Search This Blog

Friday 31 July 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 523



चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 523

322 कोरोनातून बरे ; 201 वर उपचार सुरू

शुक्रवारी एका दिवशी 28 बाधिताची नोंद

जिल्हाधिकारी कार्यालयातील 3 कर्मचारी पॉझिटीव्ह

जिल्हाधिकारी कार्यालयातील 70 कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले

चंद्रपूर, दि. 31 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या दररोज वाढत असून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन कर्मचारी देखील पॉझिटिव्ह ठरले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 523 लोकांना कोरोना आजाराची लागण झाली असून 322 बाधित बरे झाले आहेत. सध्या 201 बाधितावर उपचार सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल 495 असणारी रुग्णसंख्या आज सायंकाळपर्यंत 523 झाली आहे.एकाच दिवशी 28 बाधित जिल्हयातून पुढे आले आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन लिपिकांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या संपर्कातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू होती. निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेआठ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील 70 कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले.

आज पुढे आलेल्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातून 3चिंतलधाबा पोंभुर्णा या ठिकाणावरून 2पोंभुर्णा शहरातून एकभद्रावती तालुक्यातून एकूण 4 नागरिक पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये कुचना येथील 2एकता नगर येथील एकभद्रावती शहरातील आणखी एक बाधिताचा  समावेश आहे. गडचांदूर लक्ष्मी टॉकीज जवळ आणखी दोन रुग्ण पुढे आले आहेत. तर चंद्रपूर शहरातील शक्तिनगर व दुर्गापूर परिसरातून प्रत्येकी एक बाधित पुढे आला आहे.

रात्री उशिरा आणखी पुढे आलेल्या बाधितामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील तीननागभीड येथील औरंगाबाद वरून आलेले एकूण पाचव अँन्टीजेन चाचणीमध्ये पुढे आलेले एकूण सहा अशा दिवसभरातील 28 बाधितांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी तीन बाधित जिल्हाधिकारी कार्यालयात पुढे आले असल्याची पुष्टी केली असून नागरिकांनी गरज नसताना सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करू नयेअसे आवाहन केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांचीत्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात येत असून सर्वांची आवश्यक ती काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले.

00000

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत आतापर्यंत 40 हजार 610 मातांनी घेतला सहभाग

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत

आतापर्यंत 40 हजार 610 मातांनी घेतला सहभाग

मातांसाठी योजना ठरतेयं आधार

योजनेचा लाभ घेण्याचे सीईओंचे आवाहन

चंद्रपूर,दि.31 जुलै: गर्भवती महिलांना व त्यांच्या प्रसूतीनंतर त्यांना पोषण आहार मिळावा व मातामृत्यूबालमृत्यू दरात घट व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने 1 जानेवारी 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 40 हजार 610 मातांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. तर योजनेअंतर्गत 17 कोटी 34 लाख 92 हजार रुपयांचा लाभ घेतलेला आहे. जिल्ह्यातील सर्व स्तरातील गरोदर व स्तनदा मातांनी या योजनेअंतर्गत लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

गर्भधारणेत व प्रसूतीनंतर बालकांना पोषण आहार आणि स्तनपान आवश्यक असते ते मिळू शकत नाही. परिणामी ते बालके कुपोषित होतात व माता अनेक आजारांना सामोरे जातात. हे सर्व लक्षात घेऊन अशी परिस्थिती देशांमध्ये निर्माण होऊ नये, यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

हे असणार लाभार्थी:

सर्व स्तरातील गरोदर व स्तनदा मातांना या योजनेचा लाभ मिळेल. 1 जानेवारी 2017 नंतर सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनपान करणारी महिला आणि बालके या योजनेस पात्र राहतील.

लाभ घेण्यासाठी ही लागणार आवश्यक कागदपत्रे:

पहिलादुसरा व तिसरा लाभ मिळण्यासाठी आधार कार्डबँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्सपतीचा आधार कार्डबाळाच्या जन्माचा दाखलामाता बाल संरक्षण कार्ड यांची प्रत आवश्यक असणार आहे.

असा मिळणार टप्प्यानुसार लाभ:

पहिल्या अपत्यासाठी मातेला रुपये 5 हजार लाभ मिळणार आहे. गरोदरपणाची नोंद शासकीय आरोग्य संस्थेतील एएनएम यांच्याकडे मासिकपाळी चुकल्यानंतर शंभर दिवसांच्या आत केलेली असल्यास पहिला लाभ रुपये 1 हजार मिळणार आहे. गरोदरपणाच्या 6 महिन्यात (180 दिवस) किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केलेली असल्यास दुसरा लाभ रुपये 2 हजार मिळणार आहे. प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद व बाळाचे 14 आठवड्यापर्यंतचे लसीकरण पूर्ण केलेले असल्यास तिसरा लाभ रुपये हजार मिळणार आहे.

