Search This Blog

Thursday, 30 November 2023

गाईड वॉलवर आढळलेल्या भेगमुळे मुख्य बांधकामास कोणत्याही प्रकारचा धोका नाही

  गाईड वॉलवर आढळलेल्या भेगमुळे मुख्य बांधकामास कोणत्याही प्रकारचा धोका नाही

Ø मध्यम प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता यांचे स्पष्टीकरण

चंद्रपूर, दि.30: मध्यम प्रकल्प विभाग क्र.1, चंद्रपूर अतंर्गत दिंडोरा बॅरेज प्रकल्प, वरोरा तालुक्यातील सोईट-दिंडोरा गावाजवळ वर्धा नदीवर बांधकामाधीन आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सद्यस्थितीत प्रगतीपथावर असून प्रकल्पाच्या डाव्या बाजुची मार्गदर्शक भिंत तसेच पुच्छ भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर बॉडी वायरचे बांधकाम जवळपास 60 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच गाईड वॉलवर आढळलेली भेग ही श्रिकेंज क्रॅक स्वरुपाची आहे. सदर क्रॅक अत्यंत किरकोळ स्वरुपाची असून संधानकच्या एकदम वरच्या भागात आलेली आहे. या श्रीकेंज क्रॅकमुळे मुख्य बांधकामास कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही. सदर बांधकाम योग्य प्रकारची दक्षता घेवून विनिदीष्टानुसार पूर्ण करण्यात आल्याचे स्पष्टीकरण चंद्रपूर मध्यम प्रकल्प क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता प्रकाश गायकवाड यांनी कळविले आहे.

बॅरेजच्या बुडीत क्षेत्राकरीता भुसंपादन अधिनियम 1894 अन्वये, 1099.11 हे. खाजगी जमीन संपादित करण्यात आली असून जमिनीच्या भुसंपादनाकरीता भुसंपादन कायद्यानुसार 12.57 कोटी मोबदला महसुल विभागामार्फत अदा करण्यात आला होता. परंतू, सदर मोबदला अत्यल्प असल्याने न्यायालयात गेलेल्या भुधारकांना वाढीव मोबदला 12.97 कोटी अदा करण्यात आला आहे.

दि.23 एप्रिल 2018 रोजीच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री यांनी प्रकल्पग्रस्तास 3.25 लक्ष प्रती हेक्टरप्रमाणे अनुदान देण्याचे निर्देश दिले होते. त्याअन्वये, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या 71 व्या नियामक मंडळाच्या बैठकीत 34 कोटी रुपयाच्या सानुग्रह अनुदान प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आली व प्रकल्पातंर्गत संबधीत भुधारकांना विशेष भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने अनुदानाचे 33.88 कोटी रुपये वाटप करण्यात आले.  तसेच दिंडोरा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या मागण्याच्या अनुपालन अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.

०००००

No comments:

Post a Comment