Search This Blog

Friday 17 July 2020

महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी एक खिडकी योजना

महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी एक खिडकी योजना
चंद्रपूर येथील नवउद्योजकांनी घ्यावा लाभ
चंद्रपूर,दि. 17 जुलै: महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायाला चालना मिळावी. व्यवसाय उभारतांना येणाऱ्या अडचणींना सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उद्योग संचालनालयामार्फत एकल खिडकी योजना राबवलेली आहे.उद्योग संचालनालयाने महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल (मैत्री) तयार केलेले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून उद्योगासंदर्भात वेगवेगळ्या विभागाचे विविध परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. जिल्ह्यातील उद्योजकांनी जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड यांनी केले आहे.
या पोर्टल मार्फत ज्या नवीन व सध्या सुरू असलेल्या उद्योगांना वेगवेगळ्या विभागाच्या विविध परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध केल्या जातात.जवळजवळ 12  विभागातील 48  ऑनलाईन मंजुरी आणि परवाने या पोर्टलवर मिळवू शकतात.
या विभागातील मिळणार परवानगी:
उद्योगकामगारवैधमापन शास्त्रमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळवस्तू व सेवा कर नोंदणीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळनगरविकासविधी व न्यायस्टीम बॉयलर्स संचालनालयसार्वजनिक बांधकामऊर्जाऔद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय या विभागातील 48 मंजुरी आणि परवानगी उद्योजकांना मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी www.di.maharashtra.gov.in तसेच maitri.mahaonline.gov.in वर लॉग ऑन करा किंवा 022-22622322  022-22622362 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता.
00000

No comments:

Post a Comment