00000

दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कल चाचणीद्वारे मार्गदर्शन


दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना

 मानसशास्त्रीय कल चाचणीद्वारे मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि.31 जुलै: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्यात आला. दहावी व बारावीचे वर्ष शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या परीक्षेत मिळणारे गुण तुमच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवतात. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर मार्फत दहावी व बारावी नंतर पुढे काययाविषयी मानसशास्त्रीय कल चाचणीच्या आधारे मार्गदर्शन आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूरकार्यालयाच्या rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन करिअर मार्गदर्शन बाबत अधिक माहितीकरिता कार्यालयाच्या 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

राखी पोहोचविण्यासाठी डाक विभाग सज्ज


राखी पोहोचविण्यासाठी डाक विभाग सज्ज

कोरोना काळात राखी टपालासाठी खास वितरण व्यवस्था

चंद्रपूर,दि.31 जुलै: राखी म्हणजेच रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा व भावनिक उत्सव आहे. दरवर्षी रक्षा बंधनासाठीच्या राखी टपाल हाताळण्यासाठी डाक विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील राखी टपाल महाराष्ट्रातील डाक कार्यालयाद्वारे मोठ्या प्रमाणात पाठवले जातील, अशी अपेक्षा डाक विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी राखी पोहोचविण्यासाठी डाक विभाग सज्ज असणार आहे.

राखी टपाल बुकिंग प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व डाक घरांतून करण्यात आली आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरू करण्यात आले आहेत.

यावर्षी हा सण अधिक महत्वाचा आहेकारण  शहरात राहणाऱ्या भावंडांना विविध निर्बंधांमुळे या सणासाठी भेट घेणे शक्य होणार नाही. कदाचित त्यांचे भाऊ-बहिणी कंटेनमेंट झोन किंवा प्रतीबंधीत इमारतींमध्ये रहात असतील. या कोविड काळातपोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलनप्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. स्पीडपोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद होईल अशा घोषणेद्वारे आनंद मिळविण्याची विभागाची इच्छा आहे.

राखीचा सण  ऑगस्टला असल्यामुळेमहाराष्ट्र पोस्टल सर्कलने ऑगस्ट रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. प्राधान्यक्रमाने व वेळेत राखी पोचविण्यासाठी सर्वांनी लोक स्पीड पोस्ट सेवेचा लाभ घ्यावाअसे आवाहन चंद्रपूर डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

उद्योजकांसाठी सॉफ्ट स्किल कार्यशाळा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम वेबीनारचे आयोजन


उद्योजकांसाठी सॉफ्ट स्किल कार्यशाळा

फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम वेबीनारचे आयोजन

चंद्रपूर,दि. 31 जुलै: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रचंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 11 ऑगस्ट 2020  रोजी एक दिवस कालावधीचे ऑनलाईन उद्योजकांसाठी  सॉफ्ट स्किल कार्यशाळा तर 12 ऑगस्ट 2020 रोजी एक दिवस कालावधीचे ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम  कार्यशाळा वेबीनारच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

उद्योजकांसाठी सॉफ्ट स्किल कार्यशाळेत संवादाचे महत्त्वनिर्णय घेण्याचे कौशल्यसादरीकरण कौशल्यकार्यसंघाचे महत्ववेळेचे व्यवस्थापनउद्योग उभारणी प्रक्रियाइत्यादी विषयांवर ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम या कार्यशाळेत ऑनलाईन शिकवण्याच्या पद्धतीआधुनिक अध्यापन साधनांमध्ये संगणकइंटरनेट सर्फिंगइलेक्ट्रॉनिक नोटबुकई- वाचकसंगणक शैक्षणीक खेळऑनलाईन शब्दकोशविश्वकोशचित्र विश्वकोशबोलण्याचे शब्दकोश इत्यादी विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी  7 ऑगस्ट 2020 ते 10 ऑगस्ट 2020 पर्यंत प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.9403078773, 07172-274416), कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे (मो. क्र. 9011667717) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रचंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

शेतकऱ्यांनी किटकनाशके फवारणी करतांना काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन


शेतकऱ्यांनी किटकनाशके फवारणी करतांना

काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर,दि. 31 जुलै: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकांवर कीटकनाशके फवारणी करतांना काळजी घ्यावी. किटकनाशकाची फवारणी करतांना सर्व शेतकरी (भुधारक,शेतमालक) व शेतमजूर यांनी प्रतिबंधात्मक किटचा म्हणजेच चष्मासंरक्षक कपडेबुट हातमोजे नाकावरील मास्क इत्यादीचा वापर कटाक्षाने करावाअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.

