Search This Blog

Thursday 30 November 2023

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करताच धान नोंदणीची मुदत वाढविली


 

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करताच धान नोंदणीची मुदत वाढविली

Ø पूर्व विदर्भातील चंद्रपूरभंडारागडचिरोलीगोंदियानागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ

चंद्रपूरदि. 30 : खरेदी केंद्रांची मोजकी संख्याइंटरनेट नेटवर्कची समस्याअवकाळी पावसाचे वातावरण यामुळे धान नोंदणीची मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता राज्याचे वनसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

चंद्रपूरगडचिरोलीभंडारागोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने धान उत्पादक शेतकरी आहेत. आधारभूत योजनेअंतर्गत नेमण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून शेतकरी धानविक्री करतात. या जिल्ह्यांमध्ये केंद्रांची संख्या मोजकी आहे. अनेक दुर्गम गावांमध्ये इंटरनेट नेटवर्कची समस्या आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचाही तडाखा विदर्भाला बसत आहे. अशात शेतकऱ्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता धान नोंदणीची मुदत वाढविण्यात यावीअसा आग्रह श्री. मुनगंटीवार यांनी केला होता.

यासंदर्भात श्री. मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याशी फोनवर चर्चाही केली व त्यांना पत्रही दिले. श्री. मुनगंटीवार यांच्याशी झालेल्या चर्चेची तातडीने दखल घेत श्री. भुजबळ यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. त्यानुसार धान नोंदणीची मुदत आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. मुदत वाढल्याचा फायदा पूर्व विदर्भाच्या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.

 

00000000


No comments:

Post a Comment