Search This Blog

Monday 28 January 2019

जिल्हयातील गारपीटग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्यात यावे : ना. मुनगंटीवार



पोंभुर्णा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे लोकार्पण
सभागृहाच्या नूतणीकरणाचे लोकार्पण व रस्त्याचे भूमिपूजन

चंद्रपूर दि.28 जानेवारी : जिल्हयामध्ये झालेल्या गारपीटग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे केली. प्रजासत्ताक दिनाच्या शुभपर्वावर पोंभुर्णा येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे लोकार्पण, सभागृहाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण तसेच 2 कोटी किमतीच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
        25 जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला निर्देश दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पोंभुर्णा व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमांना उपस्थित होते.
        या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मामूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयरपोंभूर्णाच्या नगराध्यक्ष श्वेता वनकरसभापती अलका आत्रामगजानन गोरंटीवार, विनोद देशमुख,रजिया कुरेशीयाशिवाय ग्रंथ चळवळीचे अभ्यासक अनिल बोरगमवार हे देखील उपस्थित होते.
      यावेळी बोलताना बल्लारपूर मतदारसंघ हा शंभर टक्के गॅसयुक्त, आरोयुक्त आदी सर्व अंगणवाड्या आयएसओ मानांकन धारक व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
     पोंभुर्णा येथील युवकांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन नियमित मिळावेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा सरकारी नोकरीतील टक्का वाढवताना पोंभूर्णा सारख्या तालुक्यातील युवकांची देखील यामध्ये वर्णी लागावी. यासाठी श्यामाप्रसाद वाचनालयाची सुरुवात आपण या ठिकाणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. या वाचनालयांमध्ये नियमित वाचनाच्या पुस्तकांसोबतच स्पर्धापरीक्षांना उपयुक्त असणारे पुस्तक उपलब्ध करून द्यायचे,  निर्देश त्यांनी यावेळी दिले. सोबतच कॉलेजच्या प्रत्येक वर्षाची पुस्तकेदेखील याठिकाणी उपलब्ध असावीत. ज्यामुळे गरीब व सुविधा नसलेल्या कुटुंबातील मुलांना आपले स्नातकस्नातकोत्तर शिक्षण या वाचनालयांमध्ये अभ्यास करून करता यावे. यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
        यावेळी बोलताना त्यांनी पोंभूर्णा तालुक्यांमध्ये गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या विविध विकासकामांबाबतची माहिती दिली. पोंभुर्णा एमआयडीसीला लवकरच सुरुवात होत असून या ठिकाणी पर्यावरण पूरक उद्योगाला निमंत्रित करण्यात येत आहे. टाटा ट्रस्टच्या मदतीने उन्नत शेती या कार्यक्रमाअंतर्गत समूह शेतीचे काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच या ठिकाणी स्वीट क्रांतीला सुरुवात झाली असून पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम यांच्या नेतृत्वात मध निर्मितीबाबत महिला बचत गटांना स्वयंपूर्ण करण्याची मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय कापडी पिशव्या तयार करणेअगरबत्ती क्लस्टर निर्माण करणे, टूथपिक उद्योगाला चालना देणे,चांदा ते बांदा योजनेअंतर्गत बंधारे निर्माण करणे आदी विविध उपक्रम हाती घेतले असून या ठिकाणच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
      हा मतदारसंघ 100गॅस युक्त व्हावा, प्रत्येक घरामध्ये गॅस वापरला जावा. प्रत्येक गावांमध्ये शुद्ध पेयजलासाठी आरो मशीन लागावी आणि गावातील प्रत्येक अंगणवाडी आयएसओ मानांकन प्राप्त असावी अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
      त्यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये आपल्या मतदारसंघातील मूल, पोंभूर्णा व बल्लारपूर या तीनही नगरपरिषदांचा अंतर्भाव असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या तीनही नगर परिषद व नगरपालिकाच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी अतिशय उत्तम काम केले असून भविष्यात देखील हे काम उत्तम होत राहावे व स्वच्छ भारत अभियानात हे तीनही शहर पुढे कायम असावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
                                                                        000

चिचडोह बॅरेजमुळे जिल्ह्यातील 28 गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ


चंद्रपूर, दि.28 जानेवारी- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात बांधण्यात येत असलेल्या चिचडोह बॅरेजमुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 11 हजार 510 हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील 28गावांतील 5 हजार 580 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. 
चिचडोह बॅरेजला 2008-09 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली.  28272.86 लाख रुपये खर्चून हा बॅरेज बांधण्यात येणार आहे. या बॅरेजचे काम प्रगतीपथावर असून लवकरच या बॅरेजचे लोकार्पण होणार आहे. या योजनेमुळे कोणतेही गावठाण बाधित होत नसल्याने पुनर्वसनाची गरज नव्हती. त्यामुळे विनाअडथळा या बॅरेजचे काम गतीने सुरू आहे. 2011 पासून या बॅरेजच्या कामाला सुरुवात झाली. कॉक्रिंट बॅरेजच बांधकाम तसेच द्वार उभारणीचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत 5.85 मीटर उंची एवढा पाणीसाठा करण्यात आला आहे. मार्च 2019 पर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रस्तातिव असूनकाम अंतिम टप्प्यात आहे.
                                                            000

चंद्रपूरची पत्रकारिता महाराष्ट्राला प्रेरणादायी असावी : ना.सुधीर मुनगंटीवार


2 कोटीच्या अद्यावत पत्रकार भवनाचे भूमिपूजन
चंद्रपूर दि 26 जानेवारी : दर्पणकारांच्या भाषेत पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. लोकशाही पत्रकाराशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यामुळे लोकशाहीचे सर्व स्तंभ सशक्त असावेत यासाठी जिल्ह्यातल्या सर्व पत्रकार संघाच्या इमारतींना मदत केली जात आहे. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची इमारत देखील महाराष्ट्रातील एक देखणी इमारत होईल, तथापि या ठिकाणावरून प्रेरणादायी पत्रकारितेचा आदर्श निर्माण व्हावा, राज्याच्या प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात चंद्रपूरचा एक तरी पत्रकार असावा, अशी अपेक्षा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पत्रकार संघाच्या इमारतीच्या भूमिपूजनाला उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
          चंद्रपूर येथील वरोरा नाका या ठिकाणी असणाऱ्या 35 वर्ष जुन्या श्रमिक पत्रकार संघाला नवीन वास्तू मिळत आहे. 2 कोटीची चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची इमारत पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत तयार होणार आहे. यामध्ये पत्रकारांना आवश्यक असणाऱ्या ग्रंथालय, संगणक कक्ष व अन्य आधुनिक सुविधांचा समावेश आहे.
          पत्रकार संघाच्या या भूमिपूजन कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राखी कांचर्लवार यांच्यासह श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विघनेश्वर, माजी अध्यक्ष प्रमोद काकडे उपस्थित होते.
        लोकशाहीच्या चारही स्तंभाला बळकट करण्याचे आपले धोरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह जिल्ह्यातील न्यायालये, प्रशासकीय भवन, यासोबतच पत्रकार संघाचे कार्यालय देखील आधुनिक असावे याकडे आपला कटाक्ष आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पत्रकार संघाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या इमारती तसेच तालुकास्तरावर पत्रकारांच्या मागणीनुसार पत्रकार भवनाची निर्मिती केली जात आहे. या ठिकाणी उत्तम संदर्भ ग्रंथ, संगणकीय व्यवस्था, इंटरनेट कनेक्टीव्हीटी राहावी याबाबतही आपण लक्ष दिले आहे.
