Search This Blog

Sunday 31 January 2021

पोलीओचे रुग्ण भारतात आढळून येत नाही हा देशासाठी गौरव - जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले

 

पोलीओचे रुग्ण भारतात आढळून येत नाही हा देशासाठी गौरव 

- जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले

                                              

 पल्स पोलिओ मोहिमेचे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

 

चंद्रपूर, दि. 31 : जिल्ह्यात जिल्हा आरोग्य प्रशासनाचे वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहिम कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद, अध्यक्षा संध्या गुरनुले यांचे अध्यक्षतेखाली  व शुभहस्ते जिल्हा सामान्य रुग्णालय येथील पोलिओ बुथवर बालकास पोलिओ डोज पाजुन शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,  मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले  प्रमुखस्थानी  उपस्थित होते. सोबत डॉ.राजकुमार गहलोत ,जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.चंद्रपूर, डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, सा. रु.चंद्रपूर, डॉ. सोनारकर, वैद्यकिय अधिक्षक, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपूर  डॉ. हेमचंद कन्नाके, निवासी वैद्यकिय अधिक्षक बाहयसंपर्क , सा. रु. चंद्रपूर डॉ. राहुल भोंगळे, बालरोग तज्ञ, डॉ धवस, जनरल फिजीशीयन, उपस्थित होते.

 

यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष   संध्याताई गुरनुले  यांनी भारत  देशात पल्स पोलीओची  मोहिम  सुरुवातीपासुन उत्कृष्टपणे राबविण्यात आली,  त्यामुळे आजघडीला एकही पोलीओचा रुग्ण भारतात आढळून येत नाही  ही देशासाठी  गौरवाची  बाब आहे, असे सांगीतले. परंतु अजुनही आपल्या आसपासच्या देशात पोलीओचे रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे पोलीओचे समुळ उच्चाटनाकरीता  ही मोहिम राबविण्यात येत आहे.  सुदृढ बालके ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्यांच्या आरोग्याकडे नियमित लक्ष देने गरजेचे आहे व त्यामुळेच बालके निरोगी राहण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. याकरीता केंद्र व राज्यशासनातर्फे 31 जानेवारी या दिवशी पोलीओ मोहीम संपुर्ण भारतात एकाच वेळी राबविण्यात येत आहे. तरी संपुर्ण भारत पोलिओ मुक्त होने करीता सदर मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनतेला केले. यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी देखील बालकास पोलिओ डोज पाजला.

 

तसेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,  मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनीसुध्दा पोलीओ मोहिमचे महत्व यावेळी विशद केले व पालकांनी आपल्या बालकांना पोलीओ डोज द्यावा असे आवाहन केले. तसेच डॉ.राजकुमार गहलोत यांनी आपले प्रास्ताविकपर मार्गदर्शनात पल्स पोलीओ लसीकरणाबाबत वितृत माहिती यावेळी दिली.

 

सदर कार्यक्रमाचे संचालन डॉ. गजानन राउत, जिल्हा आयुष अधिकारी, यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेकरीता  जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे सुभाष सोरते, आर्टीस्ट , श्रीमती छाया पाटील पीएचएन, श्रीमती चंदा डहाके, एएनएम, शोभा भगत, पीएचएन व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

 राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिमेप्रसंगी जिल्ह्यात शहरी ,ग्रामीण भागात बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येत आहे. व ज्या बालकांना अनवधानाने पोलीओ डोज मिळालेला नाही त्यांचेकरीता दिनांक 1 ते 3 फेब्रुवारी पर्यंत ग्रामीण भागात  व 5 फेब्रुवारी पर्यंत शहरी भागात आय.पी.पी.आय. अंतर्गंत घरोघरी जाउन आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत पोलिओ डोज पाजण्यात येणार आहे. तरी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी कळविले आहे.

0000

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा

 

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा

 चंद्रपूरदि. 31 जानेवारी : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागखार जमिनी विकासआपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दिनाक 1 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे गडचिरोलीहून आगमन व जिल्हाधिकारी यांचेसमवेत विकास कामासंदर्भात चर्चा. स. 11.30 वा. ग्रामीण मार्ग व जिल्हा मार्ग योजनेअंतर्गत निवड व सनियंत्रण समितीची जिल्हाधिकारी कार्यालयातील वीसकलमी सभागृहात बैठक.  दु. 1 वा.  मग्रारोहयो संदर्भात विसकलमी सभागृहात संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक.  दु. 2.30 वा. आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने सुरू असलेल्या धान्य खरेदी बाबत संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत विस कलमी सभागृह येथे आढावा बैठक. सायं. 5 वा. नागपूरकडे प्रयाण.

0 0 0

जिल्ह्यात दोन लाख कोरोना तपासण्या

 


जिल्ह्यात दोन लाख कोरोना तपासण्या

गत 24 तासात 9 कोरोनामुक्त 

 6 पॉझिटिव्ह एक मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 22,554 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 128

 

चंद्रपूर, दि. 31 : जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 456 नमुने संकलीत करून कोरोना तपासणीला पाठविण्यात आले आहेत.   त्यापैकी एक लाख 75 हजार 375 नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह तर 23 हजार 74 नमूने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.‍ एक हजार 335 अहवाल प्रतिक्षाधीन असून 672 नमून्यांचा निष्कर्ष निघालेला नाही.

मागील 24 तासात 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 6 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीचा मृत्यू झाला आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 554 झाली आहे. सध्या 128 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आज मृत झालेल्यामध्ये राजूरा येथील 69 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 392 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 353, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या सहा रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील तीन, बल्लारपूर एक, भद्रावती एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

Saturday 30 January 2021

गत 24 तासात 22 कोरोनामुक्त

 


गत 24 तासात 22 कोरोनामुक्त  ; 19 पॉझिटिव्ह

 

Ø  आतापर्यंत 22,545 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 132

 

चंद्रपूर, दि. 30 :  जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 19 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 68 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 545 झाली आहे. सध्या 132 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 99 हजार 809 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 74 हजार 621 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 391 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 353, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 19 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील चार, भद्रावती सहा, मुल एक, वरोरा चार, कोरपना तीन व जीवती येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

0000

चंद्रपूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

 चंद्रपूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

 

चंद्रपूर दि.30  :-   चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे वतीने बंदीजनांकरिता काल कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारागृह अधीक्षक वैभव आगे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्या.डी.डी.फुलझेले,   उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये कारागृहाचे अतिरिक्त वरीष्ठ तुरुंगाधिकारी रविंद्र जगताप,   नागनाथ खैरे, विठ्ठल पवार, तुरुंग शिक्षक ललित मुंडे उपस्थित होते.   

 कारागृहाचे अतिरिक्त वरीष्ठ तुरुंगाधिकारी रविंद्र जगताप  यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाचे स्वरुप बंदीवांनाना समजावून सांगीतले. तद्नंतर न्या.डी.डी.फुलझेले, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी बंदीबांधवांना विधी सहाय्य व कायदेविषयक मार्गदर्शन  करीत प्रोबेशन ऑफेंडर्स ऍक्ट, सी.आर.पी.सी, ४३६, ४३७-ए, ४३७ - पोटालम ६ इत्यादीच्या लाभ याबाबत बंद्याना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणामध्ये वैभव आगे, कारागृह अधीक्षक यांनी कारागृहातील बंद्याचे अधिकार, जामीन मिळण्याचा अधिकार, कायदेविषयक सुविधा, ज्यामध्ये प्राधिकरणा मार्फत मोफत वकील, प्ली बार्गेनिंग इत्यादीबाबत मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे संचलन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले.

 शिबीराचे यशस्वीतेसाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम, तुरुंगाधिकारी नागनाथ खैरे,सुनिल वानखडे, विठ्ठल पवार,  कारागृहाचे सुभेदार, देवाजी फलके, शिवराम चवळे, सीताराम सुरकार, शिपाई लवकुश चव्हान, राजेंद्रसिंग ठाकूर,  विजय बन्सोडे, इत्यादीं सह इतर कारागृह कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.

00000

चंद्रपूर वनविभागातील भद्रावती वनपरिक्षेत्रात नर वाघाचा मृत्यू

 चंद्रपूर वनविभागातील भद्रावती वनपरिक्षेत्रात नर वाघाचा मृत्यू

 

चंद्रपूर,दि. 29 : दिनांक 28 जानेवारी रोजी चंद्रपूर वनविभागा अंतर्गत भद्रावती परिक्षेत्रातील नियतक्षेत्र चिपराळा येथे कक्ष क्रमांक 210 मध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान दुपारच्या सुमारास वन्यप्राणी वाघ (नर) मृत अवस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती विभागीय वन अधिकारी एस.व्ही.जगताप यांना मिळताच त्यांनी क्षेत्रीय कर्मचारी यांचेसह घटनास्थळी जावून पाहणी केली असता मृत वाघ कुजलेल्या व शाबुत अवस्थेत आढळून आला.

सदर मृत वाघाचे शवविच्छेदन डॉ रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजिव), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, डॉ. इ.डी.शेडमाके, पशुधन विकास अधिकारी, भद्रावती व डॉ राहूल सी.शेंद्रे, पशुधन विकास अधिकारी, वरोरा यांनी  एन.आर.प्रविण, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर, श्री बंडु धोतरे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) चे सदस्य, श्री मुकेश भांदककर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजिव) यांचे प्रतिनीधी, एस.व्ही.जगताप, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर, श्री एस.एल.लखमावाड, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू), चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर व श्री एम.पी.राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) भद्रावती यांचे समक्ष (Standard Operating Procedure) मानक कार्यपध्दती सुचना नुसार करण्यात येवून दहन करण्यात आले.

मृत वाघाचा एक दात झिजून तूटलेल्या अवस्थेत व तीन दात, मिश्या व नखे शाबुत अवस्थेत आढळून आले. शवविच्छेदन अहवाल अप्राप्त असून सदर वाघाचा मृत्यू वृध्दाप काळाने नैसर्गीकरीत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे चंद्रपूर वनवृत्ताच्या विभागीय वन अधिकारी एस.व्ही.जगताप यांनी कळविले आहे.

000000

Friday 29 January 2021

1 फेब्रुवारीला निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा

 1 फेब्रुवारीला निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा

 जिमाका, चंद्रपूर, दि:29, सर्व निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांच्या  निवृत्तीवेतन प्रकरणाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने दि. 1 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता मेळावा घेण्यात येत आहे.  सदर मेळाव्यास लेखा कोषभवन जिल्हा कोषागार कार्यालय,   येथे निवृत्ती धारक / कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी आपल्या अडचणी सोडवण्याचे दृष्टीने उपस्थित राहावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी कळविले आहे.

0000

गत 24 तासात 32 कोरोनामुक्त


 गत 24 तासात 32 कोरोनामुक्त 

18 पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 22,523 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 135

 

चंद्रपूर, दि. 29 :  जिल्ह्यात मागील 24 तासात 32 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 18 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 49 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 523 झाली आहे. सध्या 135 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 99 हजार 141 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 73 हजार 494 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील अजयपूर येथील 76 वर्षीय पुरूष व भद्रावती शहरातील 74 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 391 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 353, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 18 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील नऊ, भद्रावती चार, ब्रम्हपुरी एक, वरोरा दोन व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे..

0000

पुर्वपरवानगीने ध्वनीक्षेपक वापरण्यास वर्षातील 15 दिवस सुट


 पुर्वपरवानगीने ध्वनीक्षेपक वापरण्यास वर्षातील 15 दिवस सुट

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आदेश

 10 दिवस निश्चित ; 5दिवसांबाबत स्वतंत्र आदेश निघणार

शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ. आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, नवरात्री उत्सव,

 धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, 31 डिसेंबर चा समावेश

चंद्रपूर, दि. 29 :  सन 2021 मध्ये शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेश उत्सवातील 3 दिवस (अनंत चतुर्दशी व 2 दिवस), नवरात्री उत्सवातील अष्टमी व नवमी हे 2 दिवस, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व 31 डिसेंबर या 10 दिवसासाठी बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखुन सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाची /ध्वनीवर्धक वापरासाठी परवानगी देता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

