Search This Blog

Sunday 13 October 2019

वरोरा येथे दिव्यांग मतदार जनजागृती रॅली


चंद्रपूरदि2 ऑक्टोबरचंद्रपूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन ११ ऑक्टोबर २०१९ रोजी वरोरा येथील तहसील कार्यालय ते आंबेडकर चौकापर्यंत करण्यात आले होते.
रॅलीत आनंदवनातील संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळाआनंद मूकबधिर विद्यालयआनंद अंध विद्यालय,  येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी तसेच अनुदानित वसतिगृहातील  विद्यार्थ्यांनीसहभाग नोंदविला. सुमारे 500 च्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांनी वरोरा येथील नागरिकांना सुदृढ लोकशाही करीता शत प्रतिशत मतदान किती आवश्यक आहे हे पटवून दिले.  तसेच निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तीकरिता मतदान केंद्रावर उपलब्ध सोयी सुविधाबाबत जागृतीपर पथनाट्य आनंदवनातील दिव्यांग विद्यार्थांनी सादर केले व उपस्थितांची मने जिंकली
 सदर रॅलीचे आयोजन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील जाधवतहसिलदार सचिन गोसावीवरोरा व मुख्याधिकारी श्री. बल्लाळ, मुख्याध्यापक सोपान हंगेश्री. बांगडकरव्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नालगीनटवार यांची प्रमुख उपस्थिती होतीया रॅलीची सांगता आंबेडकर चौकात झाली. उपस्थित दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करण्यात आलेया  कार्यक्रमाकरीता सर्व शाळेचे मुख्याध्यापकव्यवस्थापकीय अधीक्षकसर्व शिक्षक व सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
00000

No comments:

Post a Comment