Search This Blog

Thursday 30 November 2023

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे कॅन्सर हॉस्पिटलच्या कामाला गती

 

 








पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे कॅन्सर हॉस्पिटलच्या कामाला गती

Ø चंद्रपूर जिल्ह्यातील कॅन्सर पीडितांना मिळणार दिलासा

Ø सहा महिन्यांत हॉस्पिटल येणार लोकांच्या सेवेत

चंद्रपूरदि. 30 : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलच्या कामाला राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कॅन्सर पीडितांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत या हॉस्पीटलचे केवळ 30 टक्के काम झाले होते. मात्र गेल्या एक वर्षात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हॉस्पिटलच्या उभारणीकरिता घेतलेल्या नियमित बैठका आणिशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आता हॉस्पीटलचे 87 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये कॅन्सर हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुंबईवरून दूरदृष्यप्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडाजी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनटाटा कॅन्सर हॉस्पीटलचे डॉ. कैलाश शर्मा व त्यांची टीमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटीलसहाय्यक अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर येथे कॅन्सर हॉस्पीटलच्या निर्मितीसाठी चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनची स्थापन करण्यात आली आहेअसे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘27 जून 2019 ला या हॉस्पीटलच्या बांधकामाचे वर्कऑर्डर देण्यात आले. मात्र अडीच वर्षे या रुग्णालयाचे काम पूर्णपणे थंडबस्त्यात पडले. गेल्या वर्षीपासून या कामाला गती देण्यात आली असून एका वर्षात 30 टक्क्यांवरील बांधकाम आज 87 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. कॅन्सर हॉस्पीटल येत्या सहा महिन्यात सुसज्ज इमारत आणि अत्याधुनिक उपकरणांसह सज्ज होऊन कॅन्सर पीडितांना उपचाराकरीता उपलब्ध करावा अशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी कॅन्सर फाऊंडेशनच्या संचालकांनी कॅन्सर हॉस्पिटल येत्या सहा महिन्यात सुरू करण्याचे आश्वासन दिले.

हॉस्पिटलच्या गुणवत्तेत तडजोड नको

कॅन्सर हॉस्पीटलचे बांधकामउपकरणांची उपलब्धताआवश्यक मनुष्यबळत्यांचे वेतन आदींसाठी गॅप फंडींगचा विषय तात्काळ मार्गी लावा. तसेच हॉस्पीटलच्या गुणवत्तेमध्ये कुठलीही तडजोड करू नये. याबाबत जिल्हाधिकारी यांनी दर पंधरा दिवसांत कामाचा आढावा घ्यावा. जिल्ह्यातील कॅन्सर पीडित रुग्णांना दिलासा देण्यासाठी या कामात आता प्राधान्याने पुढे जाण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

आरोग्य तपासणीच्या माध्यमातून होणार कॅन्सरचे निदान

मोठ्या प्रमाणात कॅन्सर रुग्णांची वाढ ही अतिशय गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील प्रदुषण हा सुध्दा एक घटक त्यासाठी कारणीभूत राहू शकतो. तसेच ब्रेस्ट कॅन्सरमुखाचा कॅन्सरगर्भाशय आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आदी प्रकार आज मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी करून कॅन्सरचे निदान करण्यासाठी टाटा ट्रस्टच्या वतीने फिरत्या बसच्या माध्यमातून रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणांसह निर्मिती

चंद्रपूर येथे 2 लक्ष 35 हजार चौरस फूट जागेवर 140 खाटांचे चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलचे बांधकाम होत असून हॉस्पिटलची मुख्य इमारत ग्राऊंड फ्लोअर अधिक चार मजलेरेडीएशन ब्लॉक ग्राऊंड फ्लोअर अधिक एक मजलायुटीलिटी ब्लॉक ग्राऊंड फ्लोअर अधिक एक मजला अशी राहणार आहे. याशिवाय रेडीएशनकिमोथेरपीकरीता अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता करण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्सप्रशिक्षित मनुष्यबळ आदी बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे.

