Search This Blog

Friday 8 January 2021

गत 24 तासात 56 कोरोनामुक्त

गत 24 तासात 56 कोरोनामुक्त

48 नव्याने पॉझिटिव्ह एक मृत्यू

 

Ø  आतापर्यंत 1,83,754 नमुन्यांची तपासणी

Ø  उपचार घेत असलेले बाधित 330

चंद्रपूरदि. 8 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 56 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 48 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 604 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 897 झाली आहे. सध्या 330 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 83 हजार 754 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 58 हजार 777 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये गौराळा वार्ड भद्रावती येथील 54 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 377 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 344, तेलंगणा एकबुलडाणा एकगडचिरोली 18, यवतमाळ 11, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 48 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 25, बल्लारपुर दोनभद्रावती पाचमूल एकपोंभुर्णा एकराजूरा एकचिमूर दोनवरोरा चारकोरपना दोनजिवती तीन व इतर ठिकाणचे दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाहीकोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावेबाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावावेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000  

No comments:

Post a Comment