Search This Blog

Wednesday 29 July 2020

शेळी पालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण

शेळी पालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण

युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 29 जुलै:  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 5 ऑगस्ट 2020 ते 17 ऑगस्ट 2020 रोजी 14 दिवस (दोन आठवडे) कालावधीचे पशुधनावर आधारित शेळीपालनकुक्कुटपालन  व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तरी बेरोजगार युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये शेडची रचनाव्यवसायाचे फायदेशेळीगाय व कोंबड्यांच्या विविध जातीपैदासनिवडप्रजननऔषधोपचारलसीकरणनिगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापनसंतुलित आहारजीवनसत्वाचे महत्वसंसर्गजन्य रोग व त्यावरील उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजनाउद्योजकीय व्यक्तिमत्व विकासयशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शनकर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शनपशुधन विकास कार्यालयाच्या योजना व्यवसाय संधी इत्यादी विषयावर तज्ञ मार्गदर्शक व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी दि. ऑगस्ट 2020 रोजी स्वतःचा बायोडाटाशाळा सोडल्याचा दाखलागुणपत्रिकाआधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रांसह महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रउद्योग भवनदुसरा माळागाळा क्र. 208 बस स्टॉप समोररेल्वे स्टेशन रोड, चंद्रपुर येथे उपस्थित रहावे. तसेच अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.9403078773, 07172-274416), कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे (मो.क्र.9309574045) यांच्याशी संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment