Search This Blog

Tuesday 15 October 2019

मतदार जागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वीप बलूनचे अनावरण जिल्हा स्टेडियमवर उभारले १०० फूट उंच बलून

मतदार जागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वीप बलूनचे अनावरण
जिल्हा स्टेडियमवर उभारले १०० फूट उंच बलून
चंद्रपूर, १५ ऑक्टोबर -  मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगुन येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा याकरीता निवडणूक आयोग व  जिल्हा प्रशासनाद्वारे विविध जनजागृती मोहीम राबविल्या जात आहेत. मतदार जनजागृतीसाठी `सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (स्वीप) मोहीमेअंतर्गत जिल्हा स्टेडियमवर १०० फूट उंच असलेल्या स्वीप बलूनचे अनावरण १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते करण्यात आले.      
विधानसभा  निवडणुकीकरिता -2019 करीता चंद्रपूर विधानसभा मतदार संघात २१ ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीत मतदानाला अत्यंत महत्व असूनप्रत्येक पात्र नागरिकांनी आपला मतदान हक्क बजावलाच पाहिजे. याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार जनजागृतीसाठी `सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (स्वीप) मोहीम राबविली जात आहे. यात जिल्ह्यात विविध स्वीप कर्मचाऱ्यांद्वारे मतदार जनजागृती रॅलीरांगोळी स्पर्धासेल्फी पॉईंटपथनाट्यशाळांमध्ये शिक्षक पालक बैठकीमहाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम इत्यादींद्वारे सतत मतदार जनजागरण प्रशासनाद्वारे सुरु आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीप महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
            जिल्हा स्टेडियमच्या इमारतीवर उभारलेल्या या बलूनवर निवडणूक आयोगाच्या चिन्हाबरोबरच मतदानाची तारीख अंकित असून मतदारांच्या निवडणूकविषयक माहिती आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी असलेला १९५० हा टोल फ्री क्रमांकही यावर दर्शविण्यात आलेला आहे. जिल्हा स्टेडियमवर मोठ्या संख्येत येणारे नवमतदार तसेच शहरातील मतदारांना दुरून दिसणारा हा स्वीप बलून लोकशाहीच्या भव्य महोत्सवात सहभागी होण्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल.  
याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजाराजिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडेस्वीपचे नोडल अधिकारी युधिष्ठीर रैचसीएम फेलो रश्मी बबेरवाल तसेच स्वीप मोहिमेचे विशाल देशमुख  व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment