Search This Blog

Tuesday, 15 October 2019

निवडणूक खर्च निरीक्षकांद्वारे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघांचे दुसऱ्यांदा निरीक्षण


चंद्रपूरदि. 15 ऑक्टोबर:निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्याकरिता निवडणूक खर्च निरीक्षक धृबाज्योती रॉय  यांनी आज दिनांक 15 ऑक्टोबर 2019 रोजी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील कोरपना तालुक्यातील सीमेवरील चांदापूर फाटा येथील चेक पोस्टला भेट दिली. तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघांचे उमेदवारांच्या खर्चाची पडताळणी केली.
निवडणूक खर्च निरीक्षक धृबाज्योती रॉय यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघांचे उमेदवारांच्या खर्चाची तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडायच्या असून त्याकरिता भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी  अधिकाऱ्यांनी  प्रयत्न करावे. उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण करताना विशेष काळजी घ्यावी. तसेच खर्चात तफावत आढळून आल्यास तात्काळ नोटीस बजावावीअशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
 तत्पूर्वी दिनांक 14 ऑक्टोबर 2019 रोजी निवडणूक खर्च निरीक्षक धृबाज्योती रॉय यांनी दुसऱ्यांदा राजुरा उपविभागीय कार्यालयातील निवडणूक खर्च विभागाला भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी मतदार संघातील निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांची निवडणुकीच्या खर्चाची तपासणी केली आणि अधिकाऱ्यांसोबत संवाद साधलातसेच त्यांनी तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या परसोडा येथील स्थायी तपासणी पथकाला भेट देऊन तेथील परिस्थीतीचा आढावा घेतला.
000000

No comments:

Post a Comment