Search This Blog

Saturday 5 October 2019

मतदानाची टक्केवारी वाढविण्यास फिरणार चित्ररथ


चंद्रपूर 3 ऑक्टोबर - स्वीप ( सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन ) अंतर्गत मतदान जनजागृती अभियान चंद्रपूर जिल्ह्यात लोककलेच्या माध्यमातून जनजागृती पथनाट्य व फिरते चित्र रथ माध्यमातून मतदान जनजागृती मोहिमेला 3 ऑक्टोबर रोजी सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते  हिरवी झेडीं दाखवून या उपक्रमाला सुरवात करण्यात आली.
भारत सरकारसूचना व प्रसारण मंत्रालयक्षेत्रीय आउटरीच ब्यूरोफील्ड ऑडिट ब्यूरो वर्धानिवडणूक आयोगमहाराष्ट्र राज्यतसेच  जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या स्वीप मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत  चंद्रपूर शहरातील रहदारीची ठिकाणे व गेल्या  निवडणुकीत जिथे मतदानाची टक्केवारी कमी होती अश्या १६ ठिकाणांची निवड करून मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
            आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून २१ ऑक्टोबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या राष्ट्रीय महोत्सवात १८ वर्षावरील सर्व मतदार मतदान करण्यासाठी सज्ज असणार आहेत.  १८ वर्षावरील सर्व युवकमहिला व वृद्ध तसेच दिव्यांग मतदारांनी मतदान करावे याकरिता जिल्हा निवडणूक विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदान जनजागृतीसाठी चंद्रपूर शहर व  जिल्ह्यात विविध ठिकाण चित्ररथ व माहिती फलके लावून जनजागृती केली जात आहे.
             यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून निवडणूक आयोगातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक जागी  लोककलेच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जात आहे. प्रलोभनांना नागरिकांनी बळी पडू नये त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारा मतदार जनजागृतीकरिता विशिष्ट पद्धतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या ठिकाणांची निवड करून त्याजागी चित्ररथ सर्वत्र फिरवून त्याद्वारे मतदानाचा संदेश दिला जात आहे.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, स्वीप नोडल अधिकारी ( जिल्हा ) दीपेंद्र लोखंडेजिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके स्वीप नोडल अधिकारी ( शहर ) श्री. युधिष्ठीर रैच उपस्थित होते. 
00000

No comments:

Post a Comment