लोककला व पथनाट्य निवड सूचीसाठी अर्ज आमंत्रित
चंद्रपूर, दि. 1 जानेवारी : शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत लोककला व पथनाट्यच्या माध्यमातून सादर करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निवड यादी तयार करण्यात येत असून यासाठी इच्छुक संस्थांकडून 21 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.
अर्ज सादर करण्यासाठी पथकाला शासकीय योजनांसह विविध विषयांवर पथनाट्य करण्याचा अनुभव असावा, पथक किमान दहा जणांचे असावे, त्यात स्री, पुरूष, वादक यांचा समावेश असावा, संस्थेची स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असावी. केंद्र सरकारच्या गीत व नाट्य विभागाकडे नोंदणीकृत असल्यास प्राधाण्य देण्यात येईल.
निवड सूचीसाठी अर्जाचा नमुना व माहितीपत्रक जिल्हा माहिती कार्यालय तसेच dgipr.maharashtra.gov.in व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
तरी जिल्ह्यातील गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य बहुरूपी, भारूड इ. लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या इच्छुक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालय, पहिला माळा, प्रशासकीय इमारत, बस स्टँड समोर, चंद्रपूर, येथे 21 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment