Search This Blog

Tuesday, 14 July 2020

15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन साजरा होणार


15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन साजरा होणार
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन
करिअर व रोजगाराच्या संधी  विषयी मार्गदर्शन
चंद्रपूरदि. 14 जुलै: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर कार्यालयाच्या माध्यमातून दिनांक 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून जिल्हास्तरावर साजरा करण्यात येत असतो. परंतु या वर्षी कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 15 जुलै रोजी दुपारी एक वाजता साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार असणार आहेत. 15 जुलै ते 17 जुलै पर्यत युवक,युवतींना ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परिक्षा व करिअर संबंधी व रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
कार्यक्रमात अध्यक्ष एमआयडीसी असोसिएशन चंद्रपूरचे मधुसूदन रुंगठा, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे भैय्याजी येरमे हे युवकयुवतींना कौशल्यातून रोजगार तसेच स्वयंरोजगार बाबत मार्गदर्शन करतील.
दिनांक 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन सहाय्यक नियोजन अधिकारी रुपेश राऊत करणार आहेत. तर दिनांक 17 जुलै रोजी दुपारी एक वाजता करिअर संबंधी मार्गदर्शन प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सुशील बुजाडे  करणार आहेत.
इच्छूक युवक,युवतींना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर कार्यालयाची chandrapurrojgar@gmail.comया ई-मेल वर स्वतःची व्यक्तिगत माहिती (जी-मेल आयडीमोबाईल नं.) पाठविण्यात यावे व https://meet.google.com/vmy-skca-aox या लिंकवर जावूनगुगल मिट अॅपच्या माध्यमातून कार्यक्रमात  सहभागी होता येईल. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर या कार्यालयाच्या दुरध्वनी क्र.07172 -252295 या क्रमांकावर संपर्क साधावेअसे आवाहन सहायक आयुक्त  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केलेले आहे.
00000

No comments:

Post a Comment