या आदेशानुसार उपरोक्त प्रमाणे सुट दिलेल्या दिवसाकरीता सक्षम प्राधिकारी कडून परवानगी घेवुनच आणि त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक चा वापर करता येईल. ध्वनीवर्धक वापरासाठी वेळेत सुट देणे बाबत इतर 05 दिवसाचे बाबतीत स्वंतत्र आदेश निर्गमीत करण्यात येईल. त्याचप्रमाणे गणेश उत्सवाकरीता असलेले उर्वरीत 2 दिवसाचे बाबतीत सुध्दा स्वतंत्र आदेश निर्गमीत करण्यात येईल.

केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार, वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासुन ते रात्री 12 वाजेपर्यत सुट जाहिर करण्याकरीता, जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांनुसार जिल्हाधिकरी गुल्हाने यांनी 2021 करीता 15 दिवस निश्चित करण्याकरीता, ध्वनी प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक, चंद्रपूर, यांचेशी सल्लामसलत करुन 10 दिवस निश्चित केले असुन उर्वरीत 05 दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत.

000

सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न


 सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर, दि. 29 :  कृषी विभागाचे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), परंपरागत कृषी विकास योजना  (सेंद्रिय शेती) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी वरोरा व भद्रावती  यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम 28 जानेवारी रोजी संताजी मंदिर सभागृह, शेगांव (बु), ता. वरोरा येथे संपन्न झाला.

सदर प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, गरज व संधी, उपलब्ध बाजारपेठ, सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण, सेंद्रिय शेती करिता लागणाऱ्या निविष्ठा बाबत मार्गदर्शन व प्रत्यक्ष निविष्ठा तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव कथन, व शेती उपयोगी औजारे बाबत पाहणी व माहिती शेतकरी प्रशिक्षणाचे माध्यमातून देण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उपसंचालक तथा प्रकल्प उपसंचालक (आत्मा) आर. जे. मनोहरे यांनी केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी एम. ए. जाधव, शेतकरी सल्लागार समिती चे सुरेश गरमडे, शेतीतज्ञ हेमंतजी चव्हाण, विरेंद्र बरबटे, एम.एस. वरभे,  व्हि. पी. काळे, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तर सेंद्रिय शेती शेतकरी रवींद्र जिवतोडे, सुनील उमरे यांनी आपले शेतीतील अनुभव व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन व्हि. डी. घागी, यांनी केले तर  उपस्थितांचे आभार एस. सी. हिवसे यांनी मानले.

कार्यक्रमाला विनोद राऊत, धनराज असेकर, शंकर भरडे, अशोक बदकी, तसेच कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी व्ही. के. शेंडे, पी. के. देशमुख, एम एस आसेकर, सेंद्रिय शेती गटातील शेतकरी उपस्थित होते,

00000

Thursday 28 January 2021

31 जानेवारी रोजी पल्स पोलीओ रविवार


 31 जानेवारी रोजी पल्स पोलीओ रविवार

पोलीओच्या समुळ उच्चाटनासाठी बालकांना पोलीओ डोज द्या

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे नागरिकांना आवाहन

 

चंद्रपूर, दि. 28 :  पोलीओचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता 31 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेची राबविण्यात येत आहे. या दिवशी 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना बुथवर पोलीओ लस पाजण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या बालकांना पोलीओ लस देवून या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीसकलमी सभागृहात जिल्हा शिघ्र कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदीप गेडाम, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान एक याप्रमाणे 2052 लसीकरण केंद्रे व शहरी भागात 187 तर महानगरपालीका क्षेत्रात 317 अशी एकुण 2556 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात करण्यात आली आहेत. या व्यतीरीक्त प्रवासात असलेल्या बालकांना, स्थलांतंरीत होत असलेल्या बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलीओ लस मिळावी याकरीता 84 मोबाईल टिम ग्रामीण भागात व शहरी भागात 13  व महानगर पालीका क्षेत्रात 19 अशा एकुन 116 मोबाईल युनिट टिमची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय टोलनाका, बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, यात्रास्थळे या ठिकाणीसुध्दा  ट्राझिंट टिमव्दारे लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे.

या मोहिमेकरीता ग्रमिण विभागाकरीता 4658 व शहरी विभागाकरीता 462 व महानगर पालीका क्षेत्राकरीता 951 असे एकुन 6071  कर्मचारी नियुक्त केले असुन पर्यवेक्षणाकरीता  ग्रामिण विभागाकरीता 420 व शहरी विभागाकरीता 33 व महानगर क्षेत्राकरीता 63 असे एकुन 516 पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.

राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेअंतर्गत भारत देश संपूर्ण पोलीओ मुक्त करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. भारत देश लवकरात लवकर पोलीओ मुक्त व्हावा, भारतात पुढील काही वर्षात एकही पोलीओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, असा उदे्श समोर ठेवून दरवरर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

पोलीओ रोगाचे निर्मुलन करण्याचे हेतुने भारत सरकार 1995 पासुन पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबवित आहे. तसेच नियमित लसीकरण, ए.एफ.पी. सर्व्हेक्षण व पोलीओ रुग्ण आढळल्यास मॉप अप रॉउंड याव्दारे पोलीओ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. देशात जानेवारी 2011 नंतर अद्यापपर्यंत पोलीओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पोलीओ  निर्मुलन कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासुन प्रथमच अशा पध्दतीने यश मिळालेले आहे. जानेवारी 2014 मध्ये भारत देशास पोलीओ निर्मुलन प्रमाणपत्र मिळाले आहे.

000

अत्याचारग्रस्तांच्या आर्थिक सहाय्याचे प्रस्ताव प्राथमिकतेने निकाली काढा


अत्याचारग्रस्तांच्या आर्थिक सहाय्याचे प्रस्ताव प्राथमिकतेने निकाली काढा

दक्षता समिती आढाव्यात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे निर्देश

चंद्रपुर, दि.28 जानेवारी: अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यातील अत्याचारग्रस्तांचे आर्थिक सहाय्याचे प्रस्ताव प्राथमिकतेने निकाली काढण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज जिल्हा दक्षता आढावा बैठकीत दिल्या.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा आज  जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बैठकीला समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, विधी सल्लागार सारिका वंजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एस. येलकेवाड, जिल्हा सामान्य रुग्णलयाचे डॉ. जी. एम. मेश्राम, प्रशासन अधिकारी एन. बी. लिंगलवार, एकात्मिक आदिवासी विभागाचे नियोजन अधिकारी ए. एस. नंदनवार प्रामुख्याने उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी पुढे असेही सांगितले की गंभीर प्रकरणात अत्याचारग्रस्ताकडे जातीचा दाखला उपलब्ध नसल्यास गुन्ह्याची नोंद करतांना रक्ताच्या नात्यातील इतर व्यक्तीचा दाखला प्राथमिक स्वरूपात ग्राह्य मानण्यात यावा. पिडीत व्यक्तीच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधीतांना दिल्या.

समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी यावेळी अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियमान्वये आतापर्यंत नोंदविण्यात आलेले गुन्हे, न्यायप्रविष्ठ प्रकरणे व आर्थिक सहाय्याच्या प्रकरणाची माहिती सादर केली.

0000

श्रेडर मुळे पिकांचे उत्पादनात वाढ - कृषी सहसंचालक रवींद्र भोसले


 

श्रेडर मुळे पिकांचे उत्पादनात वाढ

-         कृषी सहसंचालक रवींद्र भोसले

चंद्रपूर, दि. 28 :  कापूस वेचल्यावर पराठी काढण्यासाठी श्रेडर यंत्राचा वापर केल्यास त्यामुळे पराठीचा भुगा होतो व कालांतराने ते जमिनीत कुजून सेंद्रिय कर्ब तयार होते. याचा उपयोग पुढच्या हंगामातील पिकांचे उत्पादन वाढीस होत असल्याचे कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी काल श्रेडरचे कापूस पिकातील फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगतांना केले.  

मौजा टाकळी येथे कापूस फरदड निर्मूलन मोहिमे अंतर्गत राम दादाजी सन्मानवार यांच्या शेतात कापूस श्रेडर चे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

            यावेळी भोसले यांनी श्रेडरमुळे कपाशीची पराठी भुगा केल्यास गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत होऊन पुढील उत्पत्ती थांबते व पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचा किडरोग नियंत्रणात येतो असेही सांगीतले. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी निराकरण केले.  

   राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत राकेश रामटेके यांना सन 2017-18 मध्ये कापूस श्रेडर यंत्राचा लाभ देण्यात आला, याचा उपयोग ते तालुक्यातील फरदड निर्मूलनासाठी करत असल्याचे तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव यांनी सांगितले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी उमाकांत झाडे, कृषी पर्यवेक्षक मारुती बर्वे, आनंद वाकडे, प्रवीण देऊळकर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

000

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत तीन विक्री केंद्राचे उद्घाटन

 

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत तीन विक्री केंद्राचे उद्घाटन

Ø  गोंडसावरी, पिंपळखुट व नंदगुरचा समावेश

चंद्रपूर, दि. 28 :  विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडसावरी, पिंपळखुट व नंदगुर येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी उभारलेल्या विक्री केंद्राचे उद्घाटन नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, यांचे हस्ते काल संपन्न झाले.

 याप्रसंगी कृषी उपसंचालक तथा प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड,  उषा तरोणे, रविंद्र कन्नाके, आतिस आत्राम, भाविक आत्राम, गाडगे व गटातील  इतर शेतकरी उपस्थित होते.

0000

गत 24 तासात 23 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 23 कोरोनामुक्त 

16 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 22,491 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 151

 

चंद्रपूर, दि. 28 :  जिल्ह्यात मागील 24 तासात 23 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 16 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 31 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 491 झाली आहे. सध्या 151 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 98 हजार 274 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 72 हजार 398 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील तुकुम येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 389 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 351, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 16 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील पाच, चंद्रपूर तालुका एक, बल्लारपूर चार, भद्रावती एक, ब्रम्हपुरी दोन, वरोरा दोन व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे..

0000

Wednesday 27 January 2021

1 फेब्रुवारीपासून दुचाकीवर हेल्मेटचा वापर अनिवार्य

 1 फेब्रुवारीपासून दुचाकीवर हेल्मेटचा वापर अनिवार्य

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकरी अजय गुल्हाने यांचे आदेश

 

चंद्रपूर दि. 27 : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद व सर्व शासकीय यंत्रणामध्ये कार्यालयात येताना अथवा कोणत्याही कामासाठी दुचाकी वाहन वापरताना शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करने अनिवार्य असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

        या आदेशाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2021 पासून करण्यात येणार असून हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधीत अधिकारी व कर्मचारी हा मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील व त्यांची गंभीर नोंद घेण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

        मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होणेकरीता दरवर्षी संपुर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सोबत राज्यात रस्ता सुरक्षा पंधरवाडा साजरा करण्यात येतो. मोटार वाहन अधिनियमानुसार कोणतेही दोन चाकी वाहन रस्त्यावर चालविताना हेल्मेट परिधान करणे हे सक्तीचे आहे. तसेच वेळोवळी मा. उच्च न्यायालय व मा.सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे हे सक्तीचे असल्याबाबत निर्णय दिलेले आहेत. या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले आहे.

तसेच जिल्ह्यातील इतर सर्व खाजगी क्षेत्रातील आस्थापना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, एम.आय.डी.सी., शाळा, महाविद्यालय व कंपन्या यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरासंबंधी प्रवृत्त करावे व यासाठी व्यवस्थापकीय स्तरावर नियंत्रण ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी त्यांना विनंती केली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

0000

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा चंद्रपूर दौरा


जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा दौरा

चंद्रपूर दि. 27 : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे 28 जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            दि. 28 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वा. ब्रम्हपुरी येथे गडचिरोलीहून आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 वा. मुल कडे प्रयाण. सायं. 7.30 वा. मुल येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8.15 ते 9 राखीव. रात्री 9 वा. चंद्रपूर शहराकडे प्रयाण. रात्री 10 वा. चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.

000