Search This Blog

Friday 24 July 2020

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उभारणी विषयक ऑनलाईन कार्यशाळा युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग उभारणी
 विषयक ऑनलाईन कार्यशाळा
युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि. 24 जुलै: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रचंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 5 ऑगस्ट रोजी एक दिवस कालावधीचे ऑनलाईन  सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग उभारणी संदर्भात ऑनलाईन कार्यशाळा अर्थात वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे. या वेबिनारचा जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी के.व्ही राठोड यांनी केले आहे.
या कार्यशाळेत व्यवसाय उद्योजकांशी चर्चा लघुउद्योगव्यवसाय शास्त्रीय व्याख्या व नोंदणी पद्धतीआयात निर्यात उद्योग संधीबाजारपेठ पाहणीप्रकल्प अहवाल तयार करणेडिजिटल मार्केटिंगलघु उद्योगांसाठी व व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती व अनुदानसिडबी तर्फे योजना व अनुदान, लघुउद्योग प्रॉडक्ट मार्केटिंग इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी 4 ऑगस्ट 2020 पर्यंत प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.9403078773, 07172-274416), कार्यक्रम आयोजक लक्ष्मी खोब्रागडे (मो.क्र.9309574045) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रचंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment