राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव आमंत्रित
Ø 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 8 :भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात.
सन 2023-24 या वर्षासाठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहे. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावा.
सन 2023-24 साठी समान निधी योजना: इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्याच्या योजना (रुपये 25 लाख)
सन 2022-23 साठी असमान निधी योजना: ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामुग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी जसे फर्निचर खरेदी रु.4 लाख व इमारत बांधकाम रु. 10 ते 15 लाखाचे अर्थसहाय्य., राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान “ज्ञान कोपरा” विकसित करण्यासाठी रु. 2.50 लाखाचे अर्थसहाय्य व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरणासाठी रु.2 लाखाचे अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी रु. 6.20 लाख व इमारत विस्तारासाठी रु.10 लाखाचे अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी रु. 1.50 लाख/रु.2.50 लाख व रु. 3 लाखाचे अर्थसहाय्य, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय “बाल कोपरा” स्थापन करण्याकरीता रुपये 6.80 लाखाचे अर्थसहाय्य देय राहील.
योजनेसाठी करावयाचा अर्ज:
योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 30 नोव्हेंबरपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. शेंडे यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment