Search This Blog

Sunday 24 January 2021

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा

 


पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा

 चंद्रपूर, दि. 24 जानेवारी : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार हे दिनांक 25, 26 व  27 जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.45 वा. शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे नागपूरहून आगमन व राखीव. दु. 12 वा. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने स्व. राजीव गांधी स्वावलंबन कर्ज योजनेतील कर्ज वितरण कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात उपस्थिती. दु. 2 वा. जिल्हा नियोजन विकास परिषदेच्या बैठकीस नियोजन भवन येथे उपस्थिती.  सायं. 6 वा. एकतानगर येथे सदिच्छा भेट. रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह येथेअगमन व मुक्काम.

दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 वाजता गांधी चौक येथे पक्ष समितीच्या झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे राखीव. सकाळी 9.05 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोजन कार्यक्रमास पोलीस ग्राऊंड चंद्रपूर येथे उपस्थिती. दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1.30 वा. सावली कडे प्रयाण. दु. 2.30 वा. सिंचाई भवन विश्रामगृह येथे आगमन व नगर पंचायत पदाधिकारी यांचेसमवेत बैठकीस उपस्थिती. साय. 4.30 वा. पालकमंत्री कबड्डी चषक स्पर्धा सावलीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 वा. सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.45 वा. शासकीय विश्रामगृह चिमूर येथे गडचिरोलीहून आगमन व राखीव. सकाळी 11 वा. नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिमूर च्या नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळा व सांस्कृतिक समारंभास उपस्थिती. दुपारी 2 वा. चिमूर वरून नागपूरकडे प्रयाण.

0 0 0

No comments:

Post a Comment