Search This Blog

Wednesday 22 July 2020

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत डिजिटल मार्केटिंग वेबीनार

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत
डिजिटल मार्केटिंग वेबीनार
युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 22 जुलै: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही उद्योग संचालनालया अंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत्त प्रशिक्षण संस्था असून या संस्थेचा मुख्य उद्देश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त लोकांनास्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करणे करीता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूरद्वारे दहावी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 4 ऑगस्टला एक दिवस कालावधीचे ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यशाळेत ऑनलाईन बिझनेस संधीआयडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजीगुगल अॅडव्हर्डगूगल अनालिटिक्ससोशल मीडिया मार्केटिंगयुट्युबघरी बसून पैसे कमविण्याची संधी उद्योग उभारणी प्रक्रिया इत्यादी विषयांवर ऑनलाइनद्वारे तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी दि. ऑगस्ट 2020 पर्यंत प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.9403078773, 07172-274416), कार्यक्रम आयोजक लक्ष्मी खोब्रागडे  (मो.क्र.9309574045) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रचंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000  

No comments:

Post a Comment