Search This Blog

Wednesday 22 July 2020

जिल्हा परिषद जुबली ज्युनिअर कॉलेज येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जिल्हा परिषद जुबली ज्युनिअर कॉलेज येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
चंद्रपूर दि. 22 जुलै: शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा परिषद जुबली ज्युनिअर कॉलेज, चंद्रपूर येथे करण्यात आला.
नागपूर विभागीय मंडळ नागपूर अंतर्गत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी मार्च 2020 उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज चंद्रपूरचा निकाल 98.18 टक्के लागला असून वर्षानुवर्ष उत्तम निकालाची परंपरा कायम राखण्यात आली आहे.
कु. वैभवी चिडे 86.61 टक्के गुण घेऊन प्रथममेहुलकुमार तोकलवार 84 टक्के गुण घेऊन द्वितीय तर ऋत्वीक उराडे 76.92 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रणव पेटकर या विद्यार्थ्याने गणित विषयात  100 पैकी 100 गुण प्राप्त केले असून त्याने 76.38 टक्के गुण मिळविले आहे. कु. सेजल लिहीतकर या विद्यार्थिनीने 74.46 टक्केमयुरी ढोबे 72 टक्के असे एकंदर 11 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 6 विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत.
सर्व उत्तीर्ण यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य रवींद्र काळबांडेप्रा.सुजाता वाघमारे, अश्विनी कायरकरकिरण मोरेरूपाली देशमुखहेमावती धनेवारशैलेश बरडेशिरीष बोंडेमोरेश्वर बारसागडेपुष्पा कोटेवार, अश्लेशा शास्त्रकार यांनी विद्यार्थ्यांना पुढिल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देऊन तसेच पुस्तक देवून गौरव करण्यात आला.
oooooo

No comments:

Post a Comment