Search This Blog

Thursday, 9 November 2023

शेतजमीन असणाऱ्या मातंग समाज व तत्सम पोटजातीतील व्यक्तींकडून अर्ज आमंत्रित

 शेतजमीन असणाऱ्या मातंग समाज व तत्सम पोटजातीतील व्यक्तींकडून अर्ज आमंत्रित

चंद्रपूरदि. 9 : जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील ज्या लोकांच्या नावे शेतजमीन आहे, अशा व्यक्तींनी दि. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत  कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे शेतीचा सातबारा, जातीचा दाखला, आधारकार्ड, व पासपोर्ट साईझ फोटो आदी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, चंद्रपूरचे जिल्हा व्यवस्थापक श्री. राचर्लावार यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment