनी मतदान करून खऱ्या अर्थाने शहीदाला श्रद्धांजली अर्पण करून देशात नवा पायंडा निर्माण केला.
·         मतदारांनी घेतला सेल्फीचा आनंद
चंद्रपूर शहरातील 26 मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट विकसित करण्यात आले होते. मतदारांनी मताधिकार बजावल्यानंतर अनेकांनी सेल्फी पॉइंट वर फोटो काढले होते. ते फोटो सोशल मीडियावर शेअर करून मित्रांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित केले.
00000

Sunday 20 October 2019

निवडणुकीसाठी 10 हजार 664 कर्मचाऱ्यांचा ताफा मतदान केंद्राकडे रवाना




हजार 466 सुरक्षा रक्षक तैनात: 71 उमेदवारांचे भविष्य होणार 2519 ईव्हीएममध्ये बंद
चंद्रपूर, 20 ऑक्टोबर: उद्या दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील 10 हजार 664 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निवडणूक निर्भयपणे व शांततेत पार पडावी याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनातील हजार 466 पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त व सुरक्षेकरिता तैनात केले गेले आहे. यामध्ये 195 पोलीस अधिकारी, 2 हजार 380 पोलीस कर्मचारी, 7 अर्धसैनिक दल, 1 हजार 200 होमगार्डसी 60 दंगा नियंत्रण  प्रत्येकी पथक व एक बॉम्बशोधक पथकाचा समावेश आहे. संपूर्ण जिल्ह्याचे निवडणुकीकरिता हजार 516 बॅलेट युनिट, 2 हजार 519 कंट्रोल युनिट व हजार 729 व्हीव्हीपॅटचा पुरवठा करण्यात आला आहे.
            चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाकरीता मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून जिल्ह्यातील एकूण 18 लक्ष 76 हजार 351 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये लाख 62 हजार 378 पुरुष मतदार तर लाख 13 हजार 951 स्त्री मतदारांचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 22 तृतीयपंथी मताधिकार बजावणार आहेत.
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 17 लक्ष 50 हजार 893 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यावर्षीच्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल लाख 25 हजार पेक्षा जास्त नवमतदार सहभागी होणार आहे. जिल्ह्यात एकूण हजार 098 मतदान केंद्रे असून त्यामध्ये हजार 441 मतदान केंद्र ग्रामीण भागात तर 667 मतदान केंद्रे शहरी भागात आहे. सहाय्यक मतदान केंद्राची संख्या 28 असून जिल्हाभरात एकूण 12 सखी मतदार केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये 71 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
            जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील एकूण लाख 15 हजार 819 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून त्यामध्ये 1 लाख 65 हजार 168 पुरुष मतदार तसेच लाख 50 हजार 651 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या 360 असून यापैकी 305  केंद्र ग्रामीण भागात तर 55 मतदान केंद्रे शहरी भागात आहे. या मतदारसंघासाठी मतदान केंद्रे सहाय्यकारी मतदान केंद्रे म्हणून निर्माण केले गेले. आहे अडचणीच्या वेळी या मतदान केंद्रांचा वापर करण्यात येईल. तसेच सखी मतदान केंद्र विकसित करण्यात आले असून या केंद्राचे सर्व व्यवस्थापन महिला सांभाळणार आहेत. सखी मतदान केंद्रामध्ये 144 व 132 क्रमांकाच्या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरिता 1950 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीमध्ये राजुरा मतदारसंघातून 12 उमेदवारांनी सहभाग घेतला आहे.
            चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील एकूण लाख 95 हजार 700 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून त्यामध्ये लाख हजार 684 पुरुष मतदार तसेच लाख 92 हजार 999 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या 395 असून यापैकी 96  केंद्र ग्रामीण भागात तर 299 मतदान केंद्र शहरी भागात आहे. या मतदारसंघासाठी 10 मतदान केंद्रे सहाय्यकारी मतदान केंद्रे म्हणून निर्माण केले गेले आहे. अडचणीच्या वेळी या मतदान केंद्रांचा वापर करण्यात येईल. तसेच सखी मतदान केंद्र विकसित करण्यात येणार आहे. सखी मतदान केंद्र मध्ये केंद्र क्रमांक 96 व 97 या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया पार पाडण्या करिता हजार 953 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या मतदारसंघातून एकूण 12 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
            बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील एकूण लाख 20 हजार 767 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून त्यामध्ये लाख 64 हजार 25 पुरुष मतदार तसेच लाख 56 हजार 741 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या 370 असून यापैकी 257  केंद्र ग्रामीण भागात तर 133 मतदान केंद्र शहरी भागात आहे. या मतदारसंघासाठी मतदान केंद्रे सहाय्यकारी मतदान केंद्रे म्हणून निर्माण केले गेले आहे. तसेच सखी मतदान केंद्र विकसित करण्यात येणार आहे. सखी मतदान केंद्र मध्ये केंद्र क्रमांक 107 व 177 या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरिता हजार 829 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या मतदारसंघातून एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे.
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील एकूण लाख 70 हजार 382 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून त्यामध्ये लाख 36 हजार 271 पुरुष मतदार तसेच लाख 34 हजार 111 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या 324 असून यापैकी 274  केंद्र ग्रामीण भागात तर 50 मतदान केंद्र शहरी भागात आहे. या मतदारसंघासाठी मतदान केंद्र सहाय्यकारी मतदान केंद्रे म्हणून निर्माण केले गेले आहे. तसेच सखी मतदान केंद्र विकसित करण्यात येणार आहे. 18 व 20 क्रमांकाच्या मतदान केंद्राला त्यापद्धतीने विकसित करून त्या केंद्राचे सर्व व्यवस्थापन महिला सांभाळणार आहेत. या मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरिता हजार 721 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण 11 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
चिमूर विधानसभा मतदारसंघातील एकूण लाख 77 हजार 484 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून त्यामध्ये लाख 40 हजार 788 पुरुष मतदार तसेच लाख 36 हजार 694 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या 311 असून यापैकी 268  केंद्र ग्रामीण भागात तर 43 मतदान केंद्र शहरी भागात आहे. या मतदारसंघासाठी मतदान केंद्रे सहाय्यकारी मतदान केंद्रे म्हणून निर्माण केले गेले आहे. तसेच सखी मतदान केंद्र विकसित करण्यात येणार आहे. केंद्र क्रमांक 176 अ व 179 अ या मतदान केंद्रांचा सखी मतदान केंद्रात समावेश आहे. या मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरिता हजार 655 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या मतदारसंघातून एकूण 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे.
वरोरा विधानसभा मतदारसंघातील एकूण लाख 96 हजार 199 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून त्यामध्ये लाख 53 हजार 442 पुरुष मतदार तसेच लाख 42 हजार 755 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या 338 असून यापैकी 241  केंद्र ग्रामीण भागात तर 97 मतदान केंद्र शहरी भागात आहे. या मतदारसंघासाठी मतदान केंद्र सहाय्यकारी मतदान केंद्रे म्हणून निर्माण केले गेले आहे. तसेच सखी मतदान केंद्र विकसित करण्यात येणार आहे. 158 व 305 क्रमांकाच्या मतदान केंद्राचा समावेश आहे. या मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरिता हजार 556 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण 13 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
0000

