Search This Blog

Wednesday 22 November 2023

सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू


 सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू

चंद्रपूरदि. 22 : नाफेडतर्फे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सन 2023-24 या हंगामात सोयाबीन खरेदीस नाफेडच्यावतीने मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 9 नोव्हेंबर 2023 पासून सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी येतांना ई-7/12, चालू खाते असलेले बँक पासबुक, आधारकार्ड, 8-अ प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने सोयाबीन विकता येणार आहे तसेच दि. 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत सोयाबीन खरेदी करता येणार आहे. यासाठी पाच खरेदी केंद्रास मंजुरी देण्यात आली असून सदर खरेदी केंद्रास तालुके जोडण्यात आले आहे.

ही आहेत खरेदी केंद्रे :

यामध्ये चंद्रपूर खरेदी केंद्रास पोंभुर्णा व सावली तालुका, राजुरा खरेदी केंद्रास बल्लारपूर, गोंडपिपरी व मुल तालुका, चिमूर खरेदी केंद्रास ब्रह्मपुरी, सिंदेवाही व नागभीड तालुका, गडचांदूर खरेदी केंद्रास कोरपणा व जिवती तालुका आणि वरोरा खरेदी केंद्रास भद्रावती तालुका खरेदी नोंदणीसाठी जोडण्यात आले आहे. असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री. तावाडे यांनी कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment