Search This Blog

Thursday, 23 July 2020

जाणून घ्या ! वेबिनारद्वारे प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मार्गदर्शक तत्वे व अंमलबजावणी

जाणून घ्या ! वेबिनारद्वारे
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची
मार्गदर्शक तत्वे व अंमलबजावणी
24 जुलै  सकाळी 11 ते 12.30 पर्यंत कृषी उपसंचालक साधतील वेबिनारद्वारे संवाद
चंद्रपूरदि. 23 जुलै: प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मार्गदर्शक तत्वे आणि अंमलबजावणी या विषयावर वसंतराव नाईक राज्य कृषि व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामतीनागपूरद्वारा प्रसारित मायक्रोसॉफ्ट टीमद्वारे कृषि उपसंचालकचंद्रपूर रविंद्र मनोहरे शुक्रवार दिनांक 24 जुलै  सकाळी 11 ते 12.30 पर्यंत ऑनलाईन प्रशिक्षण देणार आहेत.
जिल्ह्यातील कृषिशी संबंधित सर्व अधिकारीकर्मचारीविमा प्रतिनिधीआपले सरकार सेवा केंद्र चालक आणि शेतकरी बंधूनी या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपले तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा आणि त्यांनी दिलेल्या लिंकद्वारे प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावेअसे आवाहन कृषि विभागाने  केले आहे.
00000

No comments:

Post a Comment