Saturday 19 October 2019

खर्च निरीक्षक धृबाज्योति रॉय यांनी केले उमेदवारांच्या खर्चाचे अंतिम निरीक्षण


चंद्रपूरदि. 18 ऑक्टोबर: उमेदवारांनी निवडणूक काळात केलेल्या खर्चाचे निवडणूक आयोगामार्फत  तीन वेळा निरीक्षण केले जाते. आज दिनांक 18 ऑक्टोबर 2019 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक धृबाज्योति रॉय यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे निरीक्षण केले.
21 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अगोदर उमेदवारांच्या खर्चाची निरीक्षण करणे आवश्यक असते. यामुळे निवडणूक खर्च निरीक्षक धृबाज्योति रॉय यांनी राजुरा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण केले. यानंतर बल्लारपूर व चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची निरीक्षण करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी वणी नाका व घूघुस येथील स्थायी निगराणी पथकाला भेट दिली. 
00000

खर्च निरीक्षक के. विनोद कुमार यांनी केले उमेदवारांच्या खर्चाचे अंतिम निरीक्षण

चंद्रपूरदि. 18 ऑक्टोबर: निवडणुकीमध्ये होणाऱ्या खर्चावर नियंत्रण असावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत उमेदवारांच्या खर्चाचे तीन वेळा निरीक्षण केले जाते. आज दिनांक 18 ऑक्टोबर 2019 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक के. विनोद कुमार यांनी ब्रह्मपुरी व चिमूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे निरीक्षण केले.
21 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अगोदर उमेदवारांच्या खर्चाची निरीक्षण करणे आवश्यक असते. यामुळे निवडणूक खर्च निरीक्षक के. विनोद कुमार यांनी ब्रह्मपुरी व चिमूर मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण केले. यानंतर वरोरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची निरीक्षण करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी सिंदेवाही व ब्रह्मपुरी येथील स्थायी निगराणी पथकाला भेट दिली. उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण झाल्यानंतर त्यांनी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना साहित्य वाटपाच्या स्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर चिमूर मतदार संघातील कानपा,  शंकरपुर व खडसंगी येथील स्थायी निगरानी पथकाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
000000

आज सायंकाळी 6 वाजेपासून प्रचारतोफा थंडावणार शांततापूर्ण मतदानासाठी प्रशासन सज्ज: जिल्हाधिकारी