            राज्यस्तरावर पत्रकारांच्या निवृत्तीवेतनाच्या मागणीपासून तर शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमध्ये वाढीव डिपॉझिट जमा करण्यापर्यंत अर्थ मंत्री म्हणून अतिशय सकारात्मक पाऊल उचलले आहे. समाजाच्या उन्नतीसाठी झटणारा पत्रकार जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला मदत झाली पाहिजे असे आपले एक राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक मत आहे. त्यामुळे पत्रकारांनी पेन्शन योजनेसाठी अतिशय कमी पैशांची मागणी केली असतानाही आपण 15 कोटी  रुपयांची तरतूद केली. यामध्ये अधिक वाढ हवी असल्यास आपल्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना यासंदर्भात माझी भेट घ्यायला सांगावे, शक्य ती मदत करू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकारांच्या संदर्भातील सर्व योजनांचा लाभ जिल्हास्तरावरही मिळावा याबाबत आपण सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा, सोयी चंद्रपूरमध्ये मिळाव्यात याबाबत आपला कटाक्ष आहे. चंद्रपूरचा पत्रकार ज्ञानसंपन्न, टेक्नोसॅव्ही, अनुभवी, सकारात्मक दृष्टी बाळगणारा असावा. सोबतच राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये चंद्रपूरचा कायम सहभाग असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परवा सह्याद्रीवर चंद्रपूरच्या पत्रकाराने राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारला तेव्हा आनंद झाल्याची भावना व्यक्त केली.
       चंद्रपूरचे निर्माणाधीन पत्रकार भवन हे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या बाजुलाच आहे. त्यामुळे या परिसरात असणाऱ्या सर्व रस्त्यांचे व चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. त्यामुळे या इमारतीला आणखी झळाळी येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले . पुढील 15 ऑगस्टपर्यंत ही इमारत तयार व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.
        केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी देखील यावेळी पत्रकारांना संबोधित केले. प्रजासत्ताक दिनाला एका चांगल्या कामाचे भूमिपूजन या ठिकाणी होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असून प्रजासत्ताक दिनाला या लेखणीच्या उपासकांसाठी एक अद्यावत भवन निर्माण करीत असल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले. पत्रकारांनी समर्पित भावनेने या व्यवसायात कार्य करावे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील यावेळी संबोधित केले. चंद्रपूर मधील पत्रकारितेने आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले. या नव्या इमारतीतून उत्तम पद्धतीचे लेखन व्हावे, त्यामध्ये भर पडावी,अशी इच्छा व्यक्त केली
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांनी केले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे भवन साकारत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या निवृत्ती योजनेमध्ये मोठ्या संख्येने राज्य शासनाने भरीव रक्कम ठेवावी व त्याची व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
     या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ पत्रकार किशोरभाऊ पोतणवार, श्रीधर बल्की, मोहन रायपुरे, बंडूभाऊ लडके आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पंकज मोहरील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.
0000

चंद्रपूर जिल्ह्यातील 70 हजार शेतकरी, शेतमजुराचा जिल्हा प्रशासन काढणार कायमचा सुरक्षा विमा


69 व्या प्रजासत्ताक दिनाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
वीर मरण आलेले पोलीस कर्मचारी प्रकाश मेश्राम यांच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत 
अन्नधान्य वाटपासाठी मिशन दिनदयाल ;दिव्यांगांसाठी मिशन अटल दिव्यांग स्वावलंबन योजना
रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांसाठी जिल्हास्तरावर सुरक्षा यंत्रणा कक्ष
माहिलांच्या स्वावलंबनासाठी हिरकणी बचत गट योजना
केशरी कार्डधारकांना देखील आता 2 व 3 रूपये दरात अन्नधान्य 
500 कोटीचा चिचडोह प्रकल्पाचे राष्ट्रपतींच्याहस्ते लवकरच लोकार्पण
चांदा ते बांदा योजनेतून शेकडो बांध उभारणार

चंद्रपूर, दि. 26 जानेवारी : गेल्या चार वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 30 हजार हेक्टर सिंचनाची वाढ झाली आहे. चांदा ते बांदा योजनेतून शेकडो बांध उभे राहणार आहेत. लवकरच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला सिंचन क्षमता वाढविण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या चिचडोह प्रकल्पाचे राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सर्व सुविधा उपलब्ध करीत असताना गरीब शेतकरी, शेतमजूरांच्या जीवित्वाची जबाबदारी आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घेण्याची घोषणा आज मी करत असून चंद्रपूर जिल्ह्यातील 70 हजार शेतकरीशेतमजूर यांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून आयुष्यभराचा विमा काढला जाईलअशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केली. प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला संबोधित करीत होते.
             पावसाळी वातावरण असताना देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी व सामान्य नागरिक आजच्या प्रजासत्ताक कार्यक्रमाला उपस्थित होते. पोलीस ग्राऊंड मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर,आमदार नानाभाऊ शामकुळेजिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळेमहापौर अंजलीताई घोटेकरजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डीमनपा आयुक्त संजय काकडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध पदाधिकारी स्वातंत्र्य सैनिक सर्व क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
       विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आजच्या महत्त्वपूर्ण संबोधनाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवात केली. कधीकाळी आपण देखील विद्यार्थिदशेत या ठिकाणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे भाषण ऐकायला गर्दीत येत होतो. आपल्या राज्यघटनेमध्ये शक्ती आहे की एका सामान्य माणसाला देखील या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संबोधित करण्याची संधी दिली जाते. आपल्यापैकी एकाला भविष्यात ही संधी मिळणार आहे. अशा शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
    जिल्हयामध्ये गेल्या काही दिवसात त्यांनी सुरू केलेल्या विशेष उपक्रमांचा यावेळी त्यांनी उल्लेख केला. ही वाघांची आणि पराक्रमाची भूमी असल्यामुळे येथील युवकांनी वाघाप्रमाणे पराक्रम गाजवावा व भारतामध्ये या जिल्ह्याचे नाव अग्रकमाने घेतले जाईल असे कार्य करावे अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. प्रत्येक क्षेत्रात विशेष कार्य करून देशसेवा घडू शकते असे त्यांनी यावेळी सांगितले ते म्हणाले...
चाहता हूँ कोई नेक काम हो जाए
मेरी हर साँसदेश के नाम हो जाए
            यावेळी त्यांनी मिशन शौर्य गाजवणाऱ्या मुलांचे कौतुक केले. ज्यांनी कधी विमान बघितले नाही अशा आदिवासी विद्यार्थ्यांनी विमानाच्या उंचीवरील एव्हरेस्ट सर करून चंद्रपूरचे नाव देखील अजरामर केले. यावेळी त्यांनी युवकांनी मिशन सेवा अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शासकीय नोकरीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मुलांचा टक्का वाढविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमांमध्ये या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाचनालय उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       मिशन सेवा सोबतच आता मिशन शक्तीच्या माध्यमातून भारत मातेच्या चरणी ऑलम्पिक   मेडल मिळवणाऱ्यात चंद्रपूर-गडचिरोलीचे विद्यार्थी असावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल उभारत असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर मध्ये ज्युबिली हायस्कुलच्या मागे वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे क्रीडा संकुलाचे लवकरच उद्घाटन करत असल्याचे त्यांनी यावेळी घोषणा केली.
     आज जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही घोषणा त्यांनी आपल्या भाषणात केल्यात. जिल्ह्यातील गरीब कुटुंब जे गरिबी रेषेच्या खाली नाहीत. परंतु गरीब आहेत अशांसाठी मिशन दीनदयाल अन्नधान्य स्वावलंबन योजना आजपासून जिल्ह्यात लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांना एपीएल मध्ये अन्नधान्य मिळत नाहीत. अशा भगवे कार्डधारकांना देखील या पुढे दोन-तीन रुपये दराने धान्य मिळेलअशी घोषणा त्यांनी केली.
           दिव्यांग व्यक्तींच्या  संदर्भातील राज्य शासनाची सकारात्मक भूमिकेला मांडताना त्यांनी जिल्ह्यासाठी मिशन अटल दिव्यांग स्वावलंबन योजनेची आज घोषणा केली. 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या मात्र हाताने गाडी चालू शकणार या व्यक्तीला 45 हजार रुपये किमतीची बॅटरीवर चालणारी गाडी दिल्या जाईल, असे घोषित केले. याहीपुढे जाऊन दिव्यांग स्वतः रोजगार करू शकतात अशा 100 लोकांना सुरुवातीला 3.45 लक्ष रुपयांचे कर्ज उपलब्ध केले जाईल असे सांगितले.
      जिल्हयामध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी यापुढे जिल्हा पोलीस प्रशासन घेईल असे सांगताना त्यांनी 'आम्ही घेतो काळजी महिला-मुलींची या घोषणे अंतर्गत जिल्ह्यामध्ये पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाईल. महिला हेल्पलाईन व वॉटस्ॲप नंबर देण्यात येईल. आवश्यकता असतांना पोलिसांचे संरक्षणपोलिसांचे वाहनरात्रपाळीतील महिलांना दिले जाईल असेही स्पष्ट केले.
     बचत गट ही महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे. यासाठी चंद्रपूर आणि लातुर  जिल्ह्यामध्ये हिरकणी बचत योजना सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. नाविण्यपूर्ण काम करणा-या  बचत गटांना तालुकास्तरावर प्रोत्साहित करण्यासाठी 1 कोटी 10 लक्ष रुपयांची तरतूद मंत्री मंडळाच्या निर्णयात  केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
       चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस दलाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आपण कटिबद्ध आहे. गेल्या वर्षभरात शहीद छत्रपती चिडे व वीरमरण आलेल्या प्रकाश मेश्राम यांच्या दुर्घटनांचा उल्लेख करून त्यांनी पोलिसांच्या मदतीला समाजातील सज्जन शक्ती उभी राहावी, पोलीस मित्र तयार व्हावे यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये सशक्त युवा निर्मितीसाठी दीड कोटीचे व्यायाम शाळा उभारण्यात येईलअशी घोषणा  यावेळी केली.
       जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन, प्रशासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगून त्यांनी जिल्हयातील 70 हजार गरीब शेतकरी, शेतमजूरांचा विमा काढणार असल्याचे सांगितले. 12 रुपये वर्षाला देखील अनेक शेतकरी भरु शकत नाही. मात्र संकटकाळात व दुर्देवी घटनात विमाच काढला नसल्याचे पुढे येते. त्यामुळे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून जिल्हा प्रशासन अशा शेतक-यांचा आयुष्यभराचा विमा काढेल, अशी घोषणा त्यांनी केली.
 पळसगाव आमडीचिचडोह आदी सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होत आहे. लोकार्पण नजीकच्या काळात होत असल्याचे सांगितले.आतापर्यंत 30 हजार हेक्टर सिंचन वाढ जिल्हयात झाली आहे. पुढील दिड वर्षात हे सिंचन दिड लक्ष हेक्टर वाढविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत गावांमध्ये बंधारे बांधले जातील. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी वाहून जाणार नाही. जमिनीत मुरेल व विविध योजनामार्फत सिंचनाच्या सोयी उपलब्ध होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सूक्ष्म सिंचन वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी देखील या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे क्लस्टर तयार करावे व उत्पन्न दुप्पट करावे असेआवाहन केले.
            हा जिल्हा रोजगार युक्त व्हावा यासाठी ताडोबा पर्यटन केंद्रडायमंड प्रशिक्षण केंद्रपोंभुर्णा येथे एमआयडीसीअगरबत्ती क्लस्टर,पीक उत्पादन वाढीसाठी उन्नत शेती प्रकल्पअशा अनेक मोहीम राबविण्यात येत असल्याचे  सांगितले.
    शिक्षणामध्ये हा जिल्हा अग्रेसर असावादर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी टाटा ट्रस्टच्या मदतीने पालकमंत्री संगणक प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. आता या योजनेची व्याप्ती पूर्ण 15 तालुक्यांमध्ये वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बल्लारपूरला डिजिटल शाळा होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेला वॉल कम्पाऊंडवर्ग खोली देण्यात येत आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी 'आयएसओ तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी वाचनालय उभारण्यात येणाऱ्या येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
      प्रत्येक जिल्ह्याची ओळख येथील सांस्कृतिक चळवळीवर असते त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये संस्कृतिक चळवळ अधिक बळकट व्हावी यासाठी चंद्रपूर येथील प्रियदर्शीनी सभागृह अद्यावत करण्यात आले आहे. ब्रह्मपुरी,वरोराबल्लारपूरमूल येथील सांस्कृतिक भवन देखील तयार होत आहे.
      यावेळी त्यांनी जिल्ह्यात उभ्या राहत असलेल्या पायाभूत सुविधांचा देखील उल्लेख केला बल्लारपूर जवळ सैनिकी शाळा उभी राहत असून या शाळेतून भविष्यात देशासाठी लढणारे नवजवान तयार होतील आमच्या चंद्रपूरच्या युवकांना ही संधी मिळणार आहे असे सांगताना ते म्हणाले,
    कुछ नशा ये तिरंगे की आन का है
    कुछ नशा मातृभूमी के मान का है
    हम लहरा देंगे हर जगह पे तिरंगा 
    नशा ये हिंदुस्तान की शान का है

    या कार्यक्रमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार व कौतुक केले. यावेळी त्यांनी गेल्या वीस तारखेला कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले पोलीस कर्मचारी प्रकाश मेश्राम यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लक्ष रुपयांचा धनादेश त्यांच्या कुटुंबीयांना दिला. यावेळी जिल्हा मध्ये कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या छत्रपती चिडे यांचेही स्मरण यावेळी त्यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये पोलीस उपनिरीक्षक दिपक नारायण चालुलकर, पोलीस शिपाई प्रिती बोरकर व  वैशाली पाटील यांना पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल गजानन पुरुषोत्तम पांडे, अश्विनी रामदास करकाडे व स्वरुप विजय काटकर यांना मान्यवरांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले. संचालन अशोक सिंह उपाख्य मोंटू सिंग व मंगला आसुटकर यांनी केले.  
                                                            0000

वाचनामुळे स्वत:सोबतच समाजाची देखील प्रगती होते - नानाभाऊ शामकुळे


चंद्रपूरमधील ग्रंथ उत्सवाला सुरुवात, आज पुस्तक जत्रा
ग्रंथप्रेमींनी पुस्तक खरेदीसाठी भेट देण्याचे आवाहन

               चद्रंपूर दि. 25 जानेवारी : आयुष्यात ग्रंथ हे महत्वाचे व सच्च साथी असून त्यांच्यामुळेच आयुष्याला गती व प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे वाचन संस्कृतीचे पाईक होऊन स्वत: सोबत समाजाला देखील प्रतिष्ठा मिळते, असे प्रतिपादन आमदार नानाजी शामकुळे यांनी केले. उच्च व तत्रंशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,चंद्रपूर, जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समिती, चंद्रपूर दवारा प्रियदर्शनी इदिंरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे दोन दिवसीय  ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात ते बोलत होते.
           जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथुन सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित महापौर अंजली घोटेकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे थाटात उदघाटन करण्यात आले. यावेळी  छोटुभाई पटेल हायस्कूल चंद्रपूर, ज्युबली हायस्कूल, लोकमान्य टिळक विदयालय, एफ.ई.एस.गर्ल्स हायस्कूल, सन्मित्र सैनिकी विदयालयाचे विदयार्थी व शिक्षक उपस्थित होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून ते प्रियदर्शनी इदिंरा गांधी सांस्कृतिक सभागृह पर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली.
               प्रियदर्शनी इदिंरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे सकाळी 11.00 वाजता उदघाटन समारंभ पार पडला. यावेळी व्यासपिठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अजंली घोटेकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी  आर.जी.कोरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, ॲड.फिडेल बायदानी, अनिल बोरगमवारश्रीपाद जोशी आदि उपस्थित होते.
               यावेळी बोलतांना आमदार शामकुळे यांनी शासनाच्या या आयोजनामागील भूमीका विषद केली. ते म्हणाले राज्य शासनाने या उत्साहाच्या माध्यमातून ग्रंथप्रेमी व वाचन संस्कृतीची जुळले असणा-यांना एकत्रीत आणले आहे. या माध्यमातून चंद्रपूरच्या जनतेला वाचन संस्कृतीला जोडणे महत्वाचे आहे.
               कार्यक्रमाचे उदघाटक महापौर अंजलीताई घोटेकर यांनी आपल्या भाषणात ग्रंथ हे उत्तम गुरू व देशाची संस्कृती आहे. तसेच ग्रंथाचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व असल्याचे विषद केले. ग्रंथ वाचल्यास ज्ञान आत्मसात होईल.वर्तमानपत्राचे वाचन करा,  नियमित वाचनाने स्वत:ची परिस्थिती सुधारेल असे त्या यावेळी म्हणाल्या.
               यावेळी त्यांनी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केलेल्या मिशन सेवा आणि वाचन चळवळ याबाबत विचार व्यक्त केले. आताच्या वाचनालयामध्ये अन्य साहित्यासोबतच स्पर्धा परिक्षेची वाचन चळवळ विद्यार्थ्यांमध्ये राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचा ते बोलले.
               माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ महाराष्ट्र शासन अनिल बोरगमवार यांनी यावेळी संबोधित करतांना ग्रंथ चळवळ व चंद्रपूर जिल्हयाचे महत्व अधोरेखीत केले. ते म्हणाले या जिल्हयामधील वाचन व ग्रंथ चळवळ जुनी असून यासाठी प्रयत्नरथ असणारे अनेक हात सातत्याने या चळवळीत काम करीत असतात. अशा आयोजनातून या चळवळीतील कार्यकर्त्यांना एकत्रित येण्याची व काम करण्याची शक्ती मिळते.   
      तसेच अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी आपलं साहित्य लोकांपर्यत कसं पोहचेल हा ग्रंथोत्सव व ग्रंथदिंडी चा उददेश आहे असे ते म्हणाले.  या ग्रंथ महोत्सवात विविध विषयावर व्याख्यान, हास्य कवि संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे. त्या सोबतच  असे थोर अशी थोरवी या स्व.मोरेश्वर पेदा लिखीत पुस्तकाचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन मुरलीमनोहर व्यास यांनी केले. ग्रंथ उत्सव 26 जानेवारीला देखील सुरु असणार आहे. 26 जानेवारीला पुस्तक जत्राचे आयोजन करण्यात आले असून महात्मा गांधी यांच्या संदर्भातील व्याख्यान दुपारी होणार आहे. चंद्रपूर जिल्हयातील जनतेने या ग्रंथ उत्सवात सहभागी व्हावे व वेगवेगळया प्रकाशनांच्या पुस्तकांची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आर.जी.कोरे यांनी केले.
                                                            00000

नवमतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत मतदारांना जागृत करावे - डॉ.कुणाल खेमनार


राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न
26 जानेवारीपासून मतदान टोल फ्रि क्रमांक 1950  सुरु होणार
* व्हीपॅड मशीनमुळे आपले मतदान कोणाला झालेहे स्वतःला कळणार
* अधिकारीदिव्यांग व नवमतदारानी ऐकला निवडणूक आयुक्तांच्या संदेश

      चंद्रपूरदि.25 जानेवारी – देशात व राज्यात या वर्षात निवडणुका होत असून या निवडणुकीत मतदानापासून कुणीही वंचित राहू नये व अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने बचत साफल्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.
            चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय मतदान दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डीअप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रेनिवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी घनश्याम भुगावकरउपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळतहसिलदार संतोष खांडरे आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार म्हणाले,  अनेक चांगल्या उपक्रमाची सुरुवात मुलांपासून होत असते. त्यामुळे या कार्यक्रमात मोठया संख्येने विद्यार्थी नवमतदार उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या नवमतदारांनी नाव नोंदणी केली नसेल त्यांना नाव नोंदणीसाठी प्रोत्साहीत करावेअसे त्यांनी सांगितले. तसेच सोशल मिडीया व विविध ऑनलाईन माध्यमाव्दारे आपले नाव मतदार यादीत आहे अथवा नाही याबाबतची खात्री करता येते. त्यामुळे या नव्या सुविधांचा वापर तरुण पिढीने करावा व इतरांना देखील याबाबत अवगत करावेअसे आवाहन त्यांनी केले.
            यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त यांचा संदेश उपस्थितांना ऐकविण्यात आला या संदेशाचा दाखला देत नवमतदारांनी चुकीचे मतदान न करता वैध व नैतिक मतदान करावे. वैध मतदान करणे अतिशय गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. निवडणुकीची कामे आपण सर्वजण अग्रक्रमाने करत असतो. विशेषतः मला या ठिकाणी या प्रक्रियेत सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांचे अभिनंदन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. ते सुध्दा या प्रक्रियेत हिरहिरीने सहभागी होत आहे.
      या निवडणुकीमध्ये ईव्हीएम सोबतच व्हीपॅड मशीन वापरली जात आहे.व्हीपॅडमुळे आपले मत आपण कोणाला देतो आहे हे माहिती पडणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया 100पारदर्शी असल्याचेही त्यांनी सांगितले
       तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतदानाचा हक्क बजावणे आपले पहिले कर्तव्य असल्याचे सांगितले. लोकशाही सदृढ करण्यासाठी व्यापक व सर्व समावेशक मतदान होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
      यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नवमतदार स्मृती विश्वास खाडेशैलेस सुधाकर पांडवदिव्यांग पंकज राजेश्वर शर्मा या नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेतील मुलांना बक्षिस वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी घनश्याम भुगावकर यांनी तर संचालन नायब तहसिलदार कांचन जगताप यांनी केले. आभार प्रदर्शन तहसिलदार संतोष खांडरे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनीउपस्थितांना मतदार दिवसाची शपथ दिली. यावेळी युवक युवती व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.  
मतदानाच्या जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये निबंध स्पर्धेत प्रथम वैष्णवी प्रदीप कौरासे, व्दितीय कोमल सुनिल कटकमवार, तृतीय साहील हरिश्‍चंद्र वाढई, चित्रकला स्पर्धेत- प्रथम क्रमांक मोरेश्वर प्रमोद ताटकोंडावार, व्दितीय प्रथमेश यशवंत निकोडे, तृत्तीय क्षितीज शिरीश बनकर, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक करण ज्ञानेश्वर पोले, व्दितीय असतमुनी उत्तम गायकवाड, तृत्तीय प्रशांत नामदेव मुंगरे  यांचा समावेश आहे. 
तसेच मुलांच्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवाजी नंदकिशोर गोस्वामी, व्दितीय सुरज विनोद पांडे, तृतीय प्रणिल दिवाकर लांडे यांना देण्यात आला. तर मुलींच्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक खुशी अनिल सातपैसे, व्दितीय जैनब खान व  तृतीय समृध्दी मनोज आदे यांनी पटकाविला.

दृढसंकल्‍प हा प्रत्‍येक समस्‍येवर प्रभावी उपाय – सुधीर मुनगंटीवार


कोरपना येथील स्‍टेडियमच्‍या बांधकामासाठी निधी उपलब्‍ध करणार

चंद्रपूर, दि.21 जानेवारी- प्रत्‍येक समस्‍येवर रामबाण उपाय म्‍हणजे दृढसंकल्‍प, दृढसंकल्‍पासाठी शिक्षण अतिशय महत्‍वाचे आहे. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहेअसे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्‍हटले आहे. त्‍या महामानवाच्‍या प्रतिमेला वंदन करताना त्‍यांच्‍या आदर्शावर एक पाऊल पुढे जाण्‍याचा संकल्‍प करण्‍याची आज आवश्‍यकता आहे. युपीएससीएमपीएससी तसेच अन्‍य स्‍पर्धा परिक्षांमध्‍ये या जिल्‍हयातील विद्यार्थी यशस्‍वी ठरावे यासाठी आपण मिशन सेवा हाती घेतले आहे. स्‍टुडंट फोरम ग्रुप ने यासंदर्भात घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असल्‍याचे कौतुकोदगार राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आमदार संजय धोटे यांनी केलेल्‍या मागणीनुसार कोरपना येथील स्‍टेडियमचे बांधकाम पूर्ण करण्‍यासाठी निधी उपलब्‍ध करण्‍याची घोषणा त्‍यांनी यावेळी केली.
दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी चंद्रपूर जिल्‍हयातील कोरपना येथे स्‍टुडंट फोरम ग्रुप द्वारा आयोजित महात्‍मा फुले शिष्‍यवृत्‍ती स्‍पर्धा परिक्षा कार्यक्रमाच्‍या उदघाटन सोहळयात ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय धोटेबल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्माश्रीमती कांता भगतश्रीमती विजयालक्ष्‍मी धोटेदिलीप झाडेवैभव ठाकरेउपेंद्र मालेकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणालेआज समाजात स्‍वतःसाठी जगण्‍याची वृत्‍ती वाढत चालली आहे. इतरांसाठी जगणेइतरांचा विचार करणे आज गरजेचे झाले आहे. स्‍टुडंट फोरम ग्रुपच्‍या पदाधिका-यांनी जातीच्‍या बाहेर जावून विचार करण्‍याचा संकल्‍प बोलुन दाखविला तो अतिशय महत्‍वाचा आहे. जातीचा अभिमान हवा परंतु अहंकार नको असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले. कोरपनाजिवती या परिसराच्‍या विकासासाठी आपण मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध करून दिला असल्‍याचे सांगत अर्थमंत्री मुनगंटीवार पुढे म्‍हणालेजिवतीसाठी 7 कोटी रूपये निधीकोरपना पंचायत समितीच्‍या फर्निचरसाठी 1 कोटी रू. निधीकोरपना शहराच्‍या विकासासाठी 2 कोटी रू. निधीराजु-यासाठी 4 कोटी रू.गडचांदूर येथे बसस्‍थानक यासह राष्‍ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुध्‍दा या परिसरात होवू घातले आहे. या परिसरात संजय धोटे यांच्‍या मागणीनुसार विमानतळाचे बांधकाम सुध्‍दा लवकरच सुरू होईल. कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग या परिसरात उभारण्‍याचा आमचा मानस आहे. कोरपना येथील विद्यार्थ्‍यांसाठी अभ्‍यासिकेची मागणी करण्‍यात आली आहे. आपण जागा उपलब्‍ध करून द्या आम्‍ही अभ्‍यासिका सुध्‍दा बांधून देवू व त्‍या माध्‍यमातुन स्‍पर्धा परिक्षांसाठी तयारीसाठी आवश्‍यक पुस्‍तके मोफत उपलब्‍ध करून देवू असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.
     यावेळी बोलताना आमदार संजय धोटे म्‍हणालेराजुरा विधानसभा क्षेत्राच्‍या विकासासाठी           ना. मुनगंटीवार यांनी मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध करून दिला आहे. जेव्‍हाही विकासकामांसाठी आम्‍ही निधी मागीतला त्‍यांनी कधिही नकार दिला नाही. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात हा जिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर होत आहे. त्‍यांच्‍या दमदार नेतृत्‍वात वित्‍त व वनविभागाची वाटचाल हे त्‍यांच्‍या अभ्‍यासू आणि कार्यक्षम नेतृत्‍वाचे द्योतक असल्‍याचे आ. धोटे यावेळी बोलताना म्‍हणाले. कार्यक्रमाला विद्यार्थीपालक व नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.           000