किटकनाशके वापरण्यापुर्वी लेबल व माहिती पत्रक वाचुन खबरदारीच्या सर्व सुचनांचे पालन करावे. डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली किटकनाशके सर्वात विषारी त्यानंतर पिवळानिळा व हिरवा असा क्रम लागतो. ही चिन्हे सोपी व सर्वसाधारणनिरक्षर व्यक्तींना समजण्यासाठी असतात म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कमीत कमी विषारी असतात. तणनाशके फवारणीचा पंपचुकूनही किटकनाशके फवारणीसाठी वापरू नये.

किटकनाशकांची फवारणी शेतमजुरांमार्फत केली जात असताना शेतमजुरांना संरक्षक किट पुरवूनत्यांना आवश्यक त्या सूचना देण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी शेतमालकाची आहे. त्यानुषंगाने शेतमालकाने नैतिक व कायदेशीर जबाबदारी पूर्ण पाडावीजेणेकरूनसंभाव्य शारिरीक व जिवित हानी टाळता येईल.

पिकावर किटकनाशकांची फवारणी करतांना शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसतांना करावी. कारण उष्ण दमट व प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिणण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते. फवारणी करतांना त्या व्यक्तीने वारे वाहणाऱ्या दिशेला तोंड करून फवारणी करावी. पिकावर किटकनाशकांची फवारणी करतांना जवळपास अन्य व्यक्ती अथवा जनावरे यांची उपस्थिती असणार नाही याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी.

फवारणी पुर्ण झाल्यानंतर साबणाने स्वच्छ हात व तोंड धुतल्याशिवाय काहीही खाऊ नये अथवा पिऊ नये. फवारणी नंतर साबणाने स्वच्छ आंघोळ करावी. शेतमजूराला संरक्षक किट व साबण पुरविण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी शेतमालकाची आहे. फवारणीसाठी स्वच्छ पाणी बंधनकारक आहे.

बाधीत व्यक्तीची घ्यावयाची काळजी:

किटकनाशके पोटात गेल्यास किंवा त्वचाडोळेश्वसन इंद्रियव्दारे विषबाधा होऊ शकते. व्यक्तीस विषबाधा झाल्यास अपघात स्थळावरून दुर न्यावे त्याचे अंगावरील कपडे बदलावे. रोग्याचे अंग, बाधीत अवयव ताबडतोब साबन लावुन स्वच्छ पाण्याने व कोरड्या टॉवेलने पुसावे.किटकनाशक पोटात गेले असल्यास रोग्याला ताबडतोब ओकारी करण्यासाठी उपाययोजना करावी.

रोग्याला जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे. रोग्याना थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून घ्यावे. रोग्याचा श्वासोच्छावास नियमीत किंवा बंद झाल्यास रोग्याला तोंडाला तोंड लावुन कृत्रीम श्वासोच्छावास सुरू करावा. रुग्णाला झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मवु कापडाची छोटी गुंडाळी टाकावी.रोगी बेशुध्द पडल्यास त्याला शुध्दीवर आणावयाचे प्रयत्न करावे.रोगी बेशुध्द पडल्यास त्याला काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये. रोग्यास त्वरीत किटकनाशकाच्या माहिती पत्रकासह डॉक्टरकडे दाखवावे किंवा दवाखान्यात दाखल करावे. व डॉक्टरांचे निगरानित उपचार करावे. रोगी बरा झाल्यास त्याची संपुर्ण वैदयकिय तपासणी करून घ्यावी.

शेतमालकानेमाणूसकी व सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून विषबाधेच्या घटनेची माहितीकृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी अथवा पंचायत समितीच्या कृषि अधिकाऱ्याला अथवा तहसिलदार यांना अथवा पोलिस ठाणे अंमलदारास अथवा आरोग्य अधिकाऱ्याला अथवा जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकाऱ्याला अथवा जिल्हा शल्यचिकित्सक यांना कळवावेअसे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

00000

चंद्रपूर जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत जमावबंदी


चंद्रपूर जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत जमावबंदी

जिल्ह्यात कलम 144 लागू असणार

अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 31 जुलै: जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज आदेश काढलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू असणार आहे. आंतरराज्य, आंतरजिल्हा, प्रवास बंद राहतील. शाळा, महाविद्यालय 31 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहेत. दुकानांची वेळ 9 ते 6 असून हॉटेल्समधून पार्सल सेवा उपलब्ध असणार आहे. लग्न समारंभाला 50 तर अंत्यविधीला 20 लोकांची परवानगी कायम आहे. नागरिकांनी केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवास:

