Search This Blog

Tuesday 15 October 2019

वरोरा विधानसभा उमेदवारांच्या खर्चाची दुसऱ्यांदा तपासणी


चंद्रपूरदि. 5 ऑक्टोबर: आज दिनांक 5 ऑक्टोबर 2019 रोजी निवडणूक खर्च निरीक्षक के. विनोद कुमार यांनी निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेत वरोरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची पडताळणी केली. 
जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच निरीक्षण करण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेले निवडणूक खर्च निरीक्षक के. विनोद कुमार यांनी आज दुसऱ्यांदा वरोरा उपविभागीय कार्यालयातील निवडणूक खर्च विभागाला भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी मतदार संघातील निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांची निवडणुकीच्या खर्चाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडायच्या असून त्याकरिता  भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी  अधिकाऱ्यांनी  प्रयत्न करावे. उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण करताना विशेष काळजी घ्यावी. तसेच खर्चात तफावत आढळून आल्यास तात्काळ नोटीस बजावावीअशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
00000

No comments:

Post a Comment