चंद्रपूर, दि. 16 ऑक्टोबर: निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्याकरिता निवडणूक खर्च निरीक्षक धृबाज्योती रॉय यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2019 रोजी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची पडताळणी केली.
यावेळी चंद्रपूर मतदारसंघातील निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांची निवडणुकीच्या खर्चाची तपासणी केली. निवडणूक खर्च निरीक्षक धृबाज्योती रॉय यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघांचे उमेदवारांच्या खर्चाची तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडायच्या असून त्याकरिता भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण करताना विशेष काळजी घ्यावी. तसेच खर्चात तफावत आढळून आल्यास तात्काळ नोटीस बजावावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
000000

No comments:
Post a Comment