परराज्यात, राज्याअंतर्गत (चंद्रपूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात) प्रवासाकरिता https://covid19.mhpolice.in यावर ऑनलाईन अर्ज करावा. परवानगीशिवाय कोणत्याही नागरिकांनी जिल्ह्याच्या बाहेर, परराज्यातून,परजिल्ह्यातून जिल्ह्यामध्ये प्रवेश करता येणार नाही. प्रवास केल्यानंतर 14 दिवस संस्थात्मक अलगीकरण किंवा गृह अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. गृह अलगीकरणसंस्थात्मक अलगीकरण न पाळल्यास किंवा व्यक्ती इतरत्र फिरतांना आढळल्यास 2 हजार रुपये दंड व सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्यास 200 इतका दंड आकारण्यात येईल तसेच संबंधित व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188, 269, 270, 271 नुसार कारवाई करण्यात येईल.

केंद्र शासनराज्य शासन यांच्याकडून निर्गमित आदेशाच्या संबंधाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निर्गमित केलेल्या आदेशातील निर्देशाचेकायद्याचे भंग करणाऱ्या संबंधित व्यक्तीआस्थापनानागरिक यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दिनांक 3 जून 2020 रोजीचे आदेशान्वये संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीतील प्रभारी पोलिस अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहे.

अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारीअधिकारी व संबंधित व्यक्ती यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या हालचालीस रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत प्रतिबंध राहील.

सार्वजनिक स्थळी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये. परंतु तिथे पाचपेक्षा कमी व्यक्ती एकत्र येत असेल त्यावेळी त्यांचे कमीत कमी 6 फूट सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.सार्वजनिक ठिकाणीस्थळी पान, तंबाखू, धूम्रपान करणे इत्यादीस प्रतिबंध राहील.

धार्मिक स्वरूपाचे समुपदेशन, धर्मपरिषद, धार्मिक गर्दीचे आयोजन करू नये. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात जनमानसात अफवा अपप्रचार व भीती व्हाट्सअप फेसबूक, ट्विटरवृत्तपत्रसोशल मीडिया व होर्डिंग इत्यादी वर प्रसारित करू नये. तसेच अधिकृत माध्यमाद्वारे माहिती न घेता दिशाभूल करणारी माहिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करू नये.

खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्येकार्यशाळा , प्रशिक्षण वर्ग, देशांतर्गत व परदेशी सहल यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील. शॉपिंग कॉम्प्लेक्समॉलसुपरमार्केटमनोरंजनाची ठिकाणेक्लब, पबक्रीडांगणेमैदाने, जलतरणतलावउद्यानेसिनेमागृहेनाट्यगृहेशाळामहाविद्यालयेखाजगी शिकवणी वर्गव्यायामशाळा , संग्रहालये, गुटखा तंबाखूपान विक्री इत्यादी बंद राहील. सामाजिक अंतर ठेवून दैनंदिन बाजार भरवता येईल. परंतु आठवडी बाजार भरविता येणार नाही.

जीवनावश्यक असलेल्या पुढील बाबी कार्यरत राहतील:

अत्यावश्यक किराणा सामानदुग्ध, दुग्धोत्पादनेफळे व भाजीपालापार्सल स्वरूपात काउंटर तसेच इतर मार्गांनी विक्री, वितरण व वाहतूक करण्यास परवानगी राहील.

जीवनावश्यक खाद्यपदार्थ किराणादूधदुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतूकब्रेडफळेभाजीपालाअंडीमांस मासे बेकरीपशुखाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 9 ते सायंकाळी 6  वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु,  दुकान आस्थापना यामध्ये एकाच वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक उपस्थित राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे दुकानआस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

खाद्य पदार्थकिराणादूधब्रेडफळेभाजीपालाअंडीमांस, मासे यांची वाहतुक व साठवण. अत्यावश्यक वस्तूंची पुरवठासाखळी आणि वाहतूक. पार्सल स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याचे अटीवर उपहारगृहेखाद्यगृहे घरगुती खानावळ स्वीट मार्केटफरसाण सेंटर व चहा नाष्टा सेंटर सुरू राहतील तथापि प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्थेस मनाई असेल.

पावसाळी ऋतू संबंधित साहित्य जसे छत्रीरेनकोटप्लॅस्टिक शीटकव्हर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे सदर साहित्याची विक्री व वितरणाबाबत वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील.

शेतीविषयक उत्पादन/ सुविधा /आस्थापना संबंधाने पुढील बाकी कार्यरत राहतील:

सर्व प्रकारचे शीतगृहे, वखार ,गोदामा संबंधित सेवा, घाऊक वितरणासाठी आणि सदर बाबींशी संबंधित पुरवठा साखळी, कृषी उत्पादन व किमान आधारभूत किंमत यांच्याशी संबंधित कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडीबाजार विशेषतः कापूसतुर व धान खरेदी, विक्री आस्थापना, दुकाने सुरू राहतील.

शेतकरी व शेतमजूर यांचेकडून करण्यात येणारी शेतीविषयक कामे मासेमारी व मत्स्य व्यवसाय संबंधित सर्व कामे व शेती विषयक अवजारे, यंत्र विक्री व दुरुस्ती संबंधित मान्यताप्राप्त दुकाने, आस्थापना (किमान मनुष्यबळासह), शेती संबंधित यंत्रे, अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजूरवर्ग, केंद्र, शेतमाल आणि अन्य वस्तूंची आयात निर्यात आणि वाहतूकराज्यांतर्गत व आंतरराज्यीय कृषी, फलोत्पादन संबंधित अवजारेयंत्रे जसे पेरणी, कापणी यांची वाहतूक.खते कीटकनाशके व बियाणे यांच्याशी निगडित उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग, आस्थापना, दुकाने संपूर्ण जिल्ह्याकरिता सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील.

लग्न समारंभाकरिता पुढीलप्रमाणे परवानगी राहतील:

लग्न समारंभ (50 लोकांच्या उपस्थितीत) सामाजिक अंतर राखून करण्यास परवानगी असेल. परंतुसदर परवानगीही उपविभागीय अधिकारीतहसिलदार यांचेकडून प्राप्त करणे बंधनकारक राहील. विवाह करिता 50 लोकांच्या कमाल मर्यादित उपस्थितीत ज्यामध्ये प्रत्येकी पाच व्यक्तींचे बँड पथक सुगम संगीत कलावंत यांची उपस्थिती ठेवून खुले लॉनविना वातानुकूलित मंगल कार्यालयहॉलसभागृहघर व घराच्या परिसरात पार पाळण्यास परवानगी असणार आहे. तसेच, अंत्यविधीकरिता सामाजिक अंतर राखून 20 लोकांचे उपस्थितीस परवानगी राहील.

प्रवास व प्रवासी वाहतूकी संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:

जिल्हांतर्गत प्रवासाकरिता बस सेवा व 50 टक्के प्रवासी क्षमतेचा सामाजिक अंतर राखून निर्जंतुकीकरण उपाय राबवून सुरू राहतील.

जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यास (दुचाकी,चारचाकी वाहनाने) नागरिकांस कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही. परंतुचारचाकी वाहनाच्या बाबतीत वाहन चालकासह केवळ तीन प्रवासी वैद्य राहील आणि वाहनांमध्ये सॅनीटायजर ठेवून प्रवास करणाऱ्या व्यक्तीस मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच दुचाकी करिता  दुचाकीचालकासह एक व्यक्तीस परवानगी असणार आहे. महानगरपालिकानगरपालिकानगरपंचायत क्षेत्राकरिता प्रवासी वाहतूक करिता रिक्षा, ऑटोरिक्षा चालक व दोन प्रवाशांसह रिक्षा ऑटोरिक्षाची वाहतूक सुरू राहील.

परंतु रिक्षाऑटोरिक्षा मध्ये सॅनीटायजर ठेवणे व मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल सदर वाहतूक ही केवळ वरील प्रमाणे त्या -त्या क्षेत्र पुरतीच मर्यादित राहील. व निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करता येणार नाही. दुचाकीचारचाकीरिक्षाऑटोरिक्षा याद्वारे सायंकाळी 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रवास करता येणार नाही.

शासकीय व खाजगी कार्यालय संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:

जिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीय महामंडळ कार्यालय 100 टक्के कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती सुरू राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजमधील कार्यालयकर्मचारी यांची अध्यापना व्यतिरिक्त कामाकरिता जसे  ई-लर्निंग कन्टेन्टउत्तरपत्रिकांची तपासणी,निकालपत्र संबंधित कार्यवाही करण्याकरिता उपस्थितीस परवानगी असणार आहे.

उद्योग संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:

सर्व प्रकारचे शहरी व ग्रामीण भागातील औद्योगिक आस्थापना,वसाहतीयुनिट सुरू राहतील. परंतु कोविड-19 संबंधाने राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

बांधकाम संबंधी पुढील बाबी कार्यरत राहतील:

शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची बांधकामे सुरू राहतील.परंतु बांधकाम स्थळी कामगार उपस्थित राहील व कोणत्याही कामगारांस बाहेरून आणण्यास परवानगी नसेल परंतु कोविड-19 संबंधाने राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

लोकांच्या व्यक्तिगत कवायत बाबत पुढील बाबी कार्यरत राहतील:

मैदानी बिगर संघीय खेळ जसे गोल्फ कोर्सआउटडोर फायरिंग रेंजजिम्नॅस्टिक्सटेनिसबॅडमिंटन आणि मल्लखांब यासारख्या क्रीडांना शारीरिक अंतर व स्वच्छता उपाय राबवून दिनांक 5 ऑगस्टपासून सुरू ठेवण्याची परवानगी राहिल.

सलून, स्पा, बार्बर शॉपब्युटी पार्लरकेस कर्तनालय सुरु राहतील:

सलून,स्पाकेस कर्तनालय या आस्थापना सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील. यामध्ये केवळ हेअरकटडाईंग हेअरथ्रेडींग करण्यास परवानगी असेल विशेषत: त्वचेसंबंधी कोणत्याही बाबीस परवानगी असणार नाही. यासंबंधी पत्रक दुकानाचे दर्शनी भागावर प्रसिद्ध करावेत.

मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स मधील पुढील बाबी दिनांक 5 ऑगस्टपासून कार्यरत राहील:

मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील. मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृहेकोर्टरेस्टॉरंट सुरू ठेवता येणार नाही तथापि फूड कोर्टरेस्टॉरंट यामधील किचन खाद्यपदार्थांच्या होम डिलिव्हरी करिता सुरू ठेवता येतील.

आंतरराज्यीय सीमा प्रवासी वाहतुकीकरिता बंद असेल परंतु सर्व प्रकारची मालवाहतूकअत्यावश्यक मालवाहतूक नसली तरी परवानगी असणार आहे. राज्यांतर्गतआंतरराज्यीय मालवाहतूक समयी ट्रक चालक व अतिरिक्त एक व्यक्ती वैद्य कागदपत्रासह मालवाहतूक अत्यावश्यक असली अथवा नसली तरी सुरू राहील. त्याकरिता वेगळा परवाना आवश्यक नाही. मालवाहतूक करून खाली ट्रकांची वाहतूक सुद्धा यामध्ये समाविष्ट राहील.

शैक्षणिक व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या बाबतीत ऑनलाईन पद्धतीने डिस्टन्स लर्निंग चालू ठेवता येईल.

जीवनावश्यक वस्तू विक्री व वितरण इत्यादी आस्थापनादुकाने याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचे बास्थापनादुकाने सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील.परंतु  आस्थापनादुकाने समोर आणि फुटपाथवर कोणतेही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

जीवनावश्यक वस्तू विक्री व वितरण इत्यादी आस्थापनादुकाने याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने आठवड्यातून किमान एक दिवस संपूर्णता बंद राहतील. सदर दिवशी स्थानिक परिस्थितीचा विचार करून स्थानिक प्रशासनाकडून घोषित करण्यात येईल.

परवानगी देण्यात आलेले कामाचे ठिकाण, सार्वजनिक स्थळी दुकानेआस्थापनाप्रतिष्ठाने येथे कार्यरत कामगारकर्मचारी तसेच सुविधेचा लाभ घेणारे जिल्ह्यातील सर्व नागरिक यांनी कायम मास्कचा वापर करणे तसेच आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील.

सदरील आदेशांचे पालन न करणारेउल्लंघन करणारी कोणतीही व्यक्तीसंस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, 269, 270,271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सदरचा आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत करीता लागू राहील तसेच प्रतिबंधित क्षेत्राकरिता (कंटेनमेंट झोन) लागू राहणार नाही.                   

00000

Thursday 30 July 2020

चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या 489



चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या 489

311 कोरोनातून बरे ;178 वर उपचार सुरू

गुरूवारी एका दिवशी 22 बाधिताची नोंद

चंद्रपूर दि. 30 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 489 झाली आहे. यापैकी 311 बाधित बरे झाले आहेत तर 178 जण उपचार घेत आहेत. गुरूवारी एकूण 22 बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. बाधित दुरुस्त होण्याचा दर राज्यात 57.14 असताना जिल्ह्यात हा दर 64 आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 21 हजार 631 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत गेल्या चार महिन्यांमध्ये 90 हजार 282 नागरिक परत आलेले आहे. तर 60 हजारावर नागरिक जिल्ह्यातून बाहेर गेले आहेत.

आज पुढे आलेल्या एकूण 22 बाधितामध्ये सायंकाळी 4 आणखी पॉझिटीव्ह पुढे आले आहेत. या चारही नागरिकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली आहे.

     यामध्ये कोरपणा येथील 36 वर्षीय व्यक्तीचा समावेश असून वार्ड नंबर 3 मधील संपर्कातील हा बाधित आहे. बल्लारपूर शहरातील रेल्वे कॉलनी बायपास येथील तीन रुग्ण पुढे आले आहेत. सरासरी 40 वयोगटातील हे तीनही रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातून बाधित झाले आहेत.   

       तत्पूर्वी, सायंकाळपर्यंत 18 बाधित पुढे आले होते.  यामध्ये कोरपना तालुक्यातील पालगाव येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 34 वर्षीय पुरुष व 3 वर्षीय बालकाचा समावेश आहे.    

राजुरा पोलीस स्थानकातील 46 वर्षीय जवान पॉझिटिव्ह ठरला आहे. या ठिकाणच्या यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील हा जवान असल्याचे समजते.    

राजुरा येथील तेलंगाना राज्यातून प्रवास केलेली 19 वर्षीय युवती तपासणीअंती पॉझिटिव्ह निघाली आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील वांढरी येथील 24 वर्षीय पुरुष संपर्कातून बाधीत ठरला आहे. चेन्नई येथून याठिकाणी आलेला यापूर्वीच्या एक पॉझिटिव्हच्या हा युवक संपर्कात आहे.

नागभीड तालुक्यातील किरमिटी मेंढा येथील 21 वर्षीय युवक बाधित ठरला आहे. दिल्ली येथून आल्यानंतर हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता.

      चंद्रपूर शहरातील पठाणपुरा सावरी बंगला परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 26 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह ठरला आहे.

ब्रह्मपुरी येथील कुडेसाघली  24 वर्षीय पुरुष यापूर्वीच्या एका बाधितांच्या संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे.

कागज नगर येथून प्रवास केला असल्याची नोंद असलेला सिंदेवाही तालुक्यातील 23 वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह ठरला आहे.

अफगाणिस्तान परत आल्यानंतर श्वसनाचा आजार जाणवू लागल्यामुळे दुर्गापुर वार्डचंदू बाबा गेट जवळील 49 वर्षीय व 20 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

याशिवाय नागभीड येथील वार्ड क्रमांक सहा मधील काल निघालेल्या दोन पॉझिटिव्हच्या संपर्कातील 22 व 12 वर्षीय दोन पुरुष व 20 वर्षीय महिला अँटीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह ठरली आहे.नागभीड येथील सिनेमा टॉकीज परिसरातील 60 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.

राजुरा तालुक्यातील चुनाळा गावातील 42 वर्षीय पुरुष ,चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला आहे. चिमूर तालुक्यातील ब्राह्मणी येथील 31 वर्षीय महिला व केवळ नऊ दिवसांची मुलगी अँन्टीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आली आहे.

चंद्रपूर येथील बागडे हाऊस वार्ड नंबर 16  मधील 32 वर्षीय पुरुष चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-38बल्लारपूर सहापोंभूर्णा पाचसिंदेवाही 11मुल 13ब्रह्मपुरी 44नागभीड 7वरोरा 11कोरपना 6गोंडपिपरी तीनराजुरा 7चिमूर 10भद्रावती 7जिवतीसावली येथे प्रत्येकी 2 बाधित आहेत.

शहरी भागामध्ये बल्लारपूर 24वरोरा 17राजुरा 8मुल 38चिमूर 4भद्रावती 34ब्रह्मपुरी 23कोरपना तीननागभिड चार तर गडचांदूर 19 बाधित आहेत.

चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोनबिनबा गेट एकबाबुपेठ 10बालाजी वार्ड पाचभिवापूर वार्ड दोनशास्त्रीनगर  एकसुमित्रानगर चारस्नेह नगर एकलुंबीनी नगर 4जोडदेउळ एकतुकूम तलाव चारदूध डेअरी तुकूम दोनलालपेठ एकपोलीस मंगल कार्यालय तुकूम 20दाद महल वार्डशिवाजी नगर तुकुमइंदिरानगर तुकुमलालपेठभानापेठहवेली गार्डन,लखमापूर हनुमान मंदिर,घुटकाळा,आजाद हिंद वार्ड तुकूम,संजय नगर,कोतवाली वार्ड,एकोरी वार्ड,जैन मंदिर तुकुम,साईनगर,क्रिस्टॉल प्लाझारहमतनगरहॉस्पिटल वार्डरामाळा तलावपठाणपुराश्यामनगरगिरनार चौकनिर्माण नगर येथे प्रत्येकी एक बाधित आहेत. बगल खिडकी दोनपागल बाबा नगर तीन,वडगाव दोन,सिविल लाइन्स चार,अंचलेश्वर गेट तीनचोर खिडकी सहा,रयतवारी वार्ड पाचजयराजनगर (दांडिया ग्राउंड) तुकूम दोनगोपाळपुरी 6जटपुरा वार्ड तीनरामनगर तीनजगन्नाथ बाबा नगर दोन असे एकूण जिल्ह्यातील बाधितांची संख्या 489 वर गेली आहे.

