Search This Blog

Saturday 12 October 2019

सुक्ष्म निरिक्षकांनी आपले काम काम चोखपणे पार पाडावे -डॉ. खेमनार


चंद्रपुर ११ ऑक्टोबर - आगामी विधानसभा निवडणूक निर्भयशांततापूर्ण आणि पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. त्यांनी आपले काम चोखपणे पार पाडावे. जेणेकरुन निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यास मदत होईलअसे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी व्यक्त केले.
            विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचा प्रशिक्षण वर्ग ११ ऑक्टोबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी या निवडणुकीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे तसेच निरीक्षक व निवडणुकीसंबंधित अधिकारी उपस्थित होते.
            याप्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले कीनिवडणूक प्रक्रिया हे राष्ट्रीय कार्य आहे.  या कामात कोणतीही चूक क्षम्य नाही. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे. महत्वपूर्ण असलेल्या या कामात हलगर्जीपणाहयगयचुका होवू देवू नका. आपल्यावरील जबाबदारी महत्वपूर्ण असून आपल्याला नेमून दिलेल्या कामकाजाचा सखोल अभ्यास करावा. निवडणूक प्रक्रिया समजून घ्यावी. निवडणूक प्रक्रिया सांघिकपणे काम करीत यशस्वी करावी. निवडणूक कामकाजात अडचणी आल्यातर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे. प्रत्येकाने नेमून दिलेले काम यशस्वीपणे पूर्ण करावे.
यावेळी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून व्हीव्हीपॅट इव्हिएम मशीनविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ३ तास चाललेल्या या प्रशिक्षण वर्गास सुक्ष्म निरीक्षकविविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
00000

No comments:

Post a Comment