उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित
चंद्रपूर, दि. 7 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत
लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के
अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी,
जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.
ही आहेत
शिबिराची स्थळे :
दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी आनंद निकेतन
महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 24 नोव्हेंबर रोजी एन. एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 28
नोव्हेंबर रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर, 29 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह,
चिमूर आणि 30 नोव्हेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिपरी या ठिकाणी शिबिराचे
आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक महिन्यात दुपारी 1 वाजता शिबिराचे ऑनलाईन
अपॉइंटमेंट कार्यालयामार्फत खुले करण्यात येईल, याची
जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी.
००००००
No comments:
Post a Comment