00000


पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

31 जुलै रोजी सिंदेवाही येथील गावातील नागरिकांशी साधणार संवाद

1

चंद्रपूरदि. 30 जुलै: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागासबहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 31 जुलै शुक्रवार व 1 ऑगस्ट शनिवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

31 जुलै शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता कमलाई निवास रामदास पेठ नागपूर येथून सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता देवयानी इंटरनॅशनल स्कूल सिंदेवाही येथे काँग्रेस कार्यकर्त्या बरोबर बैठक घेणार आहेत. दुपारी 12 वाजल्यापासून सिंदेवाही तालुक्यातील अनुक्रमे वासेरापिंपरदेरी,पांढरवाणीकारवाशिवणीसिरकडा या गावाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधतील. सायंकाळी 6 वाजता सिरकडा गावातून ब्रह्मपुरी कडे प्रयाण करतील. तर सायंकाळी 7:30 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे आगमन होऊन त्यांचा मुक्काम असणार आहे.

ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे कोविड-19 बाबत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेणार आहेत. सायंकाळी वाजता शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथून नागपूर कडे प्रयाण करतील तर सायंकाळी वाजता कमलाई निवास रामदासपेठ नागपूर येथे आगमन होऊन त्यांचा मुक्काम असणार आहे.

00000

संबंधित पालकांनी त्या बालिकेवर हक्क दाखवावा अन्यथा त्या बालिकेला दत्तक मुक्त घोषित करण्यात येणार

संबंधित पालकांनी त्या बालिकेवर हक्क दाखवावा

अन्यथा त्या बालिकेला दत्तक मुक्त घोषित करण्यात येणार

चंद्रपूर,दि. 30 जुलै: पोलीस स्टेशन, चंद्रपुर येथे दि. 29 फेब्रुवारी 2020 रोजी तक्रार प्राप्त झाली की सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे एका अनोळखी महिलेने एका नवजात बालिकेला एका अनोळखी व्यक्ती जवळ ठेवून तिथून पसार झाली. त्या नवजात बालिकेला पोलिसांनी शासकीय मेडिकल कॉलेज व रुग्णालय चंद्रपूर येथील एनआयसीयु वार्ड मध्ये दाखल केले असून त्या नवजात बालिकेची प्रकृती चांगली झाल्यानंतर तिला रुग्णालयातून दि. 2 मार्च 2020 रोजी सुटी देण्यात आली. पोलिसांनी सदर नवजात बालिकेला दि. 2 मार्च 2020 रोजी दुपारी 1 वाजता महिला विकास मंडळद्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक योजनाचंद्रपूर यांच्याकडे बालिकेचा ताबा देऊन दाखल करण्यात आले. सदर बालिकेबाबत संबंधित पालकांनी हक्क दाखवावा अन्यथा बाल कल्याण समितीचंद्रपूर त्या बालिकेला दत्तक मुक्त घोषित करेल आणि महिला विकास मंडळ द्वारा किलबिल संस्था दत्तक देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करील, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारीजिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर यांनी केले आहे.

संस्थेने त्या बालिकेचे नाव संस्थेच्या दप्तरी उमा असे नोंदवून दि.2 मार्च 2020 रोजी बाल कल्याण समिती चंद्रपूर येथे उमा नामक बालिका दाखल झाल्याबाबत पत्राद्वारे कळविले. बालकल्याण समिती चंद्रपूर मार्फत केस नं 34/2020 दि. 2 मार्च 2020 च्या आदेशाने सदर उमा बालिकेचा ताबा महिला विकास मंडळद्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक योजनाचंद्रपूर येथे चालू ठेवला आहे.

तरी बालिकेच्या संबंधित पालकांनी सात दिवसाच्या आत बाल कल्याण समितीशासकीय मुलांचे निरिक्षण गृह- बालगृहडॉ. राजेंद्र आल्लूरवार बिल्डींगसी-18, शास्त्रीनगर बगीच्या जवळ शास्त्रीनगरचंद्रपूर किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षद्वारा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयजुना कलेक्टर बंगलाजिल्हा स्टेडियम जवळचंद्रपूरकिंवा महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक योजनाडॉ. मुठाळ यांच्या जुन्या दवाखान्याजवळरामनगर चंद्रपूर या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

00000