Search This Blog

Sunday 13 October 2019

मेडिकल स्टोअर्समध्ये बोटावरील शाई दाखवुन मिळवा 10 टक्के सूट

प्रशासनाच्या मार्गदर्शनात संत विजय व आरएक्स मेडिकल स्टोअर्सचा उपक्रम
चंद्रपूरदि. 12 ऑक्टोबर: येत्या 21 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या दिवशी जे नागरिक मतदान करणार आहेत. त्यांना स्वतःच्या बोटावरील मतदान केल्याची शाई दाखवून औषधांवर 10 टक्केची भरघोस सूट मिळवता येणार आहे.  जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहरातील श्री. संत विजय मेडिकल स्टोअर्स व आरएक्स मेडिकल अँड जनरल स्टोअर्स यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम 21 ऑक्टोबर पासून राबवण्याचे जाहीर केले असून त्यांनी तसे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना पत्राद्वारे रीतसर कळवले आहे. सर्वच प्रतिष्ठानाकडून अशी परवानगी घेतली जाणार आहे. या संदर्भाने परवानगी घ्यावी, असे स्वीप उपक्रमाचे नोडल अधीकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी स्पष्ट केले आहे.
            स्थानिक चंद्रपूर शहरातील मतदानाचा टक्का वाढावा. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शहरातील व्यवसायिकांसोबत नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून चंद्रपूर शहरातील मेडिकल स्टोअर्सनी मतदान केलेल्या नागरिकांना सूट देण्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये श्री. संत विजय मेडिकल स्टोअर्स हे एलआयसी बिल्डिंग जवळ स्थित आहे. यांनी  मतदान केलेल्या  नागरिकांना 21 ते 23 ऑक्टोबर  पर्यंत  औषधांच्या एकूण किमतीवर 10 टक्के सूट  देण्याचे जाहीर केलेले आहे. तसेच गणेश दंतुलवार यांचे आरएक्स मेडिकल अँड जनरल स्टोअर्स महसूल भवनाजवळ वसलेले आहे. तरी जे नागरिक 21 ऑक्टोबर रोजी मतदानाचा हक्क बजावतील त्यांनाच ही 10 टक्के सूट 31 ऑक्टोबर पर्यंत मिळणार आहे. तरी मतदार असलेल्या नागरिकांना ही महत्त्वाची संधी असून मतदान करून मेडिकल स्टोअर्सने जाहीर केलेल्या सुविधेचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केलेले आहे.

00000

No comments:

Post a Comment