दिवाळीच्या हंगामात खाजगी प्रवासी बसेसचे भाडेदर निश्चित
Ø जास्त भाडेदराची आकारणी केल्यास
तक्रार नोंदविण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 7 : गृह विभागाच्या शासन निर्णयान्वये, खाजगी प्रवासी बस (स्लीपर/सिटिंग) यांचे महत्तम
भाडेदर निश्चित करण्यात आले आहे. दिवाळीत गर्दीच्या
हंगामात चंद्रपूर येथून पुणे व औरंगाबाद जाणाऱ्या किंवा चंद्रपूर येथे येणाऱ्या बसेसचा
कमाल दर निश्चित करण्यात आला आहे. सदर बसेसचा दर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या
भाड्याच्या दीडपट पेक्षा जास्त असता कामा नये.
असे असेल चंद्रपूर ते
औरंगाबाद व चंद्रपूर ते पुणे मार्गावरील बसेसचे भाडे :
चंद्रपूर ते औरंगाबाद या प्रवास मार्गाकरीता
शयनयान स्लीपर(एसी) बसचे भाडे 2250 रुपये तर (एसी) सिटिंग बसचे भाडे 1560 रुपये निर्धारित
करण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर ते पुणे या प्रवास मार्गाकरीता शयनयान स्लीपर बसचे
भाडे 3300 रुपये तर (एसी) सिटिंग बसचे भाडे 2315 रुपये निर्धारित करण्यात आले आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त किंवा
एस.टी. महामंडळाच्या बसच्या भाडेदराच्या दीड पटापेक्षा जास्त भाडेदराची आकारणी केल्यास
प्रवाशांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे 7172272555 या व्हाट्सअप
क्रमांकावर किंवा dyrto.34-mh@gov.in या ई-मेल
आयडीवर वाहनाचे नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकिटाच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment