Search This Blog

Tuesday 28 July 2020

पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांच्या हस्ते सौर उर्जा युक्त फिरते विक्री केंद्राचे हस्तांतरण




पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांच्या हस्ते

सौर उर्जा युक्त फिरते विक्री केंद्राचे हस्तांतरण

चंद्रपूरदि.28 जुलै: कोरोना संसर्ग काळात जिल्ह्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होणे व ग्राहकांना योग्य दरात वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी सौर ऊर्जा युक्त फिरते विक्री केंद्राचे हस्तांतरण राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागासबहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

फिरते विक्री केंद्र हे नाविन्य पूर्ण उपक्रम आहे. जिल्ह्यातील हा पथदर्शी प्रकल्प निश्चितच इतर जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कोविड प्रादुर्भावामध्ये सामाजिक अंतर राखून फिरते विक्री केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत थेट पोहोचवून जीवनावश्यक वस्तू विकता येऊ शकतात. या अलौकिक संकल्पने करीता माविम टीमफिरते विक्री केंद्राची टीम तसेच योजने मधील समाविष्ट बचत गट यांचे कौतुक त्यांनी केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवारजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेवरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी माविम नरेश उगेमुगेलेखाधिकारी नरेंद्र बनकर तसेच सीएमआरसी अध्यक्षा व व्यवस्थापक उपस्थित होते.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिला स्वयं सहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य सुरु आहे. त्यामध्ये नाबार्डराष्ट्रीयकृत बँकामानव विकास मिशनएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पदीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय नागरी अभियानमहाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका मिशनबांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रआत्मास्वयंसेवी संस्था या शासकीय व निमशासकीय विभागाच्या सहभागातून जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये विविध योजनेच्या अंतर्गत महिलांकरिता लघु उद्योग उभारणी व कौशल्य विकास यावर माविम जिल्ह्यात अग्रगण्य संस्था म्हणून कार्यरत आहे.

नागभीडमुल व जिवती तालुक्यातील बचत गटातील महिलांच्या आर्थिक व सर्वांगीण विकासाकरिता मानव विकास मिशन कार्यक्रम सन 2018-19 अंतर्गत तालुका स्पेसिफिक व कौशल्य विकास योजनाअंतर्गत फिरते विक्री केंद्र गाडी प्रति तालुका एक गाडी प्रमाणे एकूण तीन फिरते विक्री केंद्र गाडी महिलांना प्राप्त झालेली असून या प्रकल्पाअंतर्गत नागभीडमुल व जिवती तालुक्यातील 60 महिलांना प्रत्यक्ष व 300 महिलांना अप्रत्यक्ष रित्या उपजीविकेचे साधन प्राप्त होणार आहे.

कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर सर्व शासकीय नियमाचे पालन करून व सामाजिक अंतर ठेऊन लोकांना बचत गटातील महिलांद्वारे उत्पादित वस्तू तसेच स्वच्छ भाजीपालादुग्धजन्य पदार्थअंडी व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थेट त्यांच्या वस्ती तथा गावात फिरते विक्री केंद्रामार्फत केल्या जाईल. फिरते विक्री केंद्रमार्फत होम डिलिवरीफोन द्वारे ऑर्डर स्वीकारले जातीलपर्यायी ग्राहकांना गाव पातळीतील महिला व शेतकरी यांच्या मार्फत उत्पादित सेंद्रिय भाजीपाला व वस्तूंचे विक्री व पुरवठा होईल. नागभीडमुलव जिवती तालुक्यातील बचत गटातील महिलांना याद्वारे हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. 

No comments:

Post a Comment