Search This Blog

Wednesday 15 July 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 213

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 213
आज आणखी 5 कोरोना बाधित
उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 100
113 बाधित कोरोनातून बरे
चंद्रपूर,दि. 15 जुलै: जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 213 झाली आहे. यापैकी 113 बाधित कोरोनातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 100 बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकी 17 जन जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे 11 जवान व 6 जन अन्य राज्याचे रहिवासी आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील  22 वर्षीय राज्य राखीव पोलीस दलातील जवानाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा जवान संस्थात्मक अलगीकरणात होता.
चंद्रपूर शहरातील संजय नगर दुर्गावार्ड परिसरातील 30 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बालाघाट येथून आल्या नंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. चंद्रपूर शहरातील दुसरा पॉझिटिव्ह ठरलेला 23 वर्षीय युवक बाबुपेठ येथील असून एका कंपनीत काम करीत होता. यापुर्वी या कंपनीतील दोन जन पॉझिटीव्ह ठरले आहे.त्यांच्या संपर्कातील हा बाधित होता.
हैदराबाद येथून आलेली गोंडपिंपरी तालुक्यातील चेक दारूर येथील 19 वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. ती संस्थात्मक अलगीकरणात होती.
नकोडा येथील 54 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती दुमरान बिहार येथून आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्यक्ती देखील संस्थात्मक अलगीकरणात होता.
यापूर्वी, 14 जुलै रोजी रात्री उशिरा आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार बिहार राज्यातून 8 जुलै रोजी चंद्रपूर शहरातील ऊर्जा नगरात आलेल्या 41 वर्षीय संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातून आज रात्री पुन्हा तीन बाधित पुढे आले आहे. यामध्ये तालुक्यातील कुर्झा नगर येथील 43 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या ठिकाणच्या यापूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीची ही महिला पत्नी असून कुटुंबातील मुलांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. महिलेचे स्वॅब 9 जुलै रोजी घेण्यात आले होते.
ब्रह्मपुरी तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी असणाऱ्या 27 वर्षीय मुंबईवरून परत आलेल्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव  आला आहे. 9 जुलैला  मुंबईवरून आल्यानंतर हा युवक सुरुवातीला गृह व नंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. 13 तारखेला त्याचा स्वॅब घेण्यात आला होता.       
        ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूर या गावांमध्ये झारखंड राज्यातील रहिवासी असणाऱ्या 39 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. 5 जुलै रोजी हा व्यक्ती लाखापूर परिसरात आला होता. त्यानंतर या नागरिकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. स्वॅब नमुना 13 जुलै रोजी घेण्यात आला होता.
तत्पूर्वी, 14 जुलै रोजी दुपारी पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी येथील 23 वर्षीय नागरिक पॉसिटीव्ह आला आहे. हैद्राबाद येथून 9 जुलैला आलेला हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.
भद्रावती येथील बंगळूरू शहरातून 10 जुलैला परत आलेल्या 22 वर्षाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 11 जुलैला स्वॅब घेण्यात आला होता.
चंद्रपूर अंचलेश्वर गेट जवळील केरळ राज्यातून परत आलेला 28 वर्षीय युवक पॉझिटीव्ह ठरला आहे. 9 जुलैला आलेला हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. 12 जुलैला त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज पॉझिटीव्ह अहवाल आला.
या शिवाय पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कातून बाधित झालेले 3 जण पुढे आले आहेत. यामध्ये सिव्हिल लाइन चंद्रपूर येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेली 47 वर्षीय पत्नी, 18 व 10 वर्षीय दोन मुले यांचा सहभाग आहे. या सर्वांचा स्वॅब 12 जुलैला घेण्यात आला होता.
जिल्ह्यात 37 कंटेनमेंट झोन बंद; 27 कंटेनमेंट झोन कार्यरत:
64 कंटेनमेंट घेऊन कार्यान्वित करण्यात आलेले आहेत यापैकी 37 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. तर 27 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे.
कोविड-19 संक्रमित 213 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातूनरेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील देशनिहायराज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. साऊथ आफ्रिका एककजागिस्तान एक,  दिल्ली -9, हरियाणा (गुडगाव) दोनओडीसा एकतेलंगाना दोनगुजरात चारहैद्राबाद-23, नागपूर 6, अकोला दोनवाशिम एकमुंबई-16, ठाणे पाचपुणे-12, नाशिक चारजळगांव एकयवतमाळ -7, औरंगाबाद चारकोल्हापूर तीनश्रीनगर एकपटना एकअमरावती एकराजस्थान चारअलाहाबाद एकबंगलोर एकसिंगापूर एकबालाघाट एकझारखंड दोनबिहार दोनप्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-11, संपर्कातील व्यक्ती 83 आहेत.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-27, बल्लारपूर तीनपोंभूर्णा तीनसिंदेवाही तीनमुल 10, ब्रह्मपुरी 26, नागभीड चारवरोरा 8, कोरपना तीनगोंडपिपरी दोनचिमूर दोनभद्रावती पाच बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर पाचवरोरा 14, राजुरा तीनमुल एकभद्रावती 10, ब्रह्मपुरी-18, कोरपणानागभिड प्रत्येकी एक तर गडचांदूर चार बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोनबिनबा गेट एकबाबुपेठ 6, बालाजी वार्ड दोनभिवापूर वार्ड दोनशास्त्रीनगर  एकसुमित्रानगर चारस्नेह नगर एकलुंबीनी नगर 4, जोडदेउळ एकतुकूम तलाव दोनदूध डेअरी तुकूम दोनलालपेठ एकपोलीस मंगल कार्यालय तुकूम 11, दाद महल वार्डशिवाजी नगर तुकुमइंदिरानगर तुकुमलालपेठभानापेठबगल खिडकीहवेली गार्डननवीन वस्ती दाताळालखमापूर हनुमान मंदिरघुटकाळा आजाद हिंद वार्ड तुकूम अंचलेश्वर गेटसंजय नगर   याठिकाणचे प्रत्येकी एक बाधित तर पागल बाबा नगर तीनवडगाव दोनसिविल लाइन्स तीन असे एकूण बाधितांची संख्या 213 वर गेली आहे.
00000

No comments:

Post a Comment