Search This Blog

Friday 11 October 2019

स्वीप अंतर्गत दिव्यांग जनजागृती रॅली


जिल्हाधिकाऱ्यांद्वारे हिरवी झेंडी दाखवून झाली सुरवात.
चंद्रपूर १० ऑक्टोबर - आगामी विधानसभा  निवडणुकीकरिता -2019 करीता ७१ चंद्रपूर विधानसभा मतदार संघात २१ ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक पात्र नागरिकांनी विशेषतः दिव्यांग मतदारांनी आपला मतदान हक्क बजावलाच पाहिजे याकरीता निवडणूक आयोग व  जिल्हा प्रशासनाद्वारे मतदान जनजागृती मोहीम राबविल्या जात आहेत. यावर्षी ६००० पेक्षा ज्यास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी  मतदार यादी मधे करण्यात आली आहे.  ग्रामपंचायतबीएलओ सर्व दिव्यांग मतदारांपर्यंत वैयक्तिकरित्या पोहचत आहेत.  मतदानाच्या दिवशी सर्व  दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर विशेष स्वयंसेवक सुद्धा राहतील. आज या जनजागृती रॅलीद्वारे दिव्यांग मतदार मतदानासंबंधी जनजागृती करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी मतदानासाठी पुढे यावे व मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिव्यांग जनजागृती रॅली उदघाटन प्रसंगी केले.           
दिव्यांगांचा निवडणुकीत सहभाग वाढावा तसेच त्यांना मतदान सुलभरित्या करता यावेयासाठी देशभर जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत १० ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरातून दिव्यांग कौशल्य विकास मल्टिपर्पज सोसायटीस्थानिक दिव्यांग बचत गटउम्मीद दिव्यांग बचत गटसारंग दिव्यांग बचत गटमूक बधीर विद्यालयबाबुपेठ यांचा सहभाग असलेली  दिव्यांग मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.  यावेळी निवडणूक विभागजिल्हा प्रशासन व स्वीप मोहिमेचं अधिकारी उपस्थित होते.
  यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मतदान करताना अडचणी येणार नाहीतयाबाबत काळजी घेण्यात येत आहे. याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनद्वारे मतदार जनजागृतीसाठी `सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (स्वीप) मोहीम राबविली जात आहे. मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगुन मतदानाचा टक्का वाढावायासाठी स्वीप महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मतदार जनजागृती कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाद्वारे विविध मोहीम राबविल्या जात आहेत.
  मतदानापासून दिव्यांग मतदारही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने   जोरदार तयारी केली आहे. दिव्यांगांना व्हीलचेअर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रिया सहजसुलभ व्हावीत्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग मोठ्या संख्येने वाढावा. याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांना आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदारसंघनिहाय दिव्यांग मतदारांची माहिती उपलब्ध करून ठेवावीत्यानुसार त्यांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहन व्यवस्थामतदान केंद्रावर रॅम्पपिण्याचे पाणीमदत कक्ष आदी व्यवस्थेसह दिव्यांग मतदारांना मतदानाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना मतदान करणे सुलभ होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दिव्यांग जनजागृती रॅली प्रसंगी  याप्रसंगी कल्पना शिंदे स्नेहल कन्नमवाररंजिता  बिस्वाससंध्या आत्रामआलीया खान. दर्शना चाफलेभाग्यश्री कोलतेजबा बचरसोना आईटलावारकल्पना ब्राम्हणेलता गुरनुलेनिलेश पाझारे पंकज मिश्रामुन्ना खोब्रागडेरुपेश रोहणकरमंगेश ढोलेसुभाष मोहुर्लेअनिल हांडगेसतीश मुल्लेवारआकाश ठेंगडेसचिन फुलझेलेराहुल खटीलक्ष्मण मृत्यालसुभाष बिस्वासमनोहर साहू,उत्तम सावदीनबंधू सरकारयोगिता चौरगंमपातेकिरण करमरकरआरिफ शेखविजय सोनावणे यांनी सहभाग दर्शविला.  

No comments:

Post a Comment