0000000

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करताच धान नोंदणीची मुदत वाढविली


 

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करताच धान नोंदणीची मुदत वाढविली

Ø पूर्व विदर्भातील चंद्रपूरभंडारागडचिरोलीगोंदियानागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ

चंद्रपूरदि. 30 : खरेदी केंद्रांची मोजकी संख्याइंटरनेट नेटवर्कची समस्याअवकाळी पावसाचे वातावरण यामुळे धान नोंदणीची मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता राज्याचे वनसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

चंद्रपूरगडचिरोलीभंडारागोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने धान उत्पादक शेतकरी आहेत. आधारभूत योजनेअंतर्गत नेमण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून शेतकरी धानविक्री करतात. या जिल्ह्यांमध्ये केंद्रांची संख्या मोजकी आहे. अनेक दुर्गम गावांमध्ये इंटरनेट नेटवर्कची समस्या आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचाही तडाखा विदर्भाला बसत आहे. अशात शेतकऱ्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता धान नोंदणीची मुदत वाढविण्यात यावीअसा आग्रह श्री. मुनगंटीवार यांनी केला होता.

यासंदर्भात श्री. मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याशी फोनवर चर्चाही केली व त्यांना पत्रही दिले. श्री. मुनगंटीवार यांच्याशी झालेल्या चर्चेची तातडीने दखल घेत श्री. भुजबळ यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. त्यानुसार धान नोंदणीची मुदत आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. मुदत वाढल्याचा फायदा पूर्व विदर्भाच्या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.

 

00000000


जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा



 जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे चंद्रपुरच्या वैभवात पडणार भर

Ø इमारत बांधकामासाठी 60 कोटी 76 लक्ष रुपये मंजूर

चंद्रपूर, दि.30 एखादा विषय हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या खास कार्यशैलीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे आणि यंदा विधी क्षेत्रच त्याचे साक्षीदार ठरले आहे. श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत सात मजली इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी राज्य शासनाने 60 कोटी 76 लक्ष रुपये मंजूर केले आहेत. राज्याचे वनसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच 2017पासून प्रलंबित असलेला विषय आता मार्गी लागला आहे.

जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीचा प्रस्ताव चंद्रपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी शासनाला पाठवला होता. त्याआधारे महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंन्सिलचे अध्यक्ष ॲड. पारिजात पांडेचंद्रपूर जिल्हा बार असोसीएशनचे अध्यक्ष ॲड. अभय पाचपोरसचिव ॲड. आशिष धर्मपुरीवारउपाध्यक्ष ॲड. राजेश ठाकूर यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली होती. चंद्रपूरच्या विधि क्षेत्रातील गरज लक्षात घेऊन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनस्तरावर या विषयाचा पाठपुरावा केला. जिल्ह्यातील न्यायदान प्रक्रिया अधिक गतीमान होण्यात इमारतीचा अडसर ठरू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे शासनाने 29 नोव्हेंबर 2023 रोजी चंद्रपूर येथील नवीन विस्तारीत न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी 60 कोटी 76 लक्ष रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्दा आता निकाली निघाला आहे. पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्राधान्याने या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल चंद्रपुरातील विधी वर्तुळातून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

12 कोर्ट हॉल आणि अद्ययावत यंत्रणा : चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमध्ये एकूण 12 कोर्ट हॉल असणार आहेत. याठिकाणी अद्ययावत यंत्रणा आणि अत्याधुनिक सुविधांचा मेळ बघायला मिळणार आहे. अंतर्गत आणि बाह्य विद्युतीकरणपाणीपुरवठा व मलनिःसारणअग्नीशमन यंत्रणासुसज्ज वाहनतळवातानुकुलित यंत्रणावाढीव क्षमता असलेले उद्वाहन (लिफ्ट)सीसीटीव्हीपॉवर बॅकअप आदींची तरतूद कामांतर्गत करण्यात आली आहे. न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणारा सर्वसामान्य माणूस यांची मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही, सोबतच वोदीत अभिवक्त्यासाठी आसनाच्या व्यवस्थेची पूर्ण काळजी बांधकामादरम्यान घेतली जाणार आहे.

गाईड वॉलवर आढळलेल्या भेगमुळे मुख्य बांधकामास कोणत्याही प्रकारचा धोका नाही

  गाईड वॉलवर आढळलेल्या भेगमुळे मुख्य बांधकामास कोणत्याही प्रकारचा धोका नाही

Ø मध्यम प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता यांचे स्पष्टीकरण

चंद्रपूर, दि.30: मध्यम प्रकल्प विभाग क्र.1, चंद्रपूर अतंर्गत दिंडोरा बॅरेज प्रकल्प, वरोरा तालुक्यातील सोईट-दिंडोरा गावाजवळ वर्धा नदीवर बांधकामाधीन आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सद्यस्थितीत प्रगतीपथावर असून प्रकल्पाच्या डाव्या बाजुची मार्गदर्शक भिंत तसेच पुच्छ भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर बॉडी वायरचे बांधकाम जवळपास 60 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच गाईड वॉलवर आढळलेली भेग ही श्रिकेंज क्रॅक स्वरुपाची आहे. सदर क्रॅक अत्यंत किरकोळ स्वरुपाची असून संधानकच्या एकदम वरच्या भागात आलेली आहे. या श्रीकेंज क्रॅकमुळे मुख्य बांधकामास कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही. सदर बांधकाम योग्य प्रकारची दक्षता घेवून विनिदीष्टानुसार पूर्ण करण्यात आल्याचे स्पष्टीकरण चंद्रपूर मध्यम प्रकल्प क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता प्रकाश गायकवाड यांनी कळविले आहे.

बॅरेजच्या बुडीत क्षेत्राकरीता भुसंपादन अधिनियम 1894 अन्वये, 1099.11 हे. खाजगी जमीन संपादित करण्यात आली असून जमिनीच्या भुसंपादनाकरीता भुसंपादन कायद्यानुसार 12.57 कोटी मोबदला महसुल विभागामार्फत अदा करण्यात आला होता. परंतू, सदर मोबदला अत्यल्प असल्याने न्यायालयात गेलेल्या भुधारकांना वाढीव मोबदला 12.97 कोटी अदा करण्यात आला आहे.

दि.23 एप्रिल 2018 रोजीच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री यांनी प्रकल्पग्रस्तास 3.25 लक्ष प्रती हेक्टरप्रमाणे अनुदान देण्याचे निर्देश दिले होते. त्याअन्वये, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या 71 व्या नियामक मंडळाच्या बैठकीत 34 कोटी रुपयाच्या सानुग्रह अनुदान प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आली व प्रकल्पातंर्गत संबधीत भुधारकांना विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने अनुदानाचे 33.88 कोटी रुपये वाटप करण्यात आले.  तसेच दिंडोरा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या मागण्याच्या अनुपालन अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.

०००००

जागतिक एड्स दिन : जिल्ह्यात जनजागृती रॅलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक एड्स दिन :

जिल्ह्यात जनजागृती रॅलीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन

            चंद्रपूर, दि.30: राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातंर्गत एचआयव्ही/एड्स विषयीची माहिती व त्यासंदर्भात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यासाठी आरोग्य प्रशासनामार्फत तसेच जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचे घोषवाक्य (आता नेतृत्व व आघाडी समुदायाची-वाटचाल एड्स संपवण्याच्या दिशेने) असे आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.  1 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये मातेकडून होणाऱ्या बाळाला एच.आय.व्ही./एड्स संसर्गापासून प्रतिबंध करणे याबाबतचा संदेश जास्तीत नागरिकांपर्यंत पाहोचवावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी केले आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत एचआयव्ही विषयक समुपदेशन व एचआयव्ही चाचणी सुविधा नि:शुल्क देण्यात येते. त्याचबरोबर गुप्तरोग्याकरीता मोफत औषधोपचार व अन्य समुपदेशक सुविधा डिएसआरसी केंद्रामार्फत देण्यात येत असून एआरटी उपचार केंद्रातून देण्यात येतात. त्याचप्रमाणे, अतिजोखिम वर्तन गट, ट्रकर्स, स्थलांतरित कामगार व ग्रामीण भागाकरीता अनुदानित संस्थेद्वारे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत एक जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर 14 आयसीटीसी, गुप्तरोगाकरीता जिल्हास्तरावर एक सुरक्षा क्लिनीक केंद्र, औषधोपचारासाठी 2 एआरटी केंद्र, 6 लिंक एआरटी केंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर 62 एफ-आयसीटीसी, जिल्हाभरात 110 पिपीपी सेंटर, 5 ब्लड स्टोरेज, ग्रामीण भागातील 100 गावासाठी 1 लिंकवर्कर स्कीम (प्रकल्प), 1 विहान प्रकल्प, 1 ट्रकर्स प्रकल्प, स्थलांतरीत कामगारांसाठी 2 मायग्रंट प्रकल्प व एचआरजी कोअर ग्रुपसाठी 1 प्रकल्प अशा सुविधा केंद्राची निवड करण्यात आली आहे.