·         चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारसंघात मतदान नोंदणी नसणाऱ्यांना जिल्हा सोडण्याचे आदेश
·       व्हाट्सअप फेसबुकवर प्रचार ठरेल आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन
·       20 व 21 तारखेच्या जाहिरातींचा मजकूर प्रमाणित करणे आवश्यक
चंद्रपूरदि. 18 ऑक्टोबर: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 21 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून उद्या सायंकाळी वाजेपासून उमेदवारांकडून केला जाणारा प्रचार थांबणार आहे. मतदान करण्याची सर्वांना संधी प्राप्त व्हावी. याकरिता बाहेरील जिल्ह्यातील मतदारांना ज्यांची नोंदणी चंद्रपूर जिल्ह्यात नाही अशांना जिल्हा सोडण्याचे आदेश देण्यात येत आहेअसे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात दिनांक 18 ऑक्टोबर 2019 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
            चंद्रपूर जिल्ह्यातील 18 लाख 76 हजार 351 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 21 तारखेला होणारी मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व्हावी. याकरिता केंद्रीय पोलीस दल तसेच निमलष्करी दलाची पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व भयमुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज सज्ज आहेअशी माहिती त्यांनी यावेळी दिली. दिनांक 19 ऑक्टोबर पासून जाहीर प्रचाराला बंदी घालण्यात आली असून उर्वरित  प्रचार साहित्य जसे की वृत्तपत्रांमधील प्रकाशित करण्यात येणाऱ्या जाहिराती व इतर माध्यमावरून प्रसारित करण्यात येणारे मजकूर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमार्फत प्रमाणित करणे बंधनकारक आहे.
ग्रामीण मतदान केंद्राची संख्या 1441 तर शहरी मतदान केंद्राची संख्या 657 असे एकूण 2098 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये याकरिता 28 मतदान केंद्र सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून निर्माण केले गेले आहेत. या मतदान केंद्रापैकी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांना सखी मतदान केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या मतदान केंद्राची संपूर्ण व्यवस्था महिला अधिकारी सांभाळणार आहेत. अशी एकूण 12 मतदान केंद्रे सखी मतदार केंद्र जिल्ह्यात निर्माण करण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रियेला अवघे दिवस शिल्लक असून मतदान केंद्र शोधण्यास मतदारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. याकरिता मतदार ओळख चिट्ठी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 98 टक्के मतदारांना ओळखीची चिट्टीचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण हजार 639 दिव्यांग मतदारांशी संपर्क करण्यात आला असून त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी कोणतीही समस्या निर्माण होणार नाहीयासाठी पीडब्ल्यूडीचा वापर करून त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी वाहतूक सुविधा पुरवण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकगरोदर स्त्रिया यांनाही मतदान केंद्र पर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांना मदत हवीअशा एकूण 16219 मतदारांचा शोध प्रशासनाने घेतलेला आहे. त्यांना तशी वाहतूक सुविधा पुरवण्यात येणार आहे.
उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांमार्फत विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे निवडणूक खर्च तब्बल वेळा तपासण्यात येणार असून आज तपासणीचा अंतिम दिवस आहे. आतापर्यंत निवडणूक खर्च सादर न केलेल्या 15 उमेदवारांना नोटीस बजावलेल्या आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघावर राज्य निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष असून या मतदारसंघाची तसेच संपूर्ण जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढावी. यासाठी स्वीप अभियानाच्या माध्यमातून उद्या दिनांक 19 ऑक्टोबर 2019 रोजी चंद्रपूर शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी प्रत्येक मतदारसंघात मतदार बलून उभारले गेले आहे. रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या आहे. नवमतदारांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी 26 मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट वसवले जाणार आहे. तसेच या जनजागृतीमध्ये पत्रकारांचा मोठा वाटा असून मतदानासाठी तीन दिवस शिल्लक असताना माध्यमांनी मतदानाच्या जागृती करिता नेहमीसारखे विशेष सहकार्य करावेअशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान केंद्र सापडत नसेल तर 1950 या हेल्पलाइनवर संपर्क करावा. आतापर्यंत 1000 कॉल या हेल्पलाईनला प्राप्त झाले आहे. तसेच मतदारांच्या मदतीसाठी मराठी मध्ये मतदार मार्गदर्शकेची निर्मिती करण्यात आली आहेअशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
उद्या दिनांक 19 ऑक्टोबर 2019 च्या सायंकाळी वाजेपासून जाहीर प्रचार करणे थांबणार असून फेसबुक व्हाट्सअप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करणे ही आचारसंहितेचे उल्लंघन ठरणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून  बेकायदेशीररित्या प्रचार करणाऱ्यावर नोटीस बजावलेल्या आहेत. यावर प्रशासनाचे विशेष लक्ष असून मतदानाच्या दिवशी हॉटेलवर सुद्धा लक्ष राहणार आहे. यादरम्यान ओपिनियन कॉल प्रकाशित करणेही आचारसंहितेचे उल्लंघन ठरणार आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही पेडन्यूज प्रकाशित झाल्या असून त्यासंबंधीचे नोटीस उमेदवारांना पाठवलेले आहे. तसेच संबंधित पेडन्यूजचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी 100 मीटर परिसरात कोणताही प्रचार करण्यावर बंदी असून उमेदवारांना प्रतिबंधित क्षेत्र व्यतिरिक्त तंबू उभारता येणार आहे. त्यामध्ये एक टेबल व दोन खुर्च्या यापेक्षा जास्त साहित्य आढळून आल्यास ते बेकायदेशीर ठरवून त्यावर कारवाई करण्यात येईल.
मतदानाच्या हक्कापासून कामगार व मजूरवर्ग वंचित राहू नये याकरिता जिल्ह्यातील सर्व खासगी तसेच सरकारी प्रतिष्ठानांशी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कामगार आयुक्त व खासगी प्रतिष्ठानच्या प्रमुखांना 21 ऑक्टोबर रोजी सुट्टी देण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात एकूण हजार 926 पोस्टल बॅलेटने मतदान होणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे मतदानाची टक्केवारी 66.27 एवढी होती. ही टक्केवारी वाढावी यासाठी चंद्रपूर शहरातील व्यावसायिक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले असून त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात आले आहे. व्यवसायिकांच्या माध्यमातून देण्यात येणारी सूट ही स्वयंसेवी आहे. त्यासाठी प्रशासन कोणतीही आर्थिक मदत करत नाही. म्हणून त्यांनी स्वयंप्रेरणेने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच यावेळी जिल्ह्यातील सुजाण नागरिक चंद्रपूर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता नक्कीच या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन सहकार्य करेल करेलअशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
00000