Search This Blog

Friday, 24 July 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 349


चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 349
214 कोरोनातून बरे 135 वर उपचार सुरु
चंद्रपूर, दि. 24 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 349 झाली आहे. काल रात्रीपासून सायंकाळपर्यंत उशिरा पुढे आलेल्या 13 बाधितांमध्ये मुल तालुक्यातील पाचगडचांदूर तालुक्यातील एकचंद्रपूर महानगर क्षेत्रातील दोन व चिमूर येथील चार बाधितांचा समावेश आहे. तसेच ब्रम्हपुरी येथील झीलबोडी येथील एका बाधिताचा समावेश आहे. त्यामुळे एकूण बाधित 349 झाले आहेत. यापैकी 214 बरे झाले असून 135 बाधितांवर उपचार सुरु आहेत.
चंद्रपूर शहरात आढळलेल्या दोन बाधितांमध्ये शहरातील रहमत नगर येथील 52 वर्षीय नागरिकाचा समावेश आहे. श्वसनासंदर्भातील गंभीर आजारातून खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला 22 जुलै रोजी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. अन्य बाधित हे अंचलेश्वर गेट परिसर येथील रहिवासी असून 72 वर्षीय या गृहस्थाला श्वसनासंदर्भात गंभीर आजार होता. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
चिमूर तालुक्यातील 4 बाधित पुढे आले आहे.यामध्ये महाडवाडी येथील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या तीन कामगारांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. हे तीनही कामगार चेन्नई येथून जिल्ह्यात परतले होते.
तालुक्यातील चौथी पॉझिटिव्ह 25 वर्षीय युवती असून चिमूर येथील गुरुदेव वार्डातील  रहिवासी आहे. मुंबईवरून आल्यानंतर संस्थात्मक कारण टाईम असणाऱ्या युवतीचा नमुना 22 जुलै रोजी घेण्यात आला होता. आज तीचे स्वॅब पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले.
अंबुजा कंपनीच्या ट्रकमधून प्रवास करून उदगीर लातूर येथून परत आलेला 32 वर्षीय गडचांदूर येथील युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.
उर्वरित पाच जण मुल येथील राईस मिलशी संबंधित असून सरासरी 25 वयोगटातील आहे. यासोबतच आत्तापर्यंत बिहारमधून आलेल्या राईस मिलच्या 24 कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील झीलबोडी येथील 32 वर्षीय तरुण पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. रानबोथली परिसरातील संपर्कातून हा युवक पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.
00000

No comments:

Post a Comment