 विविध स्पर्धांसह कार्यक्रमाचे आयोजन :

जिल्ह्यात तालुकास्तरावर असलेल्या आयसीटीसी केंद्र व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत विविध जनजागृतीपर स्पर्धा, पथनाट्य, आरोग्य तपासणी शिबिरे, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, विविध गटासोबत कार्यशाळा तसेच जनजागृती रॅली तसेच सर्व तालुक्यामध्ये एच.आय.व्ही. बाधितांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रम, तसेच एच.आय.व्ही.सह जगणाऱ्या व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयसीटीसीच्या माध्यमातून एचआयव्ही/एड्स तपासणी:

 एचआयव्ही/एड्स बाबतीत जिल्ह्याची सद्यस्थिती पाहता, सन 2023-24 या कालावधीत माहे, एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात कार्यरत आयसीटीसीच्या माध्यमातून 39 हजार 371 नागरीकांची सामान्य तपासणी तर 23 हजार 829 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली. यापैकी सामान्य तपासणीत 152 इतके एचआयव्ही बाधित आढळून आले. तसेच गरोदर माता तपासणीमध्ये 19 इतके एचआयव्ही बाधित आढळून आले. या सर्व बाधितांना औषधोपचारावर आणण्यात आले आहे.

                 जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांच्या नेतृत्वात जिल्हाभरात विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

००००००

वन अकादमीमध्ये 18 महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात


 

वन अकादमीमध्ये 18 महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात

चंद्रपूर, दि. 30 : वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन, प्रबोधिनी,चंद्रपूर येथे दि.29 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड राज्यातील नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसाठी 18 महिने प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रशिक्षणामध्ये  छत्तीसगड राज्यातील एकूण 40 वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये 27 पुरुष आणि 13 महिला वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थ्याचा समावेश आहे. यावेळी, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्घाटन सोहळयास उपस्थित राहून नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणार्थींना संबोधित करतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, मौल्यवान नैसर्गिक वारसाचे रक्षण व जतन करण्याची जबाबदारी वनांचे रक्षक म्हणून आपणावर आहे, असे सांगितले. शेतकरी, वने व मत्स्यव्यवसाय आणि मानवतेला टिकवून ठेवण्यासाठी त्यांची अपरिहार्य भूमिका या तीन एफ (F) परस्पर संबंधांवर त्यांनी भर दिला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशिक्षणार्थींना आपल्या पर्यावरणाचे भावी संरक्षक म्हणून संबोधून शुभेच्छा दिल्या.

वन प्रबोधिनीचे संचालक एम.एस. रेड्डी, यांनी 18 महिन्यांचे प्रशिक्षण अभ्यासक्रमाची ओळख करून दिली. तसेच वन प्रबोधिनीला अत्याधुनिक संस्थेत रूपांतरीत करण्यासाठी वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. महाराष्ट्रातील 50 कोटी वृक्षारोपण मोहिमेसह राज्यभरातील इतर पर्यावरणीय उपक्रमांचे नेतृत्व करण्यात वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची प्रशंसा केली. यावेळी, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थी अमितेश सिंग परिहार यांनी छत्तीसगडच्या जंगलांचे आणि त्यांच्या संवर्धन धोरणांचे वर्णन करून छत्तीसगड राज्याविषयी माहिती दिली. तसेच सदर प्रशिक्षणार्थींनी वन प्रबोधिनीच्या माध्यमातून देशातील सर्वोत्तम वन अधिकारी बनण्याची इच्छा व्यक्त केली.

प्रशिक्षणार्थी त्यांच्या भूमिकेला नवीन उद्देशाने आणि पर्यावरण संवर्धनासाठी अतूट बांधिलकीने स्विकारण्यास तयार असल्याचे वन प्रबोधिनीचे संचालक एम.एस. रेड्डी म्हणाले.

०००००

Wednesday 29 November 2023

जनावरांसाठी राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान

                        जनावरांसाठी राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान

चंद्रपूर, दि. 29 : शेतकरीपशुपालक यांच्याकडील गाई म्हशींमध्ये असलेल्या/उद्भवलेल्या वंधत्वाचे निवारण करण्याकरिता 30 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत गावनिहाय शिबीर आयोजित केले आहे.

सर्व साधारणपणे कालवडी 250 किलो ग्रॅम तर पारड्या 275 किलो ग्रॅम शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवितात. त्यामुळे गाई म्हशींची वाढ आणि त्यांचे शारीरिक वजन याबाबत शिबिरात मार्गदर्शन करण्यात येईल.

जनावरांना होणारा गोचीड व गोमाशा प्रादुर्भावपशुंचा आहार व त्यांचे स्वास्थ्यनियमित कालांतराने जंतनाशक औषधांचा वापरवंधत्वाची विविध कारणेत्याचे प्रकारकरावयाच्या  उपाययोजनाऔषधोपचार, माजाची लक्षणेमुका माजमाज कसा ओळखावाकृत्रिम रतन करण्याची योग्य वेळ ई. बाबत मार्गदर्शन करण्यात येईल. गर्भाशय दाह असल्यास त्यावर उपाय सुचविण्यात येईल.

तरी राजुरा तालुक्यात गावोगावी होणाऱ्या वंधत्व निवारण शिबिरात पशुपालकांनी आपल्या जनावरांना तपासणीसाठी आणावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ.सुचिता धांडेपशुधन विकास अधिकारी (विस्तार)डॉ.  हरिनखेडे यांनी केले आहे.

००००००

 

दिव्यांग व वृद्धांना साहित्य पुरविण्याबाबत 30 नोव्हेंबर रोजी जिवती येथे शिबीर

 दिव्यांग व वृद्धांना साहित्य पुरविण्याबाबत 30 नोव्हेंबर रोजी जिवती येथे शिबीर

चंद्रपूर, दि.29 : भारतीय कृत्रीम अंग निर्माण ‍निगम (एलिंम्को) ए.डी.आय.पी. योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे दिव्यांगांचे साहित्य पुरविणे (मोजमाप करण्याकरीता) व वयोश्री योजनेंतर्गत 60 वर्षातील वयोवृद्ध व्यक्तींना लागणारे साहित्य पुरविण्याबाबत 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता ग्रामीण रुग्णालय, जिवती येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबिराला उपस्थित राहावे, असे आवाहन जि.प. जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी केले आहे.

००००००

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची माहिती तात्काळ द्या

 अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची माहिती तात्काळ द्या

Ø कृषी विभागाचे सहभागी शेतकऱ्यांना आवाहन

चंद्रपूर, दि.29 : जिल्हयात दि.26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकांना फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास, योजनेत समाविष्ठ नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान या जोखमेच्या बाबीअंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना जिल्हयासाठी नियुक्त ओरीऐंटल इन्शुरन्स या पीकविमा कंपनीस घटना घडल्यापासून 72 तासात द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने शेतक-यांना केले आहे.

सद्या खरीप हंगामातील भात व कापूस पीक काढणीच्या अवस्थेत तर बऱ्याच ठिकाणी भात पी कापणी होन सुकवणीकरीता शेतात पसरविलेल्या अवस्थेत आहे. तर काही ठिकाणी मळणीच्या अवस्थेत आहे. तसेच कापूस परिपक्वतेच्या व वेचणीच्या अवस्थेत आहे. ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढया बांधून सुकवणी करणे आवश्यक असते, अशा कापणी/ काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवडयांच्या आत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांच्या अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते. शेतकऱ्यांनी नुकसान कळवितांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक राहील.

योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानाची माहिती संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकाव्दारे देण्यात यावी. सर्वप्रथम पीक विमा ॲपचा वापर करावा. नंतर संबंधित विमा कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकाचा वापर करावा.  टोल-फ्री क्रमांकावर फोन न लागल्यास सदर आपत्तीची माहिती विमा कंपनीचे तालुका, जिल्हास्तरीय कार्यालय किंवा कृषी व महसूल विभागाला द्यावी.

शेतकरी टोल-फ्री क्रमांक/ई-मेलवर नुकसानीची पुर्वसूचना देवू शकतील :

ओरीऐंटल इन्शुरन्स पीक विमा कंपनीच्या 1800118485 या टोल-फ्री क्रमांकावर, ई-मेल pmfby.160000@orientalinsurance.co.in अथवा विमा कंपनीच्या लिंकवर https://orientalinsurance.org.in/pm-fasal-bima?isRefresh=true या तीनही पर्यायाव्दारे पुर्वसूचना देता येईल. पुर्वसूचना न देता आल्यास आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांचेशी संपर्क करावा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जावून नुकसानीची लेखी स्वरुपात माहिती द्यावी.

शेतकऱ्यांनो… प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत रब्बी हंगामात व्हा सहभागी :

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्‍यांना ऐच्छिक आहे. रब्बी हंगाम योजना 2023 अंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्‍यांना सहभाग घेण्याची अंतिम मुदत ज्वारी पिकांकरीता दि. 30 नोव्हेंबर तर गहु (बा.) व हरभरा पिकाकरीता 15 डिसेंबर,2023 आहे. खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामात सुध्दा शासनाने प्रती अर्ज केवळ 1 रुपया भरून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्याकरीता खास सवलत ठेवली आहे. तसेच अधिसूचित क्षेत्रात,अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. यामुळे खरीप प्रमाणेच रब्बी पिकांना सुध्दा   शेतकऱ्यांना टाळता न येण्यासारख्या कारणांमुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल.

खरीप हंगामातील नुकसान भरपाईचे वाटप सुरू :

         जिल्हयात चालू खरीप हंगामात सोयाबीन पिकावर किड व रोगाचा व्यापक प्रमाणात प्रादुर्भाव होवून पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तरतुदीतील हंगामातील प्रतिकुल परिस्थिती या जोखमेच्या बाबीअंतर्गत अधिसूचना लागू करण्यात आली होती. त्यात 46 हजार 992 शेतकऱ्यांचा समावेश असून ओरीऐंटल इन्शुरन्स कंपनीने अग्रीमासाठी 23.80 कोटी रुपये मंजुर केले आहे. आज अखेर 11 हजार 277 शेतकऱ्यांना 4.94 कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तर उर्वरीत रक्कम जमा करण्याची कार्यवाही कंपनीमार्फत सुरू आहे, असे कंपनीचे नागपूर विभागीय व्यवस्थापक शुभम बन्सोड यांनी कळविले आहे.

०००००००

बफर क्षेत्रातील शाळेकरीता ‘चला माझ्या ताडोबाला’ निसर्ग शिक्षण उपक्रम




 बफर क्षेत्रातील शाळेकरीता चला माझ्या ताडोबाला निसर्ग शिक्षण उपक्रम

Ø ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

चंद्रपूर, दि.29: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने या वनाची समृद्धता वाढवली आहे. तर 79 टक्के वन हे बांबू वनाचे असून वाघाकरीता हा उत्तम असा अधिवास आहे. सन 2021-22 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार या व्याघ्र प्रकल्पामध्ये 87 वाघाची नोंद झाली आहे.

सन 1955 रोजी या वनाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला. सन 1986 मध्ये अंधारी अभयारण्य घोषित करण्यात आले आणि सन 1995 ला वाघांचा अधिवास अधिक सुरक्षित व अबाधित राखण्यासाठी या वनाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देऊन गौरविण्यात आले आहे. या वनाच्या गाभा क्षेत्राचे काटेकोरपणे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतूने, सन 2010-11 मध्ये बफर क्षेत्र घोषित करण्यात आले. या बफर क्षेत्रात 90 पेक्षा अधिक गावे असून या ठिकाणच्या वन क्षेत्रातसुद्धा वाघाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. म्हणून ही गावे व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात्मक उपक्रमामध्ये जोडण्यात आली. साधारणत: 1 लाख लोकसंख्या असलेल्या या क्षेत्रात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेअंतर्गत विविध, सर्व स्तरावर विकासात्मक कामे करण्यात येऊ लागली आणि यातील स्थानिक विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणासंदर्भात जनजागृती व्हावी या करीता "चला माझ्या ताडोबाला हा महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरवात झाली.

याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यातील इतर वन क्षेत्रातसुद्धा वाघाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात 2022-23 च्या व्याघ्र गणनेनुसार 414 वाघांची नोंद झाली. यापैकी 200 पेक्षा अधिक वाघ केवळ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. म्हणून चंद्रपूरची ओळख वाघाचा जिल्हा अशी आहे.

अशा या जैवविविधतेने संपन्न असलेल्या व्याघ्रभूमीचे संरक्षण व संवर्धन लोकसहभागातून व्हावे, स्थानिकांना वनाचे महत्व कळावे आणि विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात एक जबाबदार नागरीक म्हणून वनसंवर्धन व संरक्षणासाठी योगदान द्यावे, या हेतूने, निसर्ग संवर्धनातून वनसंवर्धन हा उपक्रम नियमित राबविण्यात येत आहे. याकरीता सन 2015-16 पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत बफर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चला माझ्या ताडोबाला हा महत्वपूर्ण जन-जागृतीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी आवड निर्माण करणे आणि वने व वन्यजीव संवर्धनात त्यांचा सहभाग वाढविणे हा होय.

सन 2022-23 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 135 शाळेतील 5 हजार विद्यार्थी या उपक्रमामध्ये उत्साहपूर्वक सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील 27 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता हे विशेष. यावर्षी सन 2023-24 मध्ये सुद्धा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार, दि. 29 नोव्हेंबर 2023 पासून या उपक्रमाची सुरवात मुल वनपरिक्षेत्रातील भगवानपूर, फुलझरी, करवण, काटवन व डोणी येथील शाळेपासून होत आहे. यातील भगवानपूर हे गाव सन 2007 मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून स्वयंइच्छेने पुनर्वसित झालेले गाव आहे. हे गाव कोळसा व बोटेझरी या दोन गावांना एकत्रित करून या गावाचे नाव भगवानपूर ठेवण्यात आले आहे. म्हणून या वर्षी प्रथम प्राधान्य या गावाला देण्यात आले आहे.

चालू वर्षात प्रथम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील व या व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या अशा सर्व गावातील एकूण 121 शाळेतील 5 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ताडोबा वनभ्रमंती सोबतच निसर्ग शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात येईल आणि वने व व्याघ्र संवर्धनाची चळवळ अधिक प्रबळ या माध्यमातून करण्यात येईल, असे ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.

००००००

Tuesday 28 November 2023

विभागीय आयुक्तांकडून निवडणूक पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा


 

विभागीय आयुक्तांकडून निवडणूक पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा

चंद्रपूर, दि. 28 : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या अंतर्गत नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले असून श्रीमती बिदरी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा नागपूरवरून दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., उपजिल्हा निवडणूक अधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, रविंद्र माने, शिवनंदा लंगडापुरे आदी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी म्हणाल्या, 18 ते 19 या वयोगटातील नवमतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी शाळा – महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करावे. मतदान प्रक्रियेत महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यांची नोंदणी करावी. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचून त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करा. नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता व इतर बाबींमध्ये बदल करणे, मयत नावे वगळणे आदी बाबी त्वरीत पूर्ण कराव्यात. तसेच अचूक मतदार याद्या प्रसिध्द होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सुचना त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सादरीकरणात सांगितले की, जिल्ह्यात 211 मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करण्यात आले असून आता एकूण मतदान केंद्रांची संख्या 2032 झाली आहे. तसेच जिल्ह्याला प्राप्त 84702 इलेक्ट्रॉनिक फोटो आयडी कार्ड पैकी 83554 कार्डचे वितरण झाल्याचे सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाद्वारे घेण्यात आलेले विशेष शिबीर, प्रलंबित दावे व हरकती निकाली काढण्यासाठी केलेल्या उपाययोजना, विशेष ग्रामसभा, निवडणूक विभागात असलेल्या रिक्त जागा आदींबाबत माहिती दिली.

०००००००

‘विकसीत भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहचा - सहसचिव आनंद पाटील





 

‘विकसीत भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहचा  - सहसचिव आनंद पाटील

Ø तीन गावांना भेटी, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा

चंद्रपूर, दि. 28 : चंद्रपूर जिल्ह्यात 23 नोव्हेंबर 2023 पासून ‘विकसीत भारत संकल्प यात्रेचा’ शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतीमध्ये सदर यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. ज्यांना आतापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने प्रत्येक यंत्रणेने यात गांभिर्याने काम करावे, अशा सुचना केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाचे सहसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे चंद्रपूर जिल्ह्याचे नोडल अधिकारी आनंद पाटील यांनी दिल्या. तत्पुर्वी विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान त्यांनी तीन गावांना भेटी दिल्या व गावक-यांशी संवाद साधला

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकार विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त चंदन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मिना साळूंके यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

या यात्रेच्या माध्यमातून विविध विभागांनी स्वत:हून लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, असे सांगून सहसचिव आनंद पाटील म्हणाले, आपल्यापर्यंत लाभार्थी येण्याची वाट पाहू नका. जिल्ह्यात ज्या ठिकाणी या यात्रेचा चित्ररथ जाईल, तेथे संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी भेटी द्याव्यात. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर योजनेचा लाभ मिळालेल्या किमान तीन लाभार्थ्यांचे मनोगत घ्यावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा यात समावेश करावा तसेच योजनेचे व्हीडीओ क्लिप करून ते यात्रेदरम्यान दाखवावे. यात्रा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात किती लाभार्थी होते, आणि उपक्रम झाल्यानंतर किती लाभार्थ्यांना लाभ दिला, त्याचीही आकडेवारी आतापासून गोळा करा.

पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारकडून विकसीत भारत संकल्प यात्रा हा महत्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात 17 महत्वाच्या योजनांची माहिती या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. ज्यांना आतापर्यंत कोणत्याच योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा नागरिकांपर्यंत पोहचण्याचा हा प्रयत्न आहे. सदर योजनेत काय – काय लाभ मिळू शकतात, कोण लाभार्थी होऊ शकतात, यासदंर्भात एकत्रित माहिती देण्यात येत असून केंद्र सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्यात 7 ते 10 चित्ररथ पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात पी.एम. विश्वकर्मा योजनेचे उद्दिष्ट ठरवावे. गावस्तरावरील लोकांना बँकांच्या विविध योजनांची माहिती तसेच बँकेच्या व्यवहाराबाबत माहिती द्यावी, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी सादरीकरणात जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यात 825 ग्रामपंचायती असून 1836 गावे आहेत. विकसीत भारत संकल्प यात्रेच्या यशस्वी अंमलबजावणीकरीता नोडल अधिका-यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी स्तरावर त्याचा नियमित आढावा घेण्यात येत असल्याचे श्री. गौडा यांनी सांगितले.

सहसचिवांच्या तीन गावांना भेटी : विकसीत भारत संकल्प यात्रेचे नियोजन, गावागावात होणारी अंमलबजावणी पाहण्यासाठी सहसचिव आनंद पाटील यांनी टेमुर्डा (ता. वरोरा), नंदोरी (ता. भद्रावती) आणि सोनेगाव (ता. चंद्रपूर) या तीन गावांना भेटी देऊन गावक-यांशी संवाद साधला.

यात्रेत समाविष्ट असलेल्या योजना : पी.एम. स्वनिधी योजना, पी.एम. विश्वकर्मा, पी.एम. उज्वला, पी.एम. मुद्रा लोन, स्टार्टअप इंडिया – स्टँड अप इंडिया, आयुष्मान भारत, पी.एम. आवास (शहरी), स्वच्छ भारत अभियान (शहरी), पी.एम. ई-बस सेवा, अमृत योजना, पी.एम.जनऔषधी योजना, उजाला योजना, सौभाग्य योजना, डिजीटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर योजना, खेलो इंडिया, आर.सी.एस. उडाण आणि वंदे भारत ट्रेन्स व अमृत भारत स्टेशन स्कीम.

००००००