Search This Blog

Tuesday 12 January 2021

मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रणासाठी उपायोजना


 

मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रणासाठी उपायोजना

चंद्रपूर, दि. 12 जानेवारी : मका पीकावर नवीन लष्करी किडीचा प्रादुर्भाव १० ते २० टक्के आढळून आल्यास पुढीप्रमाणे उपाय योजावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.

१.स्वच्छता मोहीम राबवावी व नत्र खताचा अवास्तव वापर टाळावा पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत एकरी २० या प्रमाणे पक्षी थांबे उभारावे (३० दिवसापर्यंत)

२.पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत पानावरील समुहात दिलेली अंडी किंवा अळ्यांचा समुह असलेली प्रादुर्भाव ग्रस्तपाने अंडी/अळ्यांसहीत नष्ट करावी.

३. प्रादुर्भाव दिसताच प्रादुर्भावग्रस्त पोंग्यामध्ये सुकलेली वाळू टाकावी.

४.पतंग मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा एकरी पंधरा या प्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबर प्राधान्याने सुरूवातीच्या पोंगे अवस्थेत लावावे.

५. रासायनिक किटकनाशकांचा वापर- अळी पोंग्यामध्ये उपजिवीका करीत असल्यामुळे रासायनिक  किटकनाशकाची जास्त घनफळाच्या फवारणी (नॅपसॅक) पंपाद्वारे फवारणी केल्यास फवारणीचे द्रावण पोंग्यात जाऊन नियंत्रण मिळते.

६.फवारणीसाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल ९.३ टक्के प्रवाही + ल्यॅब्डा सायहेलोथ्रिन ४.६ टक्के झेडसी प्रवाही ५  मिली किंवा स्पिनेटोराम  ११.७ टक्के एससी प्रवाही ५.१२ मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के किंवा प्रवाही एससी ४.३२ मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट ५ टक्के एसजी ८ ग्रॅम किंवा इमामेक्टीन  बेंझोएट ५ टक्के + ल्युफेनुरॉन ४० टक्के डब्ल्युजी १.६ ग्रॅम पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रति १०  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील उपाययोजना आखण्याबाबत कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

000

No comments:

Post a Comment