Search This Blog

Monday 27 July 2020

जिल्ह्यातील कुस्तीगीरांची शिष्यवृत्ती प्राप्त

जिल्ह्यातील कुस्तीगीरांची शिष्यवृत्ती प्राप्त
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि.27 जुलै: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या व सहभागी झालेल्या खेळाडूंना शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयपुणे मार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. सदर खेळाडूंची शिष्यवृत्ती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे प्राप्त झाली असून संबंधित खेळाडूंनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आपली शिष्यवृत्ती प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक यांनी केले आहे.
राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने सन 2019-20 या वर्षात भारतीय शालेय खेळ महासंघ दिल्ली, जवाहरलाल नेहरू हॉकी टूर्नामेंट सोसायटी दिल्ली व सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट एज्युकेशन सोसायटीदिल्ली यांच्याद्वारे राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेतील विविध खेळ प्रकारात 11, 14, 15, 17 व 19 वयोगटातील महाराष्ट्र राज्याचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय खेळाडूनी भाग घेतला होता.
ही आहेत कुस्तीगीरांची नावे:
श्रेया माणचंद नाकतोडेआर्तीका उपाध्येअंजली अमर गोरेशोएब खलील शेखसमीर ज्ञानेश्वर कडइत्तेशाम गुलाब शेखसाहिल संजय गौरकारशैल संतोष घायवटमिसबा खान पठाणप्रगती कायरकरप्रल्वल गौरकारस्मृती आत्रामपूर्वा प्रकाश तुमानेयश विश्वास बलजकी या कुस्तीगिरांनी हजार 750 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त करून घ्यावी.
00000

No comments:

Post a Comment