Search This Blog

Wednesday, 22 July 2020

कंत्राटी कामगारांचा कंत्राट शासकीय नियमानुसारच

कंत्राटी कामगारांचा कंत्राट शासकीय नियमानुसारच
कोणत्याच प्रकारचा बाहेरील हस्तक्षेप नाही
चंद्रपूर दि. 22 जुलै: जिल्ह्यातील एका वृत्तपत्रामध्ये दि. 22 जुलै 2020 रोजी प्रकाशित झालेल्या मेडिकल कॉलेजमधील कंत्राटी कामगारांच्या कंत्राटासाठी राजकीय ढवळाढवळ या शीर्षकाखाली बातमी छापण्यात आली होती. या बातमीत तथ्य नसल्याचे एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
सदर बातमीमध्ये आमदारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचंद्रपूरचे अधिष्ठाता यांना घरी बोलावून छाननीमध्ये अपात्र झालेल्या हर्षल बहुद्देशीय संस्थेला काम देण्यास सांगितले आहे, असे नमूद आहे. परंतु ही बाब खरी नसून आमदारांनी अधिष्ठाता यांना त्यांच्या घरी बोलाविले नाही तसेच त्यांनी हर्षल बहुउद्देशीय संस्था अथवा कोणत्याही अपात्र झालेल्या निविदा धारकाला काम देण्यास सांगितले नाही. तसेच याबाबत एखाद्या निविदा धारकाला पात्र करणे किंवा काम देण्यास कुठलाही राजकीय दबाव आणला नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
00000

No comments:

Post a Comment