Search This Blog

Sunday 26 July 2020

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार आजपासून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार
आजपासून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
विविध विभागांचा घेणार आढावा
चंद्रपूर दि.26 जुलै: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागासबहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 27 जुलै सोमवार व 28 जुलै मंगळवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादिवशी ते विविध विभागाचा आढावा घेणार आहेत.
सोमवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 8.45 ला नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 वाजता चंद्रपूर येथे आगमन व सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे कोरोना संदर्भातील उपाययोजनांसंदर्भात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सकाळी 12 वाजता नियोजन भवन येथे सहयोग मानसिक आरोग्य हेल्पलाइनचे उद्घाटन करतील. दुपारी 12.30 वाजता आयुष उपक्रमाबाबत आढावा बैठक व उद्घाटन करणार आहेत. दुपारी 1 वाजता मंथन हॉलचंद्रपूर येथे पोलीस योद्धा कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत राखीव वेळ ठेवण्यात आला  असून दुपारी 2.30 वाजता सिसीसी वन अकादमी आणि आदिवासी मुलींचे वस्तीगृहास भेट देतील. दुपारी 3.30 वाजता खरीप हंगामखते बियाणेपिक कर्ज, पिक विमा याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकबँक व्यवस्थापककृषी विकास अधिकारी यांच्याशी संबंधित कार्याचा आढावा ते घेणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता पालकमंत्री कार्यालयनियोजन भवनचंद्रपूर येथे राखीव व रात्री हिराई विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.
मंगळवार 28 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता ताडाळी येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील टेस्टिंग उद्घाटन कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्रताडाळी येथे उपस्थित राहतील. सकाळी 11.30 वाजता डब्ल्यूसीएल एम्प्लॉयमेंट संदर्भात नियोजन भवन येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतील. दुपारी 12.30 वाजता विविध विकास कामांचा आढावा नियोजन भवन चंद्रपूर येथे घेणार आहेत. दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यंत राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. दुपारी 2 वाजता विविध महामंडळाच्या योजनांचा आढावा नियोजन भवन चंद्रपुर येथे घेणार आहेत . दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद नियोजन भवनचंद्रपूर येथे घेणार आहेत. दुपारी 4 ते 5 वाजेपर्यंत राखीव वेळ ठेवण्यात आला आहे.  सायंकाळी 5 वाजता नियोजन भवन चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण करतील.
00000

No comments:

Post a Comment