Search This Blog

Thursday, 3 January 2019

2018-19 च्या बाल महोत्सवाचे थाटात उदघाटन संपन्न


चंद्रपूर, दि.3 जानेवारी - महिला व बाल विकास विभागामार्फत शासकीय व स्वयंसीत संस्थेमध्ये 0 ते 18 वयोगटातील अनाथनिराधार तसेच कायदा हातात घेतलेले विधी संघर्षग्रस्त मुलांचेशासकिय व स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारे पुर्नवसन केले जाते. या मुलांमधील न्युनगंड दर करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरीता शासन विविध उपक्रमाद्वारे प्रयत्न करीत आहे. सदर मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठीएकमेकांत बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्याकरीता, त्यांच्यातला आत्मविश्वासस्वाभिमान व स्पर्धात्मक जगात वावरतांना त्यांच्यातील विविध गुणांना वाव देण्यासाठी प्रथमच महिला व बाल विभागाद्वारे संस्थेतील लाभार्थी व विभागाच्या इतर शाळांमधन शिक्षण घेणारे बालके यांचा एकत्रित तीन दिवसाचा चाचा नेहरू बालमहोत्सव दरवर्षी घेण्यात येत आहे. त्यानुसार यावर्षी क्रीडा महोत्सव 2, 3 व 4 जानेवारी रोजी चंद्रपूर येथील जिल्हा क्रिडा संकुनाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे. 
              सदर महोत्सवात मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असन या महोत्सवाचा उदघाटन सोहळा आज सकाळी 11 वाजतापार पडलायाप्रसंगी मंचावर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे हे अध्यक्षस्थानी आणि प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा परिवीक्षा रमेश दडमल यांची उपस्थिती होती.
              या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केलेयामध्ये बाल महोत्सव जिल्हास्तरावर आयोजित करण्यामागचा उद्देश, शासकीय संस्थांमध्ये वास्तव करणाऱ्या बालकांना बाहेरील दुसऱ्या शाळेच्या बालकांशी स्पर्धात्मक जाणीव निर्माण होणे व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्याकरिता सांगितले.
             यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्र यांनी बालगृहातील बालकांना इतर शाळेतील बालकांसोबत स्पर्धात्मक खेळामध्ये भाग घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि जिंकणे हरणे याबाबत विचार न करता त्यांच्यामध्ये़ खेळाडवृत्ती निर्माण व्हावी.तसेच पुढील वेळी नव्या उमेदीने स्पर्धेत सहभागी व्हावेअसे मार्गदर्शन केलेकार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बालकांना विविध पैलुवर वेगवेगळे कौशल्य आत्मसात करणे तसेच सर्वच बालकांना अशा स्पर्धात्मक कार्यक्रमांची आवश्यकता आहेबालकांनी जिद्द ठेवल्यास सर्वकाही साध्य करता येईलअसे सांगितले. या बाल  महोत्सवामध्ये सहभागी संस्थेतील बालकांनी या स्पर्धात्मक युगात शासनाकडन मिळणाऱ्या सोईसुविधांचा योग्य तो उपयोग करावा आणि स्वत:स तयार करावेअसे मार्गदर्शन केले.  त्यानंतर मशाल पेटवून थोड्या थोड्या अंतरावरून वेगवेगळ्या बालकांनी संपूर्ण मैदानामध्ये मशाल फिरविली आणि पाहुण्यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
            या कार्यक्रमात जिल्ह्यातील बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांनीविविध शाळांमधील बालकांनी आणि बालसंगोपन अंतर्गत 500 बालकांनी सहभाग नोंदविलाकार्यक्रमाचे संचालन उज्वला पोईनकर आणि आभार प्रदर्शन छोटु बोरीकर यांनी केले.
                                                                000

No comments:

Post a Comment