Search This Blog

Saturday 5 October 2019

स्वयंसेवी संस्था व्यापारी मंडळांचा लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग

स्वयंसेवी संस्था व्यापारी मंडळांचा लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग
मतदान केलेल्या नागरिकांना आकर्षक सूट देण्याचे व्यावसायिकांनी केले जाहीर
चंद्रपूरदि. ऑक्टोंबर: येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमातून प्रयत्न करणे सुरू आहे या अभियानाचा भाग म्हणून नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रपूर शहरातील व्यापारी संस्था तसेच व्यापारी मंडळाचे सोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीमध्ये शहरातील नागरिकांनी मतदान केल्यास त्यांना आकर्षक सूट दिल्या जाणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपक्रम सुरू केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत प्रत्येक मतदाराला आपला हक्क वापरता यावायासाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिककिराणा व्यवसायिक, मॉल, रेस्टोरंट, फूड सेंटर तसेच विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या सोबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना आवाहन करताना त्यांनी सांगितले कीया लोकशाहीच्या उत्सवांमध्ये मतदान करणार्‍या मतदात्याला लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवल्या बद्दल त्यांना सन्मानित करण्याची परंपरा रुजवावीअसे आवाहन त्यांनी केले.
यामध्ये व्यवसायिकांनी विविध मुद्दे उपस्थित केले. तसेच मतदान करून आलेल्या मतदाराला त्याच्या बोटावरील शाही बघून मोठ्या प्रमाणात सूट देण्याबाबत इच्छा व्यक्त केली. यासंदर्भात अधिकृत निवेदन व्यापारी संघटनांकडून जिल्हाधिकारी यांना दिले जाणार आहे. तसेच या उपक्रमाला चंद्रपूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सहकार्य करतीलअशी आशा या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली.
0000
2014 विधानसभा व  2019 लोकसभेच्या मतदानाच्या टक्केवारीचा आढावा
चंद्रपूर: दि, 3 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्याच्या 14 विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता अनेक उपक्रम सुरु केले आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या  17 लाख 59 हजार  134  होती. त्यापैकी  11 लक्ष  65 हजार 706  मतदारांनी  मतदानाचा हक्क बजावला.  यामध्ये लाख 15 हजार 630 पुरुष मतदार तर लाख 49 हजार 976 महिला मतदारांनी सहभाग नोंदवला. चंद्रपूर जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी 66.72 टक्के होती. यामध्ये सर्वाधिक ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात 74.83 टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ चिमूर मतदारसंघ 74. 55 टक्केराजुरा मतदारसंघ 70. 83 टक्केवरोरा मतदार संघ 64.81 टक्केबल्लारपूर 63. 18 तर सर्वात कमी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ 54.07 टक्के मतदान झाले होते.
आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 18 लाख 72 हजार 787 मतदारांची नोंदणी झालेली आहे. म्हणजे  1 लाख 13 हजार मतदारांची वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे  या मतदारांच्या झालेल्या वाढीमध्ये 22 मतदार तृतीयपंथी आहेत. एकूण मतदारांमध्ये 9 लाख 60 हजार 727 पुरुष मतदार तर लाख 18 हजार 938 महिला मतदारांचा समावेश आहे. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सहा मतदार संघात एकूण 66.50 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये राजुरा मतदारसंघात 69.61 टक्केबल्लारपूर 64.16 टक्केवरोरा 63.35  टक्केचंद्रपूर 53.10  टक्केचिमूर 73.52 टक्केब्रह्मपुरी 75.27 टक्के मतदान झाले होते.
आकडेवारी बघितल्यास चंद्रपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी इतर मतदारसंघाच्या तुलनेत 10 टक्केनी कमी आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाचे या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले असून विविध उपक्रम व अभियानाच्या माध्यमातून चंद्रपूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढावीयाकरिता अनेक उपक्रम राबवले जात आहे.
00000

No comments:

Post a Comment