Search This Blog

Friday 18 October 2019

आक्षेपार्ह पोस्ट आढळल्याने 17 व्हाट्सअप ग्रुपला नोटीस

चंद्रपूरदि. 17 ऑक्टोबर: सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आक्षेपार्ह मुजकुराद्वारे आचारसंहितेचा भंग करण्यात येत आहेअसे पोलीस विभागाचे निदर्शनास आले. उमेदवारांचे सर्व सोशल मीडियावर अकाउंट यासाठी तपासले जात आहे याशिवाय निवडणूक काळात अपप्रचार करणाऱ्या 17 व्हाट्सअप ग्रुप तसेच त्या ग्रुपमधील सदस्यांना कलम 149 अन्वये नोटीस बजावली आहे.
फेसबुक वरील गॅंग ऑफ चंद्रपूर या प्रोफाईलवर काही आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्या. या प्रोफाइल संबंधित असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. आचारसंहितेची काटेकोर पालन व्हावेयासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अनेक बंधने घातल्या गेली आहे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आक्षेपार्ह पोस्ट व्हाट्सअपफेसबुकइंस्टाग्रामयुट्यूब यावर शेअर केल्या जात आहेत. अशा पोस्ट द्वारे सामाजिक वातावरण बिघडण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस विभागाच्या सायबर सेलने सदर कारवाई केली आहे. यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असून अनेक व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक अकाउंट रडारवर असून चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे.
00000

No comments:

Post a Comment