Search This Blog

Wednesday 29 July 2020

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत मशरूम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत

मशरूम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण

चंद्रपूर,दि. 29 जुलै: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही उद्योग संचालनालया अंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत्त प्रशिक्षण संस्था असून या संस्थेचा मुख्य उद्देश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त लोकांनास्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरीता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रचंद्रपूरद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 1ऑगस्ट 2020 ते 3 ऑगस्ट 2020 रोजी 3 दिवस कालावधीचे मशरूम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये मशरूमचे प्रकार व ओळखलागवडसाहित्य व कच्चा मालकाळजी व देखभालमशरूम काढणेवाढविणे व पॅकेजिंग प्रक्रियारोगकिडनिदान व उपचारखाद्यपदार्थ व अर्थशास्त्रबाजारपेठ पाहणी तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजनाउद्योजकीय व्यक्तिमत्व विकासयशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शनकर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शनइत्यादी विविध विषयावर विशेष तज्ञ मार्गदर्शक व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी दि.31 जुलै 2020 पर्यंत स्वतःचा बायोडाटाशाळा सोडल्याचा दाखलागुणपत्रिकाआधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रांसह महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रउद्योग भवनदुसरा माळागाळा क्र. 208 बस स्टॉप समोररेल्वे स्टेशन रोडचंद्रपुर येथे उपस्थित रहावे. तसेच अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.9403078773, 07172-274416), कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे ( मो. क्र.9011667717), कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे (मो.क्र.9309574045) यांच्याशी संपर्क साधून सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment