Search This Blog

Thursday 7 January 2021

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा सुधारीत दौरा

 

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा सुधारीत दौरा

 चंद्रपूर, दि. 7 जानेवारी : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा येथील दिनांक 8 जानेवारी रोजीचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. ब्रम्हपुरी निवासस्थान येथे नागपूरहून आगमन व राखीव. दु. 1.20 वा. पालकमंत्री यांचे निवासस्थान, ब्रम्हपुरी येथून शासकीय तंत्रनिकेतन मैदान ब्रम्हपुरीकडे प्रयाण. दु. 1.30 वा. शासकीय तंत्रनिकेतन मैदान ब्रम्हपुरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत व मुख्यमंत्री यांच्या नियोजित घोडाझरी कॅनलची पाहणी दौऱ्यास उपस्थिती. दु. 2.40 वा. शासकीय तंत्रनिकेतन मैदान ब्रम्हपुरी येथून निवासस्थानकडे प्रयाण. दु. 3 वा. पालकमंत्री यांचे निवासस्थान, ब्रम्हपुरी, येथे आगमन व राखीव. सायं. 6.15 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ब्रम्हपुरी येथे मुक्काम.

0000

 

No comments:

Post a Comment