Search This Blog

Sunday, 6 January 2019

चंद्रपूर जिल्ह्यातील 14 कोटी रुपयांच्या 32 पाणीपुरवठा योजनांचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ई - भूमिपूजन



चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरकवडा या स्मार्ट ग्रामपंचायतचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
ना. हंसराज अहीरआ. शामकुळेअध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शुद्ध पाणीपुरवठयाची मागणी
खनीज विकास निधीतून जिल्हयामध्ये आरो मशीन लावण्याचे निर्देश
देवराव भोंगळे यांच्याकडून जिल्हयातील प्रत्येक गावात आरो मशीनची मागणी

चंद्रपूर,  दि. 5 जानेवारी - चंद्रपूर जिल्ह्यातील 32 ग्रामपंचायतीच्या सरपंच्याशी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. तर जिल्ह्यातील पांढरकवडा या ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमध्ये बसलेल्या महिला सरपंच रंजनाताई डवरे यांचे सोबतही त्यांनी संवाद साधला. गावांच्या पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर लवकरच कार्यान्वित करीत असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. तथापिज्या ठिकाणी या योजना सुरू होत आहेत. त्या गावांनी पाणीपट्टी वसुली करण्यातही सक्रिय राहावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नागपूर येथील आयुक्त कार्यालयामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेअतिरिक्त मुख्य सचिव पाणीपुरवठा शामलाल गोयल आदींच्या उपस्थितीत हा संपर्क नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांशी करण्यात आला. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 32 गावांमध्ये या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेची किंमत 13 कोटी 80 लाख 84 हजार आहे. या 32 गावच्या सरपंचांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिरआमदार नानाभाऊ शामकुळेजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर पिपरे व पांढरकवडा वगळता अन्य 31 गावांचे सरपंच व सदस्य याठिकाणी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील पेयजल संदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. त्यांनी सर्वप्रथम पांढरकवडा येथील सरपंच रंजनाताई डवरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभुषण पाझारे, पंचायत समिती सदस्या सविता कोल्हे, उपसरपंच सुरज तोतडे व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. पांढरकवडा ही ग्रामपंचायत 100पाणीपट्टी वसुली करणारी तसेच स्मार्ट ग्रामपंचायत आहे. या स्मार्ट ग्रामपंचायतीच्या निर्मितीसाठी त्यांनी सरपंच यांचे अभिनंदन केले. गावांमधून शंभर टक्के पाणीपट्टी वसुली झाली पाहिजे. तरच या योजना टिकतील, असे यावेळी त्यांनी सांगितले. सोबतच तुमची ही प्रमुख अडचण असून या योजना सोलरवर आणण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असणारे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशी संवाद साधला. हंसराज अहिर यांनी मुख्यमंत्र्यांनी आज जिल्ह्यातील 32 पाणीपुरवठा योजनांची भूमिपूजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आभार मानले. जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या बाबतीत आपण लक्ष देत असल्याबद्दल आपण आभारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारासाठी आभार मानले. तसेच या जिल्ह्यांमध्ये ज्या गावांमध्ये अशुद्ध पाणी आहे.  त्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्यात यावे अशी विनंती केली. मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवावा, असे सूचित केले.
            जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी 150 गावामध्ये मुख्यमंत्र्यांनी आरो मशीन दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. सोबतच जिल्ह्याच्या प्रत्येक गावांमध्ये आरो मशीन देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पेयजल मिळावेअशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विकास निधीची उपलब्धता असून या निधीची उपयोग करताना आरो मशीन बसवण्यासाठी प्राथम्याने विचार करावा, असे आवाहन केले. लवकरच सोलरवर आधारित योजना कार्यान्वित करण्यात येईल,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 आजच्या बैठकीला गदगावच्या सरपंच पुष्पा शंकर गायकवाडपांझुणीचे सरपंच भारती गजानन काळे,कातलाबोडीचे सरपंच सविता ढेंगळेजेवराचे सरपंच  सुवर्णा वासेकरउसेगावच्या सरपंच वैशाली गेडामबेलगावचे सरपंच अंबादास पालनिफद्राच्या सरपंच ममता खंडारेमांगलीचे सरपंच नानाजी मुंडरेनिमगावचे सरपंच रूपाली ठाकरेकळमगावचे सरपंच संतोष डांगेबेलसनीचे सरपंच मंजुषा वाढईपुनागुडाचे सरपंच कौशल्या कुळसंगे,शेंबडेचे सरपंच विजूमाला जिवतोडेचांदगावचे सरपंच विद्या नागपुरेकळमनाचे सरपंच निलेश वाडी साखरीचे सरपंच राजू घरोटेवर गावचे उपसरपंच शंकर मोहितकरचांदगावच्या उपसरपंच मनीषा बनसोडमंगलीचे उपसरपंच गोकुलदास पंढरीकारगदगावचे उपसरपंच धनराज डवले यांचा समावेश होता.
                                                            0000

No comments:

Post a Comment