Search This Blog

Monday 28 January 2019

वाचनामुळे स्वत:सोबतच समाजाची देखील प्रगती होते - नानाभाऊ शामकुळे


चंद्रपूरमधील ग्रंथ उत्सवाला सुरुवात, आज पुस्तक जत्रा
ग्रंथप्रेमींनी पुस्तक खरेदीसाठी भेट देण्याचे आवाहन

               चद्रंपूर दि. 25 जानेवारी : आयुष्यात ग्रंथ हे महत्वाचे व सच्च साथी असून त्यांच्यामुळेच आयुष्याला गती व प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे वाचन संस्कृतीचे पाईक होऊन स्वत: सोबत समाजाला देखील प्रतिष्ठा मिळते, असे प्रतिपादन आमदार नानाजी शामकुळे यांनी केले. उच्च व तत्रंशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,चंद्रपूर, जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समिती, चंद्रपूर दवारा प्रियदर्शनी इदिंरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे दोन दिवसीय  ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात ते बोलत होते.
           जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथुन सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित महापौर अंजली घोटेकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे थाटात उदघाटन करण्यात आले. यावेळी  छोटुभाई पटेल हायस्कूल चंद्रपूर, ज्युबली हायस्कूल, लोकमान्य टिळक विदयालय, एफ.ई.एस.गर्ल्स हायस्कूल, सन्मित्र सैनिकी विदयालयाचे विदयार्थी व शिक्षक उपस्थित होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून ते प्रियदर्शनी इदिंरा गांधी सांस्कृतिक सभागृह पर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली.
               प्रियदर्शनी इदिंरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे सकाळी 11.00 वाजता उदघाटन समारंभ पार पडला. यावेळी व्यासपिठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अजंली घोटेकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी  आर.जी.कोरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, ॲड.फिडेल बायदानी, अनिल बोरगमवारश्रीपाद जोशी आदि उपस्थित होते.
               यावेळी बोलतांना आमदार शामकुळे यांनी शासनाच्या या आयोजनामागील भूमीका विषद केली. ते म्हणाले राज्य शासनाने या उत्साहाच्या माध्यमातून ग्रंथप्रेमी व वाचन संस्कृतीची जुळले असणा-यांना एकत्रीत आणले आहे. या माध्यमातून चंद्रपूरच्या जनतेला वाचन संस्कृतीला जोडणे महत्वाचे आहे.
               कार्यक्रमाचे उदघाटक महापौर अंजलीताई घोटेकर यांनी आपल्या भाषणात ग्रंथ हे उत्तम गुरू व देशाची संस्कृती आहे. तसेच ग्रंथाचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व असल्याचे विषद केले. ग्रंथ वाचल्यास ज्ञान आत्मसात होईल.वर्तमानपत्राचे वाचन करा,  नियमित वाचनाने स्वत:ची परिस्थिती सुधारेल असे त्या यावेळी म्हणाल्या.
               यावेळी त्यांनी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केलेल्या मिशन सेवा आणि वाचन चळवळ याबाबत विचार व्यक्त केले. आताच्या वाचनालयामध्ये अन्य साहित्यासोबतच स्पर्धा परिक्षेची वाचन चळवळ विद्यार्थ्यांमध्ये राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचा ते बोलले.
               माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ महाराष्ट्र शासन अनिल बोरगमवार यांनी यावेळी संबोधित करतांना ग्रंथ चळवळ व चंद्रपूर जिल्हयाचे महत्व अधोरेखीत केले. ते म्हणाले या जिल्हयामधील वाचन व ग्रंथ चळवळ जुनी असून यासाठी प्रयत्नरथ असणारे अनेक हात सातत्याने या चळवळीत काम करीत असतात. अशा आयोजनातून या चळवळीतील कार्यकर्त्यांना एकत्रित येण्याची व काम करण्याची शक्ती मिळते.   
      तसेच अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी आपलं साहित्य लोकांपर्यत कसं पोहचेल हा ग्रंथोत्सव व ग्रंथदिंडी चा उददेश आहे असे ते म्हणाले.  या ग्रंथ महोत्सवात विविध विषयावर व्याख्यान, हास्य कवि संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे. त्या सोबतच  असे थोर अशी थोरवी या स्व.मोरेश्वर पेदा लिखीत पुस्तकाचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन मुरलीमनोहर व्यास यांनी केले. ग्रंथ उत्सव 26 जानेवारीला देखील सुरु असणार आहे. 26 जानेवारीला पुस्तक जत्राचे आयोजन करण्यात आले असून महात्मा गांधी यांच्या संदर्भातील व्याख्यान दुपारी होणार आहे. चंद्रपूर जिल्हयातील जनतेने या ग्रंथ उत्सवात सहभागी व्हावे व वेगवेगळया प्रकाशनांच्या पुस्तकांची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आर.जी.कोरे यांनी केले.
                                                            00000

No comments